logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नातू व नातीच्या जन्माचे आजोबांनी केले त्यांच्या वर्गमित्रासह जल्लोषात स्वागत गौतम बचुटे/केज:- कुटुंबात नातू आणि नातीच्या जन्माचे स्वागत एका आजोबांनी त्यांच्या वर्ग मित्रांसोबत आनंदोत्सव साजरा करून केले आहे. केज तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी असलेले महादेव मेटे हे एक सामान्य कुटुंब असून त्यांच्या पत्नी सौ. जयश्री मेटे यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर त्यांचा लहान मुलगा किशोर मेटे यांचे लग्न करून त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली. मागील आठवड्यात महादेव मेटे यांचा थोरला मुलगा विजय व सौ. अंजली यांना चि. शंभू याचा जन्म झाला तर त्यांना मोठी मुलगी कु. हिंदवी ही आहे. महादेव मेटे यांचा लहान मुलगा किशोर व सौ. ऋतुजा मेटे यांना एका गोंडस कन्यारत्न कु. तुळजा ला जन्म दिला. मित्रांसोबत आनंद उत्सव त्या दोन्ही नातवंडांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आजोबा महादेव मेटे यांनी १९८७ च्या त्यांचे एस.एस.सी. चे वर्ग मित्र असलेले शासकीय गुत्तेदार दत्ता देशमुख, व्यापारी संजय शेळके, विनोद पोपळे, केंद्र प्रमुख संजय चवरे, मुख्याध्यापक बाबासाहेब केदार, पर्यवेक्षक मुरलीधर ठोंबरे, इंदर मुंडे, बाळासाहेब वायबसे, इं,द्रमोहन कराड, पांडुरंग महाकुंडे, अय्युब शेख, वाल्मीक गायकवाड, मनोज घोरपडे, अफसर काझी, सिद्धार्थ ठोंबरे, दिगंबर भुतकर, आसराजी दांगट, संजय बोबडे, पत्रकार गौतम बचुटे यांच्या सोबत स्नेह भोजन करून आनंदोत्सव साजरा केला. नातू व नातीच्या जन्माचे आजोबांनी केले वर्गमित्रासह जल्लोषात स्वागत ❤️ केज तालुक्यातील राजेगाव येथील महादेव मेटे यांच्या कुटुंबात एकाच वेळी दुहेरी आनंद - थोरल्या मुलाला चि. शंभू आणि धाकट्या मुलाला कु. तुळजा! या आनंदात आजोबांनी 1987 च्या आपल्या शाळेतील मित्रांना बोलावून स्नेहभोजन दिले. #Rajegaon #Kej #Beed #BeedNews #KejTaluka #PositiveNews #FamilyFunction #GrandChildren #MahadevMete #Shambhu #Tulja #Hindavi #SSC1987 #Friendship #Anandotsav #GautamBachute #MarathiBatmi

19 hrs ago
user_Beed News Express
Beed News Express
अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
19 hrs ago
de0c7bfb-ed31-45d8-9bc0-15ff6e462030

नातू व नातीच्या जन्माचे आजोबांनी केले त्यांच्या वर्गमित्रासह जल्लोषात स्वागत गौतम बचुटे/केज:- कुटुंबात नातू आणि नातीच्या जन्माचे स्वागत एका आजोबांनी त्यांच्या वर्ग मित्रांसोबत आनंदोत्सव साजरा करून केले आहे. केज तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी असलेले महादेव मेटे हे एक सामान्य कुटुंब असून त्यांच्या पत्नी सौ. जयश्री मेटे यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर त्यांचा लहान मुलगा किशोर मेटे यांचे लग्न करून त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली. मागील आठवड्यात महादेव मेटे यांचा थोरला मुलगा विजय व सौ. अंजली यांना चि. शंभू याचा जन्म झाला तर त्यांना मोठी मुलगी कु. हिंदवी ही आहे. महादेव मेटे यांचा लहान मुलगा किशोर व सौ. ऋतुजा मेटे यांना एका गोंडस कन्यारत्न कु. तुळजा ला जन्म दिला. मित्रांसोबत आनंद उत्सव त्या दोन्ही नातवंडांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आजोबा महादेव मेटे

6bb6b2c7-0a78-4156-810a-0665965c5ae6

यांनी १९८७ च्या त्यांचे एस.एस.सी. चे वर्ग मित्र असलेले शासकीय गुत्तेदार दत्ता देशमुख, व्यापारी संजय शेळके, विनोद पोपळे, केंद्र प्रमुख संजय चवरे, मुख्याध्यापक बाबासाहेब केदार, पर्यवेक्षक मुरलीधर ठोंबरे, इंदर मुंडे, बाळासाहेब वायबसे, इं,द्रमोहन कराड, पांडुरंग महाकुंडे, अय्युब शेख, वाल्मीक गायकवाड, मनोज घोरपडे, अफसर काझी, सिद्धार्थ ठोंबरे, दिगंबर भुतकर, आसराजी दांगट, संजय बोबडे, पत्रकार गौतम बचुटे यांच्या सोबत स्नेह भोजन करून आनंदोत्सव साजरा केला. नातू व नातीच्या जन्माचे आजोबांनी केले वर्गमित्रासह जल्लोषात स्वागत ❤️ केज तालुक्यातील राजेगाव येथील महादेव मेटे यांच्या कुटुंबात एकाच वेळी दुहेरी आनंद - थोरल्या मुलाला चि. शंभू आणि धाकट्या मुलाला कु. तुळजा! या आनंदात आजोबांनी 1987 च्या आपल्या शाळेतील मित्रांना बोलावून स्नेहभोजन दिले. #Rajegaon #Kej #Beed #BeedNews #KejTaluka #PositiveNews #FamilyFunction #GrandChildren #MahadevMete #Shambhu #Tulja #Hindavi #SSC1987 #Friendship #Anandotsav #GautamBachute #MarathiBatmi

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.
    1
    तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस 

तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस 
बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
    1
    फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    22 hrs ago
  • शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    1
    शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न
आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.
    1
    इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा 
सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील‌ भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.
    1
    पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील‌ भावनिक क्षण!
सेनगाव/विश्वनाथ देशमुख 
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले.
मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले.
दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.
    user_Vishwanath Deshmukh
    Vishwanath Deshmukh
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न, याप्रसंगी नगराध्यक्ष परमेश्वर कदम, गटनेते हाजी सद्दाम भाई हुसेन, सर्व राजकीय पक्षप्रमुख, पत्रकार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल सेवक सर्व कार्यालयीन कर्मचारी व सर्व कार्यालयीन प्रमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न 
सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न 
सोनपेठ (दर्शन) :- 
सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न, याप्रसंगी नगराध्यक्ष परमेश्वर कदम, गटनेते हाजी सद्दाम भाई हुसेन, सर्व राजकीय पक्षप्रमुख, पत्रकार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल सेवक सर्व कार्यालयीन कर्मचारी व सर्व कार्यालयीन प्रमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, बाजरी यांसह खरीप पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये अर्थात हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच थकीत पीकविमा तात्काळ जमा करावा, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली. या मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातून शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे पीक आणि करपलेल्या बाजरीची कणसे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. हलगी वाजवत शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे वेधण्यात आले. ‘पीकविमा तात्काळ मिळालाच पाहिजे’, ‘दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने मागील १५ ते २० दिवसांपासून बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, डॉ. गणेश ढवळे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सुशीलाताई मोराळे, बाळासाहेब मोरे, अशोकराव येडे, ज्ञानेश्वर राऊत, रामधन जमले, कुलदीप करपे, हनुमान घोडके, राजू गायके, खाजाभाई पठाण, दीपक जाधव, प्रदीप घुमरे, बळीराम मेहेत्रे, सतीश विसाफे, मच्छिंद्र साठे, शाम पांढरे, खंडू गाडेकर, धनंजय सागर, अण्णा वाणी, रोहिदास मस्के, मुसा बेग, चांद बॅग, राजाभाऊ साळुंखे, विक्रम साळुंखे, विष्णू साळुंखे, सुलेमान पठाण, मुसा पठाण, विक्रम शिंदे, दिलीप शिंदे, मशरूम साळुंखे, सुरेश साळुंखे आदींसह बीड तालुक्यातील ३० ते ३५ गावांमधील शेतकरी उपस्थित होते. चौकट : सोयाबीन, कापूस, बाजरी घेऊन शेतकरी आंदोलनात ‘हलगी बजाव’ आंदोलनात शेतकरी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे दाणे आणि दाणे न भरलेल्या बाजरीच्या कणसे घेऊन सहभागी झाले. पिकांची झालेली दयनीय अवस्था शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करपलेली पिके आंदोलनस्थळी आणली होती. आंदोलनात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. चौकट : हलगीच्या नादाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी वाजवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. हलगीच्या कडकडाटासह शेतकऱ्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा दिल्याने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
    1
    दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश
दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश
बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, बाजरी यांसह खरीप पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये अर्थात हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच थकीत पीकविमा तात्काळ जमा करावा, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली.
या मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातून शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे पीक आणि करपलेल्या बाजरीची कणसे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. हलगी वाजवत शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे वेधण्यात आले. ‘पीकविमा तात्काळ मिळालाच पाहिजे’, ‘दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने मागील १५ ते २० दिवसांपासून बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, डॉ. गणेश ढवळे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सुशीलाताई मोराळे, बाळासाहेब मोरे, अशोकराव येडे, ज्ञानेश्वर राऊत, रामधन जमले, कुलदीप करपे, हनुमान घोडके, राजू गायके, खाजाभाई पठाण, दीपक जाधव, प्रदीप घुमरे, बळीराम मेहेत्रे, सतीश विसाफे, मच्छिंद्र साठे, शाम पांढरे, खंडू गाडेकर, धनंजय सागर, अण्णा वाणी, रोहिदास मस्के, मुसा बेग, चांद बॅग, राजाभाऊ साळुंखे, विक्रम साळुंखे, विष्णू साळुंखे, सुलेमान पठाण, मुसा पठाण, विक्रम शिंदे, दिलीप शिंदे, मशरूम साळुंखे, सुरेश साळुंखे आदींसह बीड तालुक्यातील ३० ते ३५ गावांमधील शेतकरी उपस्थित होते.
चौकट : सोयाबीन, कापूस, बाजरी घेऊन शेतकरी आंदोलनात
‘हलगी बजाव’ आंदोलनात शेतकरी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे दाणे आणि दाणे न भरलेल्या बाजरीच्या कणसे घेऊन सहभागी झाले. पिकांची झालेली दयनीय अवस्था शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करपलेली पिके आंदोलनस्थळी आणली होती. आंदोलनात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
चौकट : हलगीच्या नादाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी वाजवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. हलगीच्या कडकडाटासह शेतकऱ्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा दिल्याने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पावसाने फिरवली पाठ;सेनगावच्या शेतकऱ्याचे सुकळी खुर्द शिवारातील ४ एकर सोयाबीन जळून खाक,महसुल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार? सेनगाव/विश्वनाथ देशमुख निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यादेखत करपून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.सेनगाव येथील एका शेतकऱ्याचे उभे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले आहे.पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे सेनगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांच्या सुकळी खुर्द शिवारातील तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून नष्ट झाले आहे.शेती सुकळी शिवारात असली तरी देशमुख हे सेनगाव शहरात राहून तिथूनच शेतीचा संपूर्ण कारभार पाहत होते.या कोरड्या दुष्काळामुळे देशमुख यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.मात्र,या गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 'महसूल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?'असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी लक्ष्मण देशमुख यांनी मोठ्या आशेने सुकळी खुर्द शिवारातील आपल्या गट क्रमांक १०९ मधील चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.बियाणे,खते,कोळपणी आणि खुरपणीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पिकाला पोटच्या पोरासारखे सांभाळले.पीक जोमात असतानाच अचानक पावसाने दीर्घकाळ दडी मारली.कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अखेर हे उभे पीक करपून गेले.या दुर्दैवी घटनेमुळे सेनगाव आणि सुकळी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.आधीच संकटात असलेल्या बळीराजाला आता शासनाच्या आधाराची अत्यंत गरज आहे.पिकाचे नुकसान होऊन दिवस उलटत चालले तरी महसूल विभाग किंवा कृषीऐ विभागाचा एकही अधिकारी सुकळी शिवाराकडे फिरकलेला नाही.