logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगांव *खामगाव हादरले: नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून २४ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या* एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय खामगाव शहरातून. जिथे केवळ नाचताना धक्का लागला म्हणून एका तरुणाला आपली सोन्यासारखी आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे.खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात २५ एप्रिलच्या मध्यरात्री एका लग्न समारंभाचा उत्साह सुरू होता. डीजेचा कडकडाट आणि तरुणांचा जल्लोष सुरू असतानाच नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मृत तरुण, २३ वर्षीय शोएब खान अमीन खान, हा आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचत होता.नाचण्याच्या नादात त्याचा धक्का तिथेच असलेल्या एका दुसऱ्या तरुणाला लागला. खरं तर हे कारण अतिशय शुल्लक होतं, पण या धक्क्यामुळे अहंकाराची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही क्षणातच ४ ते ५ जणांच्या टोळीने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला.आरोपींनी केवळ हातघाईवर न थांबता धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर केला. अत्यंत निर्घृणपणे शोएबवर वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या लग्नात काही वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता फक्त किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पाहायला मिळत होता.या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

12 hrs ago
user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
12 hrs ago

खामगांव *खामगाव हादरले: नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून २४ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या* एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय खामगाव शहरातून. जिथे केवळ नाचताना धक्का लागला म्हणून एका तरुणाला आपली सोन्यासारखी आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे.खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात २५ एप्रिलच्या मध्यरात्री एका लग्न समारंभाचा उत्साह सुरू होता. डीजेचा कडकडाट आणि तरुणांचा जल्लोष सुरू असतानाच नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मृत तरुण, २३ वर्षीय शोएब खान अमीन खान, हा आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचत होता.नाचण्याच्या नादात त्याचा धक्का तिथेच असलेल्या एका दुसऱ्या तरुणाला लागला. खरं तर हे कारण अतिशय शुल्लक होतं, पण या धक्क्यामुळे अहंकाराची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही क्षणातच ४ ते ५ जणांच्या टोळीने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला.आरोपींनी केवळ हातघाईवर न थांबता धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर केला. अत्यंत निर्घृणपणे शोएबवर वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या लग्नात काही वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता फक्त किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पाहायला मिळत होता.या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास' असं ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका धावत्या एसटी बसचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हरणखेड ते मलकापूर मार्ग, जिल्हा बुलढाणामलकापूर आगाराची एक बस हनवतखेडवरून प्रवाशांना घेऊन परत येत होती. बस पूर्ण वेगात असताना अचानक चालकाच्या बाजूचे किंवा मागील बाजूचे चाक निखळून बाहेर पडले.धावत्या बसचे चाक निखळल्याचे लक्षात येताच, बसचालकाने अत्यंत संयमाने आणि कौशल्याने बस रस्त्याच्या कडेला नियंत्रित करून थांबवली. चालकाच्या या प्रसंगावधानतेमुळे बस उलटली नाही किंवा मोठा अपघात झाला नाही.सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेमुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे खालील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत एसटीच्या ताफ्यात नादुरुस्त आणि भंगार बसेसची संख्या वाढत आहे का? बस डेपोमध्ये गाड्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स (देखभाल) केले जात नाही का? प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ कधीपर्यंत सुरू राहणार? निष्कर्ष: बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेने एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जुन्या बसेसची दुरुस्ती करावी किंवा नवीन बसेस ताफ्यात सामील कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
    1
    सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास' असं ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका धावत्या एसटी बसचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हरणखेड ते मलकापूर मार्ग, जिल्हा बुलढाणामलकापूर आगाराची एक बस हनवतखेडवरून प्रवाशांना घेऊन परत येत होती. बस पूर्ण वेगात असताना अचानक चालकाच्या बाजूचे किंवा मागील बाजूचे चाक निखळून बाहेर पडले.धावत्या बसचे चाक निखळल्याचे लक्षात येताच, बसचालकाने अत्यंत संयमाने आणि कौशल्याने बस रस्त्याच्या कडेला नियंत्रित करून थांबवली. चालकाच्या या प्रसंगावधानतेमुळे बस उलटली नाही किंवा मोठा अपघात झाला नाही.सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेमुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे खालील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत
एसटीच्या ताफ्यात नादुरुस्त आणि भंगार बसेसची संख्या वाढत आहे का?
