logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कन्नड घाटात अपघात झालेल्या बस मधील प्रवासी तरुणीचा मृत्यू छ.संभाजीनगर येथुन धुळ्या कडे चालली होती बस. कन्नड घाटात अपघात झालेल्या अपघातात त्या बस मध्ये प्रवास करणारी तरुणी दीपाली रमेश वाघ वय 26 राहणार सम्राट नगर ह्या नावाची मुलगी चाळीस गाँव च्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावली तिला अपघातात ती गंभीर रित्या जखमी झाली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिस (चाळीस गाँव) येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

7 hrs ago
user_Rayabhan shrawan salve
Rayabhan shrawan salve
Farmer कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
7 hrs ago

कन्नड घाटात अपघात झालेल्या बस मधील प्रवासी तरुणीचा मृत्यू छ.संभाजीनगर येथुन धुळ्या कडे चालली होती बस. कन्नड घाटात अपघात झालेल्या अपघातात त्या बस मध्ये प्रवास करणारी तरुणी दीपाली रमेश वाघ वय 26 राहणार सम्राट नगर ह्या नावाची मुलगी चाळीस गाँव च्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावली तिला अपघातात ती गंभीर रित्या जखमी झाली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिस (चाळीस गाँव) येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे. कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
    1
    कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे.
कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
    user_Sandip Aaling
    Sandip Aaling
    Agricultural service कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • भोकरदन शहरातील अतिक्रमण धारकांनी तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आवाहन
    1
    भोकरदन शहरातील अतिक्रमण धारकांनी तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आवाहन
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    32 min ago
  • सिल्लोड शहरात रक्षाबंधन निमित्त आमदार जो सत्कार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर.... सिल्लोड (प्रतिनिधी) : शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला भगिनींनी आमदार अब्दुल सत्तार यांना राखी बांधल्या. रक्षाबंधनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित महिला भगिनींना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना आमदार सत्तार म्हणाले की, “भावाचा आधार आणि बहिणीची माया हे अतूट नाते रक्षाबंधनाच्या माध्यमातून अधिक दृढ होते. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाचे वचन देतो. हे नाते प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये उत्साह राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत असून, महिलांच्या खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपयांचे अनुदान जमा होत आहे. त्यामुळे यंदाच्या राखी पौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल “आम्ही यापूर्वीच सांगितले होते की, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय नसून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे,” असे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले. महिला आता केवळ ‘चूल आणि मूल’ यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून आयएएस, आयपीएस, इंजिनीअरिंगसह विविध क्षेत्रांत महिला अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत आहेत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. “मी जरी आपला सख्खा भाऊ नसलो, तरी माझ्या लाडक्या बहिणींच्या सुख-दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून, त्यांच्या मदतीसाठी आयुष्यभर कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, शकुंतलाबाई बनसोड, मेघा शाह, नगरसेविका वैशाली पाटील, रेखा गायकवाड, पर्वताबाई दुधे, तसेच सुमनबाई तांगडे, शांताबाई कावले, कमलबाई जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
    3
    सिल्लोड शहरात रक्षाबंधन निमित्त आमदार जो सत्कार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर....
सिल्लोड (प्रतिनिधी)  : शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला भगिनींनी आमदार अब्दुल सत्तार यांना राखी बांधल्या.
रक्षाबंधनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित महिला भगिनींना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना आमदार सत्तार म्हणाले की, “भावाचा आधार आणि बहिणीची माया हे अतूट नाते रक्षाबंधनाच्या माध्यमातून अधिक दृढ होते. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाचे वचन देतो. हे नाते प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये उत्साह
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत असून, महिलांच्या खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपयांचे अनुदान जमा होत आहे. त्यामुळे यंदाच्या राखी पौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल
“आम्ही यापूर्वीच सांगितले होते की, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय नसून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे,” असे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले.
महिला आता केवळ ‘चूल आणि मूल’ यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून आयएएस, आयपीएस, इंजिनीअरिंगसह विविध क्षेत्रांत महिला अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत आहेत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. “मी जरी आपला सख्खा भाऊ नसलो, तरी माझ्या लाडक्या बहिणींच्या सुख-दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून, त्यांच्या मदतीसाठी आयुष्यभर कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, शकुंतलाबाई बनसोड, मेघा शाह, नगरसेविका वैशाली पाटील, रेखा गायकवाड, पर्वताबाई दुधे, तसेच सुमनबाई तांगडे, शांताबाई कावले, कमलबाई जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आमदार अंबादास दानवे यांचा दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
    1
    आमदार अंबादास दानवे यांचा दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन
छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • संभाजीनगर -९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज छ संभाजीनगर ९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज ANC - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल ९०३ शाळांमध्ये पुरेशा स्वच्छतागृहांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांसाठी ८०२, तर विद्यार्थिनींसाठी तब्बल ८७५ स्वतंत्र स्वच्छतागृहांची गरज आहे. अनेक शाळांमधील उपलब्ध स्वच्छतागृहे दुरवस्थेत असून पाण्याअभावी वापरात नसल्याचे चित्र आहे. विशेषत,विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत असून, सुरक्षित स्वच्छतागृहांच्या अभावामुळे शाळा गळतीचा धोका वाढला आहे. जिल्हा नियोजन समिती, सीएसआर आणि सेसमधून निधी उपलब्ध करून देऊन नवीन स्वच्छतागृहे उभारण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी दिले आहे.
    1
    संभाजीनगर -९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज
छ संभाजीनगर 
९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज
ANC - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल ९०३ शाळांमध्ये पुरेशा स्वच्छतागृहांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांसाठी ८०२, तर विद्यार्थिनींसाठी तब्बल ८७५ स्वतंत्र स्वच्छतागृहांची गरज आहे. अनेक शाळांमधील उपलब्ध स्वच्छतागृहे दुरवस्थेत असून पाण्याअभावी वापरात नसल्याचे चित्र आहे. विशेषत,विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत असून, सुरक्षित स्वच्छतागृहांच्या अभावामुळे शाळा गळतीचा धोका वाढला आहे. जिल्हा नियोजन समिती, सीएसआर आणि सेसमधून निधी उपलब्ध करून देऊन नवीन स्वच्छतागृहे उभारण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी दिले आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    9 hrs ago
  • पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाची उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात बैठक संपन्न
    1
    पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाची उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात बैठक संपन्न
    user_Attal Mat
    Attal Mat
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • आंदोलनापूर्वीच अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा मोठा जमाव ! मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी जमू लागली आहे. उद्यापासून होणाऱ्या आंदोलनासाठी राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे दाखल होत आहेत.
    1
    आंदोलनापूर्वीच अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा मोठा जमाव !
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी जमू लागली आहे.
उद्यापासून होणाऱ्या आंदोलनासाठी राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे दाखल होत आहेत.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    47 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.