Shuru
Apke Nagar Ki App…
जनता दरबारात अनेक समस्यांची सोडवणूक, नागरिकांचे समाधान हाच माझा ध्यास.!! मा मा.आ. श्वेता ताई महाले. आजच्या जनता दरबारात अनेक समस्यांची सोडवणूक, नागरिकांचे समाधान हाच माझा ध्यासः लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या सोडवणे ही केवळ जबाबदारी नाही, तर एक भावनिक नाते आहे. आज चिखली मतदारसंघातून मोठ्या संख्येने व मोठ्या विश्वासाने अनेक नागरिक प्रत्यक्ष भेटीसाठी आले, आपले प्रश्न मांडले आणि त्यांची सोडवणूक मला करता आली हीच माझ्यासाठी सर्वात आनंदाची बाब आहे. शांततेत आणि सुरळीत पार पडलेला हा जनता दरबार म्हणजे जनतेच्या विश्वासाचं जिवंत प्रतीक आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून माझ्या कामाला खऱ्या अर्थाने यश आल्याची जाणीव झाली. जनतेची सेवा करणे हाच माझा ध्यास आहे, आणि हा ध्यास अखंडपणे जपणे हाच माझा निर्धार आहे.
✍️.MANSUR. SHAHA. ✍️
जनता दरबारात अनेक समस्यांची सोडवणूक, नागरिकांचे समाधान हाच माझा ध्यास.!! मा मा.आ. श्वेता ताई महाले. आजच्या जनता दरबारात अनेक समस्यांची सोडवणूक, नागरिकांचे समाधान हाच माझा ध्यासः लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या सोडवणे ही केवळ जबाबदारी नाही, तर एक भावनिक नाते आहे. आज चिखली मतदारसंघातून मोठ्या संख्येने व मोठ्या विश्वासाने अनेक नागरिक प्रत्यक्ष भेटीसाठी आले, आपले प्रश्न मांडले आणि त्यांची सोडवणूक मला करता आली हीच माझ्यासाठी सर्वात आनंदाची बाब आहे. शांततेत आणि सुरळीत पार पडलेला हा जनता दरबार म्हणजे जनतेच्या विश्वासाचं जिवंत प्रतीक आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून माझ्या कामाला खऱ्या अर्थाने यश आल्याची जाणीव झाली. जनतेची सेवा करणे हाच माझा ध्यास आहे, आणि हा ध्यास अखंडपणे जपणे हाच माझा निर्धार आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by राजश्री दत्तात्रय गवळी1
- खामगाव: एका २२ वर्षीय तरुणाची किरकोळ वादातून चाकू आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतक शोएबखान अमिनखान याचा लग्नात नाचण्यावरून आरोपींशी वाद झाला होता. हाच राग मनात धरून बर्डे प्लॉट येथील जोशी ले-आउट मधील मैदानात आरोपींनी शोएब ला गाठले.आरोपींनी संगनमत करून शोएब वर चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने हल्ला केला.त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.याप्रकरणी मृताकाचा मामा मोहम्मद साबीर शेख मुसा यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली.पोलिसांनी शेख आफताब, फैजान खान, शेख तालीब रा.खामगाव आणि शेख रफिक रा.अकोला याच्या मुलावर भारतीय न्याय संहिता नुसार कलम १०३ (१), ११८ (२), ११५ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आरोपींच्या अटकेसाठी चार पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.1
- मातृशक्तीचा गौरव, तरुणांसाठी प्रेरणेचा दीप! कनारखेड येथे ‘नारी सन्मान पुरस्कार’ सोहळ्यात समाजोपयोगी उपक्रमांची मेजवानी शेगाव (प्रतिनिधी): “तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे,” असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण लिगाडे यांनी करत सूर्यतेज बहुउद्देशीय संस्था, कनारखेडच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. दि. २४ एप्रिल २०२६ रोजी कनारखेड येथे सूर्यतेज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘नारी सन्मान पुरस्कार गुणगौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. शासकीय सेवेत रुजू झालेल्या पाल्यांच्या मातांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पक्ष्यांसाठी पाणीपात्र वितरण, एलईडी लाईट वाटप, ट्रीगार्ड, सिमेंट बेंच आणि संस्थेच्या नामफलकाचे लोकार्पण अशा बहुआयामी उपक्रमांनी कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची झळाळी मिळाली. संस्थेचे अध्यक्ष शिवाजी महादेव निळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण लिगाडे, गटशिक्षणाधिकारी मो. सलीम, दैनिक सकाळचे समन्वयक संपादक राजेश चौधरी, प्रदीप अनासने, पोलीस पाटील निलेश वाकोडे, मुख्याध्यापक जी.