बस डेपोमध्ये गाड्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स (देखभाल) केले जात नाही का?
प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ कधीपर्यंत सुरू राहणार?
निष्कर्ष:
बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेने एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जुन्या बसेसची दुरुस्ती करावी किंवा नवीन बसेस ताफ्यात सामील कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • आजच्या जनता दरबारात अनेक समस्यांची सोडवणूक, नागरिकांचे समाधान हाच माझा ध्यासः लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या सोडवणे ही केवळ जबाबदारी नाही, तर एक भावनिक नाते आहे. आज चिखली मतदारसंघातून मोठ्या संख्येने व मोठ्या विश्वासाने अनेक नागरिक प्रत्यक्ष भेटीसाठी आले, आपले प्रश्न मांडले आणि त्यांची सोडवणूक मला करता आली हीच माझ्यासाठी सर्वात आनंदाची बाब आहे. शांततेत आणि सुरळीत पार पडलेला हा जनता दरबार म्हणजे जनतेच्या विश्वासाचं जिवंत प्रतीक आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून माझ्या कामाला खऱ्या अर्थाने यश आल्याची जाणीव झाली. जनतेची सेवा करणे हाच माझा ध्यास आहे, आणि हा ध्यास अखंडपणे जपणे हाच माझा निर्धार आहे.
    1
    आजच्या जनता दरबारात अनेक समस्यांची सोडवणूक, नागरिकांचे समाधान हाच माझा ध्यासः
लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या सोडवणे ही केवळ जबाबदारी नाही, तर एक भावनिक नाते आहे. आज चिखली मतदारसंघातून मोठ्या संख्येने व मोठ्या विश्वासाने अनेक नागरिक प्रत्यक्ष भेटीसाठी आले, आपले प्रश्न मांडले आणि त्यांची सोडवणूक मला करता आली हीच माझ्यासाठी सर्वात आनंदाची बाब आहे.
शांततेत आणि सुरळीत पार पडलेला हा जनता दरबार म्हणजे जनतेच्या विश्वासाचं जिवंत प्रतीक आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून माझ्या कामाला खऱ्या अर्थाने यश आल्याची जाणीव झाली.
जनतेची सेवा करणे हाच माझा ध्यास आहे, आणि हा ध्यास अखंडपणे जपणे हाच माझा निर्धार आहे.
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • खामगाव: गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उष्णतेसोबतच शहरात आगीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली असून, आज दुपारी खामगाव-शेगाव रोडवरील SSDV शाळेच्या मागे असलेल्या एका भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ​उन्हाची तीव्रता अधिक असताना आज अचानक शेगाव रोडवर आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. भंगार साहित्यामध्ये प्लास्टिक आणि इतर ज्वालाग्राही वस्तू असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोट इतके भीषण होते की, त्याचे काळे ढग संपूर्ण शहरातून दिसून येत होते. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ​घटनेची माहिती मिळताच खामगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची भीषणता पाहता एकामागोमाग एक अशा एकूण ४ गाड्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे ही आग शेजारील वस्ती किंवा इतर दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. ​या भीषण आगीत दुकानातील भंगार साहित्य जळून खाक झाले असले, तरी सुदैवाने वेळीच सावधगिरी बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की उन्हाच्या तीव्रतेमुळे, याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ​वाढत्या उन्हामुळे आणि कोरड्या हवामानामुळे शहरात आगीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.
