*✏संकलन, शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धा* ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'शनिवारीय काव्यस्तंभ' स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼ ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम* ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗* *☄विषय : दोस्तीत कुस्ती☄* *🍂शनिवार : १०/ ०१ /२०२६*🍂 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *दोस्तीत कुस्ती* का उगीच करायची,प्रेमात तुझ्याशी युती। आवडेना मलाही आपली दोस्तीत कुस्ती।। स्वार्थाने बरबटले,दिसतात लोक सारे। सुखात सोबती तरी,दुःखात शिरवे अस्थी ।। तुही माझाच आहे रे,अन मी तुझाच आहो। कदर परक्यावानी ,मनाला झोंबते नुसती।। का श्रीमंतीने थाटात,जगती माणसे येथे। नशेनी धुंद दिसती,अंगात माज सुसती।। मैत्रीत एकमेकांना,साथ द्यायची असते। तरी सतावे अजूनी, धोक्याचीच धास्ती।। दोस्तीत पैसा अडका,कामाचा मुळी नाही। विसरूनी नातेगोते,करतात मौजमस्ती।। क्षणभंगुर जीवनात,दरवळावा सुगंध। फुलाशिवाय वसली,तुझी माझीरे वसती।। तु राजकारणी रहा,सामाजिक कार्यकर्ता। वैयक्तिक सामान्यांची,पुर्ण होत नाही नस्ती।। *गोवर्धन तेलंग* *पांढरकवडा. जि यवतमाळ* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ *दोस्तीत कुस्ती* निवडणुकीची चाले धामधूम निवडी साठी चाले झूम झूम टिकीट वाटपाचा चाले डाव टिकीट कटल्यामुळे पडे घाव पक्षात होते नेते एक टिकीट कटल्यामुळे झाले बेक दोस्तीत पडली दरी दोस्तांमधये कुस्ती खरी दोस्त झाले विरूद्ध उभे कुस्तीचा सामना त्यांच्यात रंगे दोस्ती खरी राहीली नाही नात्यातली तुटली ग्वाही दोस्तांमध्ये रंगली कुस्ती कुस्तीमुळे आली सुस्ती कोण जिंकला कोण हारला दोस्तीत कुस्तीचा सामना रंगला *श्री.पुरुषोत्तम ठोंबरे* *त.नागपूर जि.नागपूर* *©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ *दोस्तीत कुस्ती* निवडणुकीचे बिगुल वाजले डाव प्रतिडाव रंगात आले दोस्तीत कुस्ती रंगला खेळ मतदारांना भंडावून सोडले पक्षनिष्ठा गेली हो चुलीत पक्ष बदलती येता जाता सत्तेसाठी सारा आटापिटा कोण विचारी निवडून येता मांडीला मांडी लावून बसले आज विरोधक पक्के बनले सत्तेसाठी सारे नाट्य रंगले निवडून येता एक जाहले समाज हिताचे काही होवो सत्ता मात्र आम्हाला मिळो कलगी तुरा रंगातच आला जनमत आमच्याकडे वळो भलीमोठी आश्वासने देती कि तोंडाला पाने पुसती जनता संभ्रमित जाहली कळेना खरे कोण बोलती लगबग पक्ष कार्यालयात गर्दी हौशा नवशांची मटण पार्ट्या, जेवणावळी कुजबूज सुरु भेटवस्तूंची वचन नामे बोलाची कढी निकालानंतर कोलांटी उडी फसवायची वेगळी नीति उमेदवार मारतात दडी निकाल लागेल लवकरच खोट्याचे पोलच खुलेल सच्चा नेताच बघा जिंकेल निवडणुकीत बाजी मारेल *वृंदा(चित्रा)करमरकर* *मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक* *सांगली जिल्हा सांगली* *©मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ *कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.* ➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿ *दोस्तीत कुस्ती* तळ्यात मळ्यात खेळ चाले आली दारात उमेदवार वारी गाडीवर भोंगा गळ्यात गमछे अन विनवण्या करती लय भारी ताई, दादा, काका काकू किती विनम्र यांचे बोल एखादा मतदार मध्येच उचकतो भाऊ रस्त्यात खड्डे आहे खोल मागच्यावेळचे काम अधूरे आता आम्ही पाहून घेवू दोस्तीत कुस्ती चालू आहे आम्हीच निवडून येवू पुन्हा तेच तेच आश्वासन देऊन आपल्या नेत्याचे गाती गोडवे निर्लज्जम् सदा सुखी सारखे दारी येतात हे भडवे एकाच घरी तीन तिकीट कार्यकर्ते बाजूला राहीले सतरंज्या उचलता खपले आयुष्य त्यांनी फक्त दिवास्वप्न पाहिले *डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर* *©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ *दोस्तीत कुस्ती* निवडणूक आली की लावता प्रतिष्ठा तुमची, एरवी एकत्र कारभार फजिती होते आमची... विरोधक बनता फक्त निवडणूक होईस्तोवर एकत्र येऊन सरकार स्थापन करताय नंतर... दोस्तीत कुस्ती खेळून कुणीही विजयी होऊन, जनतेच्या डोळ्या मात्र जाता धुळफेक करून... दाखवण्या आपले मत दान ही विकत घेऊन, लोकशाही पायमल्ली तुम्हीच बसता करून... हार,जीत झाली तरीही हातमिळवणी करतात, दोस्तीत कुस्ती खेळून सत्तेत सामील होतात... राजकारणी डाव होता आले जनतेच्या ध्याना, कोण कुणासंगे जाईल कुणाचाचं नेम कळेना... *बी एस गायकवाड* *पालम परभणी* *©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ *दोस्तीत कुस्ती* निवडणूक लढतांना दोस्तीत कुस्ती निवडून येताच करतात मस्ती राजकीय पक्षी हा एकाच माळ्याचा राजकीय क्षेत्रात असतो कई काळाचा एकमेक करतात विरोध फक्त लोक दिखावसाठी बसतात एकाच पंक्तीत बांधतात पैशाच्या गाठी दोस्तीत नसतो कुस्ती ती असते पार्टीची मस्ती चालतात एकाच मार्गाने राहतात मस्त आनंदाने जनतेचे असते बेहाल आपण होतात मालामाल घेतात मस्त डकार लोकांना देतात होकार राजकीय पक्षी नाही कुणाचा उडत असतो वरचेवर वेळ जरी आली जनतेवर नाही केली मदत आजवर कसली त्यांची दुश्मनि मग कसली मेहमानी कसली दोस्तीत कुस्ती अरे भाई करतात मस्ती मता पुरती राजकारण जनतेचा असते मरण निवडून ते तर येतात पण जनतेचा बेकार जीवन *केवलचंद शहारे* *सौंदड गोंदिया* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ *दोस्तीत कुस्ती* खूप घेतल्या शपथा,दिल्या वांझ घोषणा तुझी माझी लिहू कथा,म्हणे एकच आपला कणा...१ रान लागले तापू,तसे मन लागले ढळू गाजर लालसेचे मनी,म्हणे हलवा आपणचं तळू....२ झाली दोस्तीत कुस्ती,लागले वाग्बाण फेकू रणधुमाळी नुस्ती,म्हणे याची पाठचं आता टेकू...३ विळ्या भोपळ्याचे वैर,झाले कांदया बटाट्याचे हाल ऐन मोसमात तूर,म्हणे दिली घेवड्याने हूल....४ नुसत्याचं वलग्ना,जो तो लागला करू वटाणा फुटाणा,म्हणे कोणता शेंडा धरू...५ सारीच भेसळ,खिचडी लागली पकू फायदयासाठी म्हणे,'बांडगूळ'सत्व लागलं विकू..६ दोस्तीत कुस्ती,रण माजलं, जागरूक "खळ्यांन" म्हणे खोट्याला मातीत गाडलं..७ *श्री काशिनाथ पैठणकर(नगरसुल)* *ता.येवला.जि.नाशिक* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺 *सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏 ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ *🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻* *✒राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह* ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ *🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास* ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

- Post by वीर सिंह बसंतपुर2
- *🔸धामणगावं तालुक्यात सिकलसेल ऑनिमिया विशेष अभियान.* 🔸*आरोग्य विभागाची 'अरुणोदय' मोहीम..* *🔸मा.डॉ. प्रफुल्ल भोरखडे साहेब गट विकास अधिकारी धामणगाव रेल्वे यांचा संदेश..* प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे1
- Gtv news marathi / सन्मान ' आई बाबांचा ' हा सोहळा आजच्या समाजासमोर एक आदर्श - आमदार मुनगंटीवार https://youtu.be/wo6sPPfjkME # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- नवजात बालिकेने घेतले पित्याचे अंत्यदर्शन1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Nagesh Awachar1
- कोळशाने भरलेल्या ट्रकला आग1
- 📍“अंजनगाव सुर्जीत चाकूहल्ल्याचा थरार | LIVE अपडेट” शहरात दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास चित्तथरारक घटना घडली असून नवीन बस स्थानकाजवळील परकाले वाइन शॉप परिसरात दोन जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचे नाव गौर असे समजले तर दुसऱ्या जखमीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी दोघांनाही तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्ल्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. #police #PoliceInvestigation #NewsUpdate #public #viralvideochallenge #InvestigationUpdate #PublicIssue #anjangaonsurji #जागरमराठी1
- Post by Nandkumar Motiram Totewad1