logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एमसीए च्या बीकेसीतील पाच खाद्य आउटलेट सर एफ डी ए चा दणका

8 hrs ago
user_चंद्रकला हेमंत वळवी
चंद्रकला हेमंत वळवी
Nurse नंदुरबार, नंदुरबार, महाराष्ट्र•
8 hrs ago
4bc286ec-df65-418d-836b-6c9961a4b49b
4f557cfe-8b98-47b8-b5f9-d3b226c705b2

एमसीए च्या बीकेसीतील पाच खाद्य आउटलेट सर एफ डी ए चा दणका

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • तळोद्यातील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवड तळोद्यातील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवड मानाचा व नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या तळोदा शहरातील शनी गल्ली येथील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची सन २०२६ नूतन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी अभिजित कलाल, उपाध्यक्षपदी दिनेश बुनकर, खजिनदारपदी किरण पाटील, तर सचिवपदी मनोज लोहार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची मोठी परंपरा लाभली आहे. गेल्या ७० वर्षांपासून मंडळाच्या वतीने जनप्रबोधनात्मक देखावे, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत मंडळाने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय पारितोषिकेही मिळवली आहेत. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाही गणेशोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मंडळाच्या या निवडीबद्दल पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
    1
    तळोद्यातील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवड

तळोद्यातील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवड
मानाचा व नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या तळोदा शहरातील शनी गल्ली येथील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची सन २०२६ नूतन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली.
मंडळाच्या अध्यक्षपदी अभिजित कलाल, उपाध्यक्षपदी दिनेश बुनकर, खजिनदारपदी किरण पाटील, तर सचिवपदी मनोज लोहार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची मोठी परंपरा लाभली आहे. गेल्या ७० वर्षांपासून मंडळाच्या वतीने जनप्रबोधनात्मक देखावे, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत मंडळाने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय पारितोषिकेही मिळवली आहेत.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाही गणेशोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मंडळाच्या या निवडीबद्दल पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला... पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला. चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले. सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. #DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews
    1
    Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला...
पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला.
चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले.
सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
#DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    1
    टिपू सुलतान फोटोवरून  पुन्हा वाद !                                                    फोटो काढायला लावणार - दादा भुसे
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. -- --
    1
    आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा

सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा
सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे.
नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.
अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
--
--
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील उमराणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था, कर्मचारी दवाखान्यात येतात की नाही प्रश्नचिन्ह
    1
    दिंडोरी तालुक्यातील उमराणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था, कर्मचारी दवाखान्यात येतात की नाही प्रश्नचिन्ह
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    21 min ago
  • दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    1
    दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातून श्रावण सोमवारनिमित्त आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यात्रेदरम्यान भाविकांनी भगवान शंकराचे नामस्मरण करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. कांचन नगर परिसरातील नागरिकांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
    1
    जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातून श्रावण सोमवारनिमित्त आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यात्रेदरम्यान भाविकांनी भगवान शंकराचे नामस्मरण करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. कांचन नगर परिसरातील नागरिकांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इतर नामांकित इंग्रजी शाळेत समायोजन करावे या मागणीसाठी पालकांचे आमरण उपोषण... आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इतर नामांकित इंग्रजी शाळेत समायोजन करावे या मागणीसाठी उपोषण... तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर पालकांचे आमरण उपोषण सुरू.. तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण व निवासासाठी ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल व इंटरनॅशनल पब्लिक स्कूल भानसहिवरे जिल्हा अहिल्यानगर या शाळेत 144 विद्यार्थ्यांची व्यवस्था केली आहे. मात्र या शाळेत विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळत नाही व शिक्षणाचा दर्जा खालवला आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भवितव्या चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्या पाल्यांना दुसऱ्या दर्जेदार व नामांकित इंग्रजी माध्यमांचा शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करावे या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. समायोजन झाले नाही. म्हणून विद्यार्थ्यांचा पालकांनी तळोदा प्रकल्प कार्यालयासमोर सोमवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणास रविद्र रामसिंग वळवी रोझवा पुनर्वसन, दिनेश बिजा वसावे खाई अक्कलकुवा, चिमण मागत्या पावरा सूर्यपूर धडगाव या पालकांनी उपोषण सुरू केले आहे. उर्वरित पालक सकाळी उपोषण करीत पाठिंबा देत आहे. उपोषणाचा दुसऱ्या दिवशी तळोदा प्रकल्पधिकारी यांनी उपोषणकर्त्यांचे पालकांचे शिष्टमंडळाला चर्चा केली. असून, समायोजनासाठी आयुक्तालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश येईल आपण उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले. मात्र मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका उपोषण कर्ते पालकांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. दुसऱ्या दिवशी ही उपोषण सुरू होते.
    1
    आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इतर नामांकित इंग्रजी शाळेत समायोजन करावे या मागणीसाठी पालकांचे आमरण उपोषण...
आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इतर नामांकित इंग्रजी शाळेत समायोजन करावे या मागणीसाठी उपोषण...
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर पालकांचे आमरण उपोषण सुरू..
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण व निवासासाठी ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल व इंटरनॅशनल पब्लिक स्कूल भानसहिवरे जिल्हा अहिल्यानगर या शाळेत 144 विद्यार्थ्यांची व्यवस्था केली आहे. मात्र या शाळेत विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळत नाही व शिक्षणाचा दर्जा खालवला आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भवितव्या चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्या पाल्यांना दुसऱ्या दर्जेदार व नामांकित इंग्रजी माध्यमांचा शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करावे या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.  समायोजन झाले नाही.  म्हणून विद्यार्थ्यांचा पालकांनी तळोदा प्रकल्प कार्यालयासमोर सोमवार पासून आमरण उपोषण  सुरू केले आहे.  उपोषणास रविद्र रामसिंग वळवी रोझवा पुनर्वसन, दिनेश बिजा वसावे खाई अक्कलकुवा, चिमण मागत्या पावरा सूर्यपूर धडगाव या पालकांनी उपोषण सुरू केले आहे. उर्वरित पालक सकाळी उपोषण करीत पाठिंबा देत आहे.
उपोषणाचा दुसऱ्या दिवशी तळोदा प्रकल्पधिकारी यांनी उपोषणकर्त्यांचे पालकांचे शिष्टमंडळाला चर्चा केली.
असून, समायोजनासाठी  आयुक्तालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश येईल आपण उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले. मात्र मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका उपोषण कर्ते पालकांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. दुसऱ्या दिवशी ही उपोषण सुरू होते.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.