टी. धनोकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मातांच्या संघर्षाला सलाम… ‘नारी सन्मान पुरस्कार’ने गौरव गावातील शासकीय सेवेत रुजू झालेल्या पाल्यांच्या मातांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन ‘नारी सन्मान पुरस्कार’ प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला. विमलताई शिंदे, मिराताई निळे, सुनंदाताई वाकोडे, कल्पना निळे, सप्तशिला वाकोडे, आशाताई वाकोडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच देवराव बाबन वाकोडे यांच्या दोनही पाल्यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. समाजोपयोगी उपक्रमांनी वेधले लक्ष उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मातीचे पाणीपात्र, उजेडाचे प्रतीक म्हणून एलईडी लाईट, पर्यावरण संवर्धनासाठी ट्रीगार्ड, तसेच बसण्यासाठी सिमेंट बेंच वाटप व लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांनी सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा खजिना संकल्प स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्रा. विष्णू निळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी, मोबाईलचा योग्य वापर, बालसंस्कार यावर प्रवीण लिगाडे यांनी मार्गदर्शन करत तरुणाईला प्रेरणेचा संदेश दिला. गटशिक्षणाधिकारी मोहम्मद सलीम यांनी “मराठी शाळा टिकविण्याचे मोठे आव्हान आहे” असे सांगत शैक्षणिक बांधिलकी अधोरेखित केली. तर राजेश चौधरी यांनी “उत्तम समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आज गरज आहे,” असे मत व्यक्त केले. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद निळे, विष्णू निळे, शिवशंकर निळे, शिवचरण निळे, पुरुषोत्तम निळे यांच्यासह राजे मित्र मंडळ, भीम जयंती मित्र मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. महिला, विद्यार्थी व गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय लाव्हरे, प्रास्ताविक रूपाली निळे तर आभार प्रदर्शन अंबिका निळे यांनी केले. कनारखेडच्या मातृशक्तीचा सन्मान आणि तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा हा सोहळा गावाच्या सामाजिक इतिहासात ठसा उमटवून गेला.1
- Asaduddin Owaisi vs Police 😡 | Aamne-Saamne Takkar1
- जालन्यात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेचा हातोडा! नूतन वसाहत, अंबड चौफुली, इंदेवाडी रोडवर कारवाई नियम तोडणाऱ्यांवर दंड व गुन्हा दाखल करण्याचा इशारा1
- बदनापूर जिल्हा जालना बदनापूर येथील कॅनरा बँकेत बँक अधिकाऱ्यांनी चोरी केली व 22 लोकांनी बनावट सोने गहाण ठेऊन फसवणूक केली त्या बावीस लोकांची चौकशी करून त्यांना अटक केली जाणार असल्याची शक्यता असून नियमानुसार त्यांना अटक अटळ असल्याचे बोलले जाते.1
- बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या सूर्य अक्षरशः आग ओकत असून तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. खामगावसह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाचा कडाका जाणवत असून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहेगेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः मलकापूर, नांदुरा, खामगाव आणि शेगाव या शहरांमध्ये उन्हाचा तडाका सर्वाधिक जाणवत आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे रस्ते ओस पडत असल्याचे चित्र दिसत आहेअत्यंत महत्त्वाची कामे करण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक उन्हापासून बचावासाठी विशेष काळजी घेत आहेत. अनेक जण आपल्या डोक्याला कापड बांधून किंवा रुमालाने चेहरा झाकून प्रवास करताना दिसत आहेतवाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र 'उष्मघात कक्षाची' स्थापना केली आहेआरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कडक उन्हाच्या वेळी शक्यतो बाहेर पडू नये. तसेच, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी1
- पोलीस कॉम्प्लेक्स जवळ दुकानाला भीषण आग; आगीमध्ये संपूर्ण साहित्य जळून खाक दुकान मालकाचे लाखोचे नुकसान.. दुकानाच्या आगीने जवळच असलेल्या विद्युत रोहीत्राला सुध्दा लागली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवले आगीवर नियंत्रण1
- Madrason Ka Survey: Sahi Ya Galat? 🤔1