logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मनरेगाच्या प्रलंबित निधीबाबत केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठकमहाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सन 2014 ते 30 जून 2026 या कालावधीतील कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीबाबत नवी दिल्ली, दि. 31 जुलै : महाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सन 2014 ते 30 जून 2026 या कालावधीतील कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीबाबत केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांच्यासोबत कर्तव्य भवन, नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीदरम्यान महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना (रोहयो) मंत्री भरत गोगावले यांनी वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी, सार्वजनिक विहिरी तसेच इतर सार्वजनिक कामांच्या प्रलंबित निधीचा प्रश्न केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. राज्यातील प्रलंबित निधीबाबत केंद्र शासनाकडून आवश्यक कार्यवाही करून येत्या काही दिवसांत महाराष्ट्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी यावेळी दिले. या बैठकीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहसचिव रोहिणी भाजीभाकरे, रोजगार हमी विभागाचे सहसचिव अतुल कोदे तसेच महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. राज्यातील मनरेगा कामांचे प्रलंबित निधी लवकरच उपलब्ध झाल्यास विविध विकासकामांना गती मिळण्यासोबतच लाभार्थी आणि कामगारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

19 hrs ago
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Photographer अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
19 hrs ago
8d170c85-35ee-47ff-a33c-0d7ad8df54c9

मनरेगाच्या प्रलंबित निधीबाबत केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठकमहाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सन 2014 ते 30 जून 2026 या कालावधीतील कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीबाबत नवी दिल्ली, दि. 31 जुलै : महाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सन 2014 ते 30 जून 2026 या कालावधीतील कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीबाबत केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांच्यासोबत कर्तव्य भवन, नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीदरम्यान महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना (रोहयो) मंत्री भरत गोगावले यांनी वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी, सार्वजनिक विहिरी तसेच इतर सार्वजनिक कामांच्या प्रलंबित निधीचा प्रश्न केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. राज्यातील प्रलंबित निधीबाबत केंद्र शासनाकडून आवश्यक कार्यवाही करून येत्या काही दिवसांत महाराष्ट्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी यावेळी दिले. या बैठकीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहसचिव रोहिणी भाजीभाकरे, रोजगार हमी विभागाचे सहसचिव अतुल कोदे तसेच महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. राज्यातील मनरेगा कामांचे प्रलंबित निधी लवकरच उपलब्ध झाल्यास विविध विकासकामांना गती मिळण्यासोबतच लाभार्थी आणि कामगारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अमरापुर येथील सुवर्ण बिंदू अर्बन निधी लिमिटेड पतसंस्था बंद खाते दारांना घातला कोटीचा गंडा पतसंस्था बंद करून संचालक फरार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल
    1
    अमरापुर येथील सुवर्ण बिंदू अर्बन निधी लिमिटेड पतसंस्था बंद 
खाते दारांना घातला कोटीचा गंडा पतसंस्था बंद करून  संचालक फरार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल
    user_Devidas Devadhe
    Devidas Devadhe
    पाथर्डी, अहमदनगर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • घोडनदी येथे जैन समाजाच्या चातुर्मासाला उत्साहात प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: घोडनदी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने यंदाच्या चातुर्मास-2026 सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला आहे. धर्मसभा मंडपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. यंदाच्या चातुर्मासात प्रवचन प्रभाविका ज्ञान प्रबोधिनी