सफाई कामगारांवरील अन्यायाविरोधात राज्य सफाई कर्मचारी आयोगाकडे निवेदन; चौकशी करुन दोषींवर कारवाईसाठी शिफारशीचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे आश्वासन चांदवड नगरपरिषद हद्दीत गेल्या पाच वर्षांपासून स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणार्या सफाई कामगार व महिला मजुरांचे प्रश्न व समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबईचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी गुरुवारी सफाई कर्मचार्यांसमवेत येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी सफाई कामगारांनी ठेकेदाकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत निवेदन सादर केले. आयोगाचे उपाध्यक्ष सारवान यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीत ठेकेदारामार्फत सफाई कामगारांचे थकीत वेतन व किमान वेतनाचा फरक वसूल करण्याबरोबरच दोषींवर कारवाई करण्याबाबत संबंधीत विभागाकडे शिफारस करण्याचे आश्वासन कर्मचार्यांना दिले. या बैठकीस उपाध्यक्ष सारवान यांचे स्वीय सहाय्यक राजेश सोनवणे, नगराध्यक्ष वैभव बागूल, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक संदिप उगले व सफाई कामगार उपस्थित होते. यावेळी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक संदिप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगारांनी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्याकडे ठेकेदारामार्फत सफाई कामगारांचे होत असलेल्या आर्थिक व श्रमिक शोषणाबाबतच्या समस्यांचे निवेदन सादर केले. त्यानुसार याबाबत उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीत ठेकेदारामार्फत सफाई कामगारांचे थकीत वेतन व किमान वेतनाचा फरक वसूल करण्याबाबत तसेच याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची शिफारस आयोगामार्फत सहायक कामगार आयुक्त नाशिक तसेच संचालक नगरपरिषद संचालनालय मुंबई व अप्पर मुख्य सचिव नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी कामगारांना देण्यात आले.
सफाई कामगारांवरील अन्यायाविरोधात राज्य सफाई कर्मचारी आयोगाकडे निवेदन; चौकशी करुन दोषींवर कारवाईसाठी शिफारशीचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे आश्वासन चांदवड नगरपरिषद हद्दीत गेल्या पाच वर्षांपासून स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणार्या सफाई कामगार व महिला मजुरांचे प्रश्न व समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबईचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी गुरुवारी सफाई कर्मचार्यांसमवेत येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी सफाई कामगारांनी ठेकेदाकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत निवेदन सादर केले. आयोगाचे उपाध्यक्ष सारवान यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीत ठेकेदारामार्फत सफाई कामगारांचे थकीत वेतन व किमान वेतनाचा फरक वसूल करण्याबरोबरच दोषींवर कारवाई करण्याबाबत संबंधीत विभागाकडे शिफारस करण्याचे आश्वासन कर्मचार्यांना दिले. या बैठकीस उपाध्यक्ष सारवान
यांचे स्वीय सहाय्यक राजेश सोनवणे, नगराध्यक्ष वैभव बागूल, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक संदिप उगले व सफाई कामगार उपस्थित होते. यावेळी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक संदिप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगारांनी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्याकडे ठेकेदारामार्फत सफाई कामगारांचे होत असलेल्या आर्थिक व श्रमिक शोषणाबाबतच्या समस्यांचे निवेदन सादर केले. त्यानुसार याबाबत उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीत ठेकेदारामार्फत सफाई कामगारांचे थकीत वेतन व किमान वेतनाचा फरक वसूल करण्याबाबत तसेच याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची शिफारस आयोगामार्फत सहायक कामगार आयुक्त नाशिक तसेच संचालक नगरपरिषद संचालनालय मुंबई व अप्पर मुख्य सचिव नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी कामगारांना देण्यात आले.
- येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; त्र्यंबकेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरणत्र्यंबकेश्वर:नाशिक जिल्ह्याचा मानबिंदू आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगावचे सुपुत्र आदरणीय श्री. संतोष खोरगडे साहेब हे मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण 'सचिव' या सर्वोच्च पदावरून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीमुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुका आणि नाशिक जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री. खोरगडे साहेब यांनी आपल्या ध्येयवादी प्रशासकीय कारकिर्दीच्या जोरावर आपल्या जन्मभूमीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले. त्यांनी प्रशासनात बजावलेली उल्लेखनीय सेवा आणि त्यांचे मार्गदर्शन येथील तरुण पिढीसाठी व मातीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.त्यांच्या या गौरवशाली निवृत्तीनिमित्त आणि भावी आयुष्यासाठी नाशिक जिल्हा पत्रकार व लाईव्ह महाराष्ट्र टाइम्सचे तळोदा वृत्तांकन प्रतिनिधी श्री. भगवान आचारी (मु.पो. अस्वली हर्ष, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी खोरगडे साहेबांना पुढील आनंदी, सुदृढ आणि दीर्घायुषी सेवानिवृत्त जीवनाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.2
- Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार1
- फुलंब्रीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! कारवाईसाठी ३ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा1
- ट्रक चालकाने वैतागून रस्त्यावर ओतत इथेनॉल मिश्रित डिझेलचा पर्दाफाश केला1
- धुळे ब्रेकिंग: कन्हेरी नदीच्या पुरात पिता-पुत्र वाहून गेले! 2 जण बेपत्ता, 2 जण वाचवण्यात यश... Dhule News | धुळे ब्रेकिंग: कन्हेरी नदीच्या पुरात पिता-पुत्र वाहून गेले! 2 जण बेपत्ता, 2 जण वाचवण्यात यश... - धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुळे तालुक्यातील आंबोडे आणि मुकटी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कन्हेरी नदीला मोठा पूर आला आहे. काल दुपारी अंबोडे गावाजवळील कन्हेरी नदीच्या पुलावरून आनंदा भागवत पारखे आणि त्यांचे तीन मुलगे दिनेश, उमेश व महेश असे चौघे जण पाण्यात वाहून गेले. यापैकी उमेश व महेश या दोघांना ग्रामस्थांनी आणि बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. मात्र आनंदा पारखे व दिनेश पारखे हे दोघेही पाण्यात बेपत्ता झाले आहेत. उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. याशिवाय मुकटी गावातील 4 ते 5 तरुण देखील पुराच्या पाण्यात वाहून जात असताना त्यांना ग्रामस्थांनी वाचवले.1