त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने या गंभीर नुकसानीची दखल घेऊन तातडीने संयुक्त पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष सरकारी मदत व पीक विमा मंजूर करावा,अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. "कर्ज काढून पोटाच्या पोरासारखं सोयाबीन सांभाळलं,पण पावसाने दगा दिला अन डोळ्यादेखत सोन्यासारखं रान जळून कोळसा झालं! चार एकरात आता फक्त काळ्या काड्या उरल्यात.हे उध्वस्त रान पाहताना काळजाचा तुकडा तुटल्यागत वेदना होत आहेत.कर्ज कसं फेडू आणि लेकरांना काय खायला घालू? पीक जळून राख झाली तरी अधिकारी अजून बांधावर आले नाहीत.सरकारने तातडीने मदत दिली नाही,तर आमच्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही!" — लक्ष्मण रामराव देशमुख (पीडित शेतकरी,सेनगाव)
    1
    पावसाने फिरवली पाठ;सेनगावच्या शेतकऱ्याचे सुकळी खुर्द शिवारातील ४ एकर सोयाबीन जळून खाक,महसुल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?
सेनगाव/विश्वनाथ देशमुख 
निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यादेखत करपून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.सेनगाव येथील एका शेतकऱ्याचे उभे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले आहे.पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे सेनगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांच्या सुकळी खुर्द शिवारातील तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून नष्ट झाले आहे.शेती सुकळी शिवारात असली तरी देशमुख हे सेनगाव शहरात राहून तिथूनच शेतीचा संपूर्ण कारभार पाहत होते.या कोरड्या दुष्काळामुळे देशमुख यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.मात्र,या गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 'महसूल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?'असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी लक्ष्मण देशमुख यांनी मोठ्या आशेने सुकळी खुर्द शिवारातील आपल्या गट क्रमांक १०९ मधील चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.बियाणे,खते,कोळपणी आणि खुरपणीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पिकाला पोटच्या पोरासारखे सांभाळले.पीक जोमात असतानाच अचानक पावसाने दीर्घकाळ दडी मारली.कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अखेर हे उभे पीक करपून गेले.या दुर्दैवी घटनेमुळे सेनगाव आणि सुकळी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.आधीच संकटात असलेल्या बळीराजाला आता शासनाच्या आधाराची अत्यंत गरज आहे.पिकाचे नुकसान होऊन दिवस उलटत चालले तरी महसूल विभाग किंवा कृषीऐ विभागाचा एकही अधिकारी सुकळी शिवाराकडे फिरकलेला नाही.त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने या गंभीर नुकसानीची दखल घेऊन तातडीने संयुक्त पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष सरकारी मदत व पीक विमा मंजूर करावा,अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
"कर्ज काढून पोटाच्या पोरासारखं सोयाबीन सांभाळलं,पण पावसाने दगा दिला अन डोळ्यादेखत सोन्यासारखं रान जळून कोळसा झालं! चार एकरात आता फक्त काळ्या काड्या उरल्यात.हे उध्वस्त रान पाहताना काळजाचा तुकडा तुटल्यागत वेदना होत आहेत.कर्ज कसं फेडू आणि लेकरांना काय खायला घालू? पीक जळून राख झाली तरी अधिकारी अजून बांधावर आले नाहीत.सरकारने तातडीने मदत दिली नाही,तर आमच्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही!"
— लक्ष्मण रामराव देशमुख (पीडित शेतकरी,सेनगाव)
    user_Vishwanath Deshmukh
    Vishwanath Deshmukh
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.
    1
    लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार.
लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. 
हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नियोजनबद्ध कटाचा संशय.
बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पालकमंत्री शहरात असतानाच थरार.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.