अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा भरपाई द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा भरपाई द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा परभणी, दि. (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई मिळालेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, परभणी जिल्हा हा प्रामुख्याने शेतीप्रधान असून सुमारे ८० ते ९० टक्के नागरिक शेतीवरच अवलंबून आहेत. यंदाच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरीदेखील पिक विमा योजनेअंतर्गत भरपाई प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पिक विमा समन्वय समितीमार्फत विमा कंपनी, कृषी विभाग व महसूल विभाग यांच्यात समन्वय साधून शेतकऱ्यांना वेळेत भरपाई देणे अपेक्षित आहे. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने नुकसान अहवाल सादर करून विमा कंपनीशी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक तक्रारी प्रलंबित असून प्रशासनाचा पाठपुरावा अपुरा असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. विशेषतः जाब मंडळातील अनेक प्रकरणांमध्ये पिक नुकसानीची अचूक नोंद न झाल्याने तसेच माहितीतील विसंगतीमुळे पात्र शेतकरी भरपाईपासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणांचे स्वतंत्र पुनरावलोकन करून दोषी बाबींवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनाद्वारे प्रशासनाकडे काही ठोस मागण्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये जिल्हास्तरीय पिक विमा समितीची तात्काळ बैठक घेणे, नुकसानग्रस्त क्षेत्रांचा पुनरावलोकन अहवाल जाहीर करणे, सर्व प्रलंबित तक्रारी निश्चित कालमर्यादेत निकाली काढणे, विमा कंपनीला भरपाई वितरणासाठी स्पष्ट वेळापत्रक देणे, तसेच संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून प्रक्रिया गतीमान करणे यांचा समावेश आहे. यासोबतच पात्र शेतकऱ्यांना तात्काळ व न्याय्य भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने त्यांना वेळेत मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष आसेफ खान, मीतेश सुक्रे, उमेश देशमुख, जाफर तरोडेकर नरसिंह खडके आधी उपस्थित

- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Today One Live1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- Post by माधव गायकवाड4
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Anil Rathod1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2