logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगावमध्ये थरार! लग्नात नाचण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल खामगाव: एका २२ वर्षीय तरुणाची किरकोळ वादातून चाकू आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतक शोएबखान अमिनखान याचा लग्नात नाचण्यावरून आरोपींशी वाद झाला होता. हाच राग मनात धरून बर्डे प्लॉट येथील जोशी ले-आउट मधील मैदानात आरोपींनी शोएब ला गाठले.आरोपींनी संगनमत करून शोएब वर चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने हल्ला केला.त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.याप्रकरणी मृताकाचा मामा मोहम्मद साबीर शेख मुसा यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली.पोलिसांनी शेख आफताब, फैजान खान, शेख तालीब रा.खामगाव आणि शेख रफिक रा.अकोला याच्या मुलावर भारतीय न्याय संहिता नुसार कलम १०३ (१), ११८ (२), ११५ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आरोपींच्या अटकेसाठी चार पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

9 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
9 hrs ago

खामगावमध्ये थरार! लग्नात नाचण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल खामगाव: एका २२ वर्षीय तरुणाची किरकोळ वादातून चाकू आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतक शोएबखान अमिनखान याचा लग्नात नाचण्यावरून आरोपींशी वाद झाला होता. हाच राग मनात धरून बर्डे प्लॉट येथील जोशी ले-आउट मधील मैदानात आरोपींनी शोएब ला गाठले.आरोपींनी संगनमत करून शोएब वर चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने हल्ला केला.त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.याप्रकरणी मृताकाचा मामा मोहम्मद साबीर शेख मुसा यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली.पोलिसांनी शेख आफताब, फैजान खान, शेख तालीब रा.खामगाव आणि शेख रफिक रा.अकोला याच्या मुलावर भारतीय न्याय संहिता नुसार कलम १०३ (१), ११८ (२), ११५ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आरोपींच्या अटकेसाठी चार पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय खामगाव शहरातून. जिथे केवळ नाचताना धक्का लागला म्हणून एका तरुणाला आपली सोन्यासारखी आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे.खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात २५ एप्रिलच्या मध्यरात्री एका लग्न समारंभाचा उत्साह सुरू होता. डीजेचा कडकडाट आणि तरुणांचा जल्लोष सुरू असतानाच नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मृत तरुण, २३ वर्षीय शोएब खान अमीन खान, हा आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचत होता.नाचण्याच्या नादात त्याचा धक्का तिथेच असलेल्या एका दुसऱ्या तरुणाला लागला. खरं तर हे कारण अतिशय शुल्लक होतं, पण या धक्क्यामुळे अहंकाराची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही क्षणातच ४ ते ५ जणांच्या टोळीने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला.आरोपींनी केवळ हातघाईवर न थांबता धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर केला. अत्यंत निर्घृणपणे शोएबवर वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या लग्नात काही वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता फक्त किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पाहायला मिळत होता.या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    1
    एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय खामगाव शहरातून. जिथे केवळ नाचताना धक्का लागला म्हणून एका तरुणाला आपली सोन्यासारखी आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे.खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात २५ एप्रिलच्या मध्यरात्री एका लग्न समारंभाचा उत्साह सुरू होता. डीजेचा कडकडाट आणि तरुणांचा जल्लोष सुरू असतानाच नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मृत तरुण, २३ वर्षीय शोएब खान अमीन खान, हा आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचत होता.नाचण्याच्या नादात त्याचा धक्का तिथेच असलेल्या एका दुसऱ्या तरुणाला लागला. खरं तर हे कारण अतिशय शुल्लक होतं, पण या धक्क्यामुळे अहंकाराची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही क्षणातच ४ ते ५ जणांच्या टोळीने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला.आरोपींनी केवळ हातघाईवर न थांबता धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर केला. अत्यंत निर्घृणपणे शोएबवर वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या लग्नात काही वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता फक्त किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पाहायला मिळत होता.या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by राजश्री दत्तात्रय गवळी
    1
    Post by राजश्री दत्तात्रय गवळी
    user_राजश्री दत्तात्रय गवळी
    राजश्री दत्तात्रय गवळी
    Advertising agency सिंदखेड राजा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • रमाई नगर कुंभारी येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना,नालंदा बुद्ध विहाराचे उद्धघाट्न Bharat 24taas News
    1
    रमाई नगर कुंभारी येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना,नालंदा बुद्ध विहाराचे उद्धघाट्न
Bharat 24taas News
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    17 hrs ago
  • हर्सूल तलावात २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू | अग्निशमन दलाचे शोधकार्य | परिसरात शोककळा
    1
    हर्सूल तलावात २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू | अग्निशमन दलाचे शोधकार्य | परिसरात शोककळा
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Owaisi Ne Media Ko Lagayi Class! Anjana Ke Samne Teekha Jawab 🔥
    1
    Owaisi Ne Media Ko Lagayi Class!
Anjana Ke Samne Teekha Jawab 🔥
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या सूर्य अक्षरशः आग ओकत असून तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. खामगावसह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाचा कडाका जाणवत असून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहेगेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः मलकापूर, नांदुरा, खामगाव आणि शेगाव या शहरांमध्ये उन्हाचा तडाका सर्वाधिक जाणवत आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे रस्ते ओस पडत असल्याचे चित्र दिसत आहेअत्यंत महत्त्वाची कामे करण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक उन्हापासून बचावासाठी विशेष काळजी घेत आहेत. अनेक जण आपल्या डोक्याला कापड बांधून किंवा रुमालाने चेहरा झाकून प्रवास करताना दिसत आहेतवाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र 'उष्मघात कक्षाची' स्थापना केली आहेआरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कडक उन्हाच्या वेळी शक्यतो बाहेर पडू नये. तसेच, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी
    1
    बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या सूर्य अक्षरशः आग ओकत असून तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. खामगावसह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाचा कडाका जाणवत असून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहेगेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः मलकापूर, नांदुरा, खामगाव आणि शेगाव या शहरांमध्ये उन्हाचा तडाका सर्वाधिक जाणवत आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे रस्ते ओस पडत असल्याचे चित्र दिसत आहेअत्यंत महत्त्वाची कामे करण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक उन्हापासून बचावासाठी विशेष काळजी घेत आहेत. अनेक जण आपल्या डोक्याला कापड बांधून किंवा रुमालाने चेहरा झाकून प्रवास करताना दिसत आहेतवाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र 'उष्मघात कक्षाची' स्थापना केली आहेआरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कडक उन्हाच्या वेळी शक्यतो बाहेर पडू नये. तसेच, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Asaduddin Owaisi vs Police 😡 | Aamne-Saamne Takkar
    1
    Asaduddin Owaisi vs Police 😡 | Aamne-Saamne Takkar
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू विविध कर्मचारी संघटनांचा सहभाग
    1
    महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू विविध कर्मचारी संघटनांचा सहभाग
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.