    1
    खामगाव: गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उष्णतेसोबतच शहरात आगीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली असून, आज दुपारी खामगाव-शेगाव रोडवरील SSDV शाळेच्या मागे असलेल्या एका भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
​उन्हाची तीव्रता अधिक असताना आज अचानक शेगाव रोडवर आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. भंगार साहित्यामध्ये प्लास्टिक आणि इतर ज्वालाग्राही वस्तू असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोट इतके भीषण होते की, त्याचे काळे ढग संपूर्ण शहरातून दिसून येत होते. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ​घटनेची माहिती मिळताच खामगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची भीषणता पाहता एकामागोमाग एक अशा एकूण ४ गाड्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे ही आग शेजारील वस्ती किंवा इतर दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. ​या भीषण आगीत दुकानातील भंगार साहित्य जळून खाक झाले असले, तरी सुदैवाने वेळीच सावधगिरी बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की उन्हाच्या तीव्रतेमुळे, याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
​वाढत्या उन्हामुळे आणि कोरड्या हवामानामुळे शहरात आगीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • भोकरदन नगरपरिषदेचा निर्दयी कारभार! १५ वर्षांपासून 'वनवास', रस्ता झाला, पाईपलाईन आली, पण पाणी मिळेना ​भोकरदन: एकीकडे देश डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना, जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातून प्रशासकीय अनास्थेचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील कन्या शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या नागरिकांना गेल्या १५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. रस्ते झाले, पाईपलाईनही टाकली गेली, पण नळाला पाणी मात्र आलेच नाही. अखेर या 'तहानलेल्या' वस्तीतील महिलांचा संयम सुटला असून, नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ​पाईपलाईन असूनही पाणी का नाही? ​मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात नागरी सुविधांच्या नावाखाली कागदावर घोडे नाचवले जात आहेत. रस्ता आणि पाईपलाईनची कामे पूर्ण झाली असली, तरी केवळ नगरपरिषदेच्या नियोजित दुर्लक्षामुळे या पाईपलाईनमध्ये पाणी सोडले जात नाहीये. परिणामी, इथल्या कष्टकरी नागरिकांना गेल्या दीड दशकापासून दररोज पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. महागाईच्या काळात पाण्यासाठी खिशातून पैसे मोजताना सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ​प्रशासन निर्दयी, नगरसेवक 'कुंभकर्ण' झोपेत? ​या भागातील महिलांनी पाण्यासाठी आजवर अनेकवेळा नगरपरिषदेवर 'हंडा मोर्चा' काढला. प्रशासनाच्या दारात रिकामे हंडे वाजवून आपला रोष व्यक्त केला. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासनापलीकडे नागरिकांच्या हाती काहीही लागले नाही. यावरून भोकरदन नगरपरिषदेचे प्रशासन किती 'निर्दयी' झाले आहे, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर प्रभागाच्या विकासाची जबाबदारी आहे, ते नगरसेवक जणू कुंभकर्णाच्या झोपेत असल्याची टीका आता स्थानिक नागरिक उघडपणे करत आहेत. ​"आम्ही पंधरा वर्षे झाली पाणी विकत घेतोय. निवडून येण्यापूर्वी हात जोडणारे लोकप्रतिनिधी आता आमचा आवाज ऐकायला तयार नाहीत. नगरपरिषदेला आमच्या हालअपेष्टांचे काहीच देणेघेणे उरले नाहीये का?" — संतप्त महिला रहिवासी ​नागरिकांचा इशारा ​जर येत्या काही दिवसांत या परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर केवळ मोर्चावर न थांबता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. आता तरी या कुंभकर्ण झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग येणार की नागरिक पुन्हा तहानेने व्याकुळ राहणार, हाच मोठा प्रश्न आहे.
    1
    भोकरदन नगरपरिषदेचा निर्दयी कारभार! १५ वर्षांपासून 'वनवास', रस्ता झाला, पाईपलाईन आली, पण पाणी मिळेना
​भोकरदन:
एकीकडे देश डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना, जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातून प्रशासकीय अनास्थेचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील कन्या शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या नागरिकांना गेल्या १५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. रस्ते झाले, पाईपलाईनही टाकली गेली, पण नळाला पाणी मात्र आलेच नाही. अखेर या 'तहानलेल्या' वस्तीतील महिलांचा संयम सुटला असून, नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
​पाईपलाईन असूनही पाणी का नाही?
​मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात नागरी सुविधांच्या नावाखाली कागदावर घोडे नाचवले जात आहेत. रस्ता आणि पाईपलाईनची कामे पूर्ण झाली असली, तरी केवळ नगरपरिषदेच्या नियोजित दुर्लक्षामुळे या पाईपलाईनमध्ये पाणी सोडले जात नाहीये. परिणामी, इथल्या कष्टकरी नागरिकांना गेल्या दीड दशकापासून दररोज पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. महागाईच्या काळात पाण्यासाठी खिशातून पैसे मोजताना सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
​प्रशासन निर्दयी, नगरसेवक 'कुंभकर्ण' झोपेत?
