logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगाव तालुक्यातील नागापूर येथे दिव्यांग जागृती शिबिर व समस्या निराकरण अभियान संपन्न खामगाव : तालुक्यातील मौजे नागापूर येथे दिव्यांग बांधवांच्या जनजागृतीसाठी विशेष दिव्यांग जागृती शिबिर व गावातील समस्या निराकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज नगरनाईक, दिव्यांग फाउंडेशन बुलढाणा जिल्हाध्यक्षा कविता इंगळे, समाजसेवक व टायगर ग्रुपचे उप जिल्हाध्यक्ष पीयुष चव्हाण व जगमित सिंह हे उपस्थित होते. यावेळी मनोज नगरनाईक यांनी दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. यूडीआयडी (UDID) कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, एस.टी. सवलत पास, ई-श्रम कार्ड, तसेच दिव्यांग साधन वाटप योजना या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग कायदा २०१६ ची माहितीसह अनेक दिव्यांगांचे कल्याणकारी योजना अर्ज जागेवरच समजावून सांगित अर्ज सादर करीत योजना कश्या मिळाव्यात यासाठी जिल्हा अध्यक्ष कविताताई इंगळे यांनी मार्गदर्शन केले तसेच गावातील पाणी, रस्ते, घरकुल, स्वच्छता व इतर मूलभूत समस्यांबाबत ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या व संबंधित विभागाकडे तात्काळ पाठपुरावा करण्याचे आश्वासन समाजसेवक पीयुष चव्हाण दिले या अभियानामुळे शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. व गावातील समस्या निराकरण करण्यासाठी आम्ही सदस्य प्रयत्न करू असे आश्वासन राजू भाऊ पवार व साजण राठोड यांनी दिले कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सह ग्रामस्थ व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पूनमताई चव्हाण,सचिन सोळंके मयूर सोळंके यांनी परिश्रम घेतले.

3 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
3 hrs ago
5fe7efb5-f42d-477b-b304-a737a19cd687

खामगाव तालुक्यातील नागापूर येथे दिव्यांग जागृती शिबिर व समस्या निराकरण अभियान संपन्न खामगाव : तालुक्यातील मौजे नागापूर येथे दिव्यांग बांधवांच्या जनजागृतीसाठी विशेष दिव्यांग जागृती शिबिर व गावातील समस्या निराकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज नगरनाईक, दिव्यांग फाउंडेशन बुलढाणा जिल्हाध्यक्षा कविता इंगळे, समाजसेवक व टायगर ग्रुपचे उप जिल्हाध्यक्ष पीयुष चव्हाण व जगमित सिंह हे उपस्थित होते. यावेळी मनोज नगरनाईक यांनी दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. यूडीआयडी (UDID) कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, एस.टी. सवलत पास, ई-श्रम कार्ड, तसेच दिव्यांग साधन वाटप योजना या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग कायदा २०१६

244048bf-e957-4f8c-b725-baff0867614d

ची माहितीसह अनेक दिव्यांगांचे कल्याणकारी योजना अर्ज जागेवरच समजावून सांगित अर्ज सादर करीत योजना कश्या मिळाव्यात यासाठी जिल्हा अध्यक्ष कविताताई इंगळे यांनी मार्गदर्शन केले तसेच गावातील पाणी, रस्ते, घरकुल, स्वच्छता व इतर मूलभूत समस्यांबाबत ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या व संबंधित विभागाकडे तात्काळ पाठपुरावा करण्याचे आश्वासन समाजसेवक पीयुष चव्हाण दिले या अभियानामुळे शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. व गावातील समस्या निराकरण करण्यासाठी आम्ही सदस्य प्रयत्न करू असे आश्वासन राजू भाऊ पवार व साजण राठोड यांनी दिले कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सह ग्रामस्थ व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पूनमताई चव्हाण,सचिन सोळंके मयूर सोळंके यांनी परिश्रम घेतले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. ​हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. ​शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    4
    ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च


खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. ​हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. ​शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • चिखली तहसील कार्यालयात राडा; निकृष्ट रेशन तांदळाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन, आधी तुम्ही खा, मग आम्ही खाऊ!" चिखलीत तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला रेशनचा तांदूळ,चिखलीत निकृष्ट तांदळामुळे लाभार्थी आक्रमक....
    1
    चिखली तहसील कार्यालयात राडा; निकृष्ट रेशन तांदळाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन,
आधी तुम्ही खा, मग आम्ही खाऊ!" चिखलीत तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला रेशनचा तांदूळ,चिखलीत निकृष्ट तांदळामुळे लाभार्थी आक्रमक....
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    1
    सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर
ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    user_Santosh Mane
    Santosh Mane
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    52 min ago
  • रावेरच्या वैशाली लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी बेकायदेशीरपणे रूममध्ये आढळली..! वैशाली लॉजिंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस..! मॅनेजरसह दोघे अटकेत रावेर पोलिसांची हॉटेल-लॉजिंग तपासणीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी व तरुणाला कोणतेही ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी वैशाली लॉजिंगच्या मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
    1
    रावेरच्या वैशाली लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी बेकायदेशीरपणे रूममध्ये आढळली..! 
वैशाली लॉजिंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस..! मॅनेजरसह दोघे अटकेत
रावेर पोलिसांची हॉटेल-लॉजिंग तपासणीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी व तरुणाला कोणतेही ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी वैशाली लॉजिंगच्या मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
    user_R Media
    R Media
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26/08/26 कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले. या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    4
    हजरत मोहम्मद पैगंबर
 यांच्या जयंतीनिमित्त 
 आज दिनांक
26/08/26

कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली
कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले.

या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता.

पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    user_अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    Carpenter कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    54 min ago
  • अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत. धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ
    1
    अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई
भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत.
धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ
    user_Anis Shaikh
    Anis Shaikh
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    2
    सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    2
    *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड*


वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.