परळी महामार्गावर लावलेली झाडे अवघ्या चार दिवसांत वाळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात? अंबाजोगाई/प्रतिनिधी: पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या सुशोभीकरणाचा गाजावाजा करत अंबाजोगाई नगरपालिकेकडून परळी महामार्गावर करण्यात आलेले वृक्षारोपण केवळ देखावा ठरत असल्याचे समोर आले आहे. महामार्गावर झाडे लावून अवघे काही दिवस उलटले असतानाच बहुतांश झाडे पूर्णपणे वाळून निष्पर्ण झाली आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अक्षरशः वाया जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून होत आहे. नगरपालिकेच्या वतीने परळी महामार्गावर मोठ्या थाटामाटात झाडे लावण्यात आली. झाडांच्या संरक्षणासाठी जाळ्या (ट्री गार्ड) देखील बसवण्यात आल्या. मात्र, झाडे लावताना योग्य नियोजनाचा अभाव आणि लागवडीनंतर पाण्याचा पत्ताच नसल्यामुळे उन्हाच्या तडाख्यात या झाडांची पाने पूर्णपणे जळून गेली आहेत. अवघ्या चार दिवसांत झाडांची ही दुरवस्था झाल्याने, केवळ शासकीय निधी लाटण्यासाठीच हे वृक्षारोपण उरकण्यात आले का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. झाडे लावण्याचा फक्त सोपस्कार, संगोपनाकडे दुर्लक्ष ************************ वृक्षारोपणावर दरवर्षी लाखो-कोट्यवधींचा चुराडा केला जातो. परंतु, रोपे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे, नियमित पाणी देण्याकडे पालिकेचे अधिकारी व कंत्राटदार सपशेल दुर्लक्ष करतात. महामार्गावर लावलेली झाडे पहिल्याच आठवड्यात करपून गेल्याने या कामाच्या गुणवत्तेवर आणि संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांमधून तीव्र संताप ******************* जनतेच्या कररुपी पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी होत असल्याने अंबाजोगाईकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. केवळ कागदोपत्री आकडे दाखवून निधी हडप करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराची तात्काळ चौकशी करावी, तसेच वाळलेली झाडे बदलून त्यांची योग्य निगा राखण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
परळी महामार्गावर लावलेली झाडे अवघ्या चार दिवसांत वाळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात? अंबाजोगाई/प्रतिनिधी: पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या सुशोभीकरणाचा गाजावाजा करत अंबाजोगाई नगरपालिकेकडून परळी महामार्गावर करण्यात आलेले वृक्षारोपण केवळ देखावा ठरत असल्याचे समोर आले आहे. महामार्गावर झाडे लावून अवघे काही दिवस उलटले असतानाच बहुतांश झाडे पूर्णपणे वाळून निष्पर्ण झाली आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अक्षरशः वाया जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून होत आहे. नगरपालिकेच्या वतीने परळी महामार्गावर मोठ्या थाटामाटात झाडे लावण्यात आली. झाडांच्या संरक्षणासाठी जाळ्या (ट्री गार्ड) देखील बसवण्यात आल्या. मात्र, झाडे लावताना योग्य नियोजनाचा अभाव आणि लागवडीनंतर पाण्याचा पत्ताच नसल्यामुळे उन्हाच्या तडाख्यात या झाडांची पाने पूर्णपणे जळून गेली आहेत. अवघ्या चार दिवसांत झाडांची ही दुरवस्था झाल्याने, केवळ शासकीय निधी लाटण्यासाठीच हे वृक्षारोपण उरकण्यात आले का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. झाडे लावण्याचा फक्त सोपस्कार, संगोपनाकडे दुर्लक्ष ************************ वृक्षारोपणावर दरवर्षी लाखो-कोट्यवधींचा चुराडा केला जातो. परंतु, रोपे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे, नियमित पाणी देण्याकडे पालिकेचे अधिकारी व कंत्राटदार सपशेल दुर्लक्ष करतात. महामार्गावर लावलेली झाडे पहिल्याच आठवड्यात करपून गेल्याने या कामाच्या गुणवत्तेवर आणि संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांमधून तीव्र संताप ******************* जनतेच्या कररुपी पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी होत असल्याने अंबाजोगाईकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. केवळ कागदोपत्री आकडे दाखवून निधी हडप करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराची तात्काळ चौकशी करावी, तसेच वाळलेली झाडे बदलून त्यांची योग्य निगा राखण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
- श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर1
- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनपेठ (दर्शन) :- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गोदावरी-कृष्णा खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याचीही मागणी माआ. भिमराव धोंडे बीड (प्रतिनिधी) : आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील पाणी या तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे. आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) हे तालुके दुष्काळग्रस्त व पाणीटंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखले जात असून, या भागातील शेती, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न वारंवार गंभीर होत आहे. त्यामुळे गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून या तालुक्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. मोर्चाच्या दिवशी या विषयाशी संबंधित जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी खोरे विकास महामंडळ तसेच संबंधित तांत्रिक व प्रशासकीय विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे मोर्चाच्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाहीची दिशा निश्चित करता येईल. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ऊस, सोयाबीन, तूर, मूग, कापूस, उडीद, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन १०० रुपये आणि लहान जनावरांसाठी ५० रुपये या प्रमाणात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. आष्टीला मंजूर ५.६८ टीएमसीपैकी उर्वरित ४ टीएमसी पाणी द्या निवेदनानुसार, कृष्णा खोरे प्रकल्पातून आष्टी तालुक्यासाठी ५.६८ टीएमसी पाणी मंजूर झाले असून त्यापैकी १.६८ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र मंजूर कोट्यातील उर्वरित ४.०० टीएमसी पाणी अद्याप उपलब्ध झालेले नाही. आष्टी तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई आणि शेतीची गरज लक्षात घेता मंजूर असलेले उर्वरित ४ टीएमसी पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन व प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी आणि दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.1
- ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे1
- “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली. जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले. पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे. “पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे. “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच.. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.3
- जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ (दर्शन) :- श्री आर्य वैश्य समाज नगरेश्वर गणेश मंडळ सोनपेठ. श्री एकता गणेश मित्र मंडळ महाजन गल्ली सोनपेठ. श्री मोरया प्रतिष्ठान गरुड चौक सोनपेठ. श्री सुखकर्ता गणेश मंडळ वरकड गल्ली सोनपेठ. श्री कुंभार गल्ली गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री सार्वजणीक रामेश्वर प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री चिंतामणी गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री अष्ठविनायक गणेश मंडळ सारडा गल्ली सोनपेठ. श्री जय भवानी गणेश मित्र मंडळ निरगुड वट्टा सोनपेठ. श्री जय मल्हार गणेश मंडळ दहिखेड सोनपेठ. श्री जगदंब प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री सार्वजनिक गणेश मंडळ सोनखेड सोनपेठ. श्री सोमेश्वर गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री चर्मकार गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री लहुजीनगरचा राजा गणेश मंडळ सोनपेठ. श्री संभाजीनगर गणेश मंडळ सोनपेठ. श्री सुवर्णकार गणेश मंडळ हनुमान मंदिर सोनपेठ. श्री छत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळ होळकर चौक सोनपेठ. श्री सोनपेठचा राजा प्रतिष्ठाण गणेश मंडळ छत्रपती चौक सोनपेठ. श्री नवतरुण गणेश मंडळ गणेशनगर सोनपेठ. श्री श्रीराम गणेश मंडळ मसनजोगी वसाहत सोनपेठ. श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर सोनपेठ.1