​या भागातील महिलांनी पाण्यासाठी आजवर अनेकवेळा नगरपरिषदेवर 'हंडा मोर्चा' काढला. प्रशासनाच्या दारात रिकामे हंडे वाजवून आपला रोष व्यक्त केला. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासनापलीकडे नागरिकांच्या हाती काहीही लागले नाही. यावरून भोकरदन नगरपरिषदेचे प्रशासन किती 'निर्दयी' झाले आहे, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर प्रभागाच्या विकासाची जबाबदारी आहे, ते नगरसेवक जणू कुंभकर्णाच्या झोपेत असल्याची टीका आता स्थानिक नागरिक उघडपणे करत आहेत.
​"आम्ही पंधरा वर्षे झाली पाणी विकत घेतोय. निवडून येण्यापूर्वी हात जोडणारे लोकप्रतिनिधी आता आमचा आवाज ऐकायला तयार नाहीत. नगरपरिषदेला आमच्या हालअपेष्टांचे काहीच देणेघेणे उरले नाहीये का?"
— संतप्त महिला रहिवासी
​नागरिकांचा इशारा
​जर येत्या काही दिवसांत या परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर केवळ मोर्चावर न थांबता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. आता तरी या कुंभकर्ण झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग येणार की नागरिक पुन्हा तहानेने व्याकुळ राहणार, हाच मोठा प्रश्न आहे.
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • रमाई नगर कुंभारी येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना,नालंदा बुद्ध विहाराचे उद्धघाट्न Bharat 24taas News
    1
    रमाई नगर कुंभारी येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना,नालंदा बुद्ध विहाराचे उद्धघाट्न
Bharat 24taas News
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    18 hrs ago
  • हर्सूल तलावात २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू | अग्निशमन दलाचे शोधकार्य | परिसरात शोककळा
    1
    हर्सूल तलावात २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू | अग्निशमन दलाचे शोधकार्य | परिसरात शोककळा
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • जळगाव जामोद हादरले: राजुरा प्रकल्पा जवळ अज्ञात महिलेचा शिरच्छेद करून मृतदेह अर्धवट जाळला.. ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन...
    1
    जळगाव जामोद हादरले: राजुरा प्रकल्पा जवळ अज्ञात महिलेचा शिरच्छेद करून मृतदेह अर्धवट जाळला.. ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन...
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय खामगाव शहरातून. जिथे केवळ नाचताना धक्का लागला म्हणून एका तरुणाला आपली सोन्यासारखी आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे.खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात २५ एप्रिलच्या मध्यरात्री एका लग्न समारंभाचा उत्साह सुरू होता. डीजेचा कडकडाट आणि तरुणांचा जल्लोष सुरू असतानाच नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मृत तरुण, २३ वर्षीय शोएब खान अमीन खान, हा आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचत होता.नाचण्याच्या नादात त्याचा धक्का तिथेच असलेल्या एका दुसऱ्या तरुणाला लागला. खरं तर हे कारण अतिशय शुल्लक होतं, पण या धक्क्यामुळे अहंकाराची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही क्षणातच ४ ते ५ जणांच्या टोळीने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला.आरोपींनी केवळ हातघाईवर न थांबता धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर केला. अत्यंत निर्घृणपणे शोएबवर वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या लग्नात काही वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता फक्त किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पाहायला मिळत होता.या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    1
    एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय खामगाव शहरातून. जिथे केवळ नाचताना धक्का लागला म्हणून एका तरुणाला आपली सोन्यासारखी आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे.खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात २५ एप्रिलच्या मध्यरात्री एका लग्न समारंभाचा उत्साह सुरू होता. डीजेचा कडकडाट आणि तरुणांचा जल्लोष सुरू असतानाच नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मृत तरुण, २३ वर्षीय शोएब खान अमीन खान, हा आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचत होता.नाचण्याच्या नादात त्याचा धक्का तिथेच असलेल्या एका दुसऱ्या तरुणाला लागला. खरं तर हे कारण अतिशय शुल्लक होतं, पण या धक्क्यामुळे अहंकाराची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही क्षणातच ४ ते ५ जणांच्या टोळीने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला.आरोपींनी केवळ हातघाईवर न थांबता धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर केला. अत्यंत निर्घृणपणे शोएबवर वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या लग्नात काही वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता फक्त किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पाहायला मिळत होता.या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.