शेतकऱ्यांपासून उद्योजक व्यवसायिकांपर्यंत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सर्वांना आधार - नगरसेवक महेश इंगळे गेल्या ७७ वर्षांपासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा करून शेतीला बळ देण्याचे काम बँकेने केले आहे. बँकेची ७७ वर्षांची ही वाटचाल म्हणजे विश्वासाची वाटचाल आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांपासून ते व्यापारी उद्योजका पर्यंत या बँकेने सर्वांना आधार दिला आहे असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. नुकतेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, शाखा अक्कलकोटचा ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त बँक परिसरात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे विद्यमान नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी उपस्थित राहून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर बोलत होते. पुढे बोलताना नगरसेवक महेश मालक इंगळे म्हणाले की जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याच्या आर्थिक कण्याचा भाग आहे. अक्कलकोट शाखेचा कारभार अतिशय पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख आहे. मॅनेजर दीपक हजारे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहे. बँकेची अशीच प्रगती होत राहो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थांच्या चरणी असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक महेश इंगळे यांनी बँकेचे मॅनेजर दीपक हजारे साहेब, सीनियर बँक इन्स्पेक्टर कोरपे साहेब, हवदे साहेब, यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी देविदास चव्हाण, मन्सूर अली मुल्ला, विनायक पुजारी, रमेश शिंदे सर यांच्यासह बँकेचे सर्व कर्मचारी वृंद, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले. मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.1
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांचा शहरात रूट मोर्चा1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद1
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- लातूरच्या लाडक्या बहिणी लागल्या तयारीला.. #चलो_मुंबई..1
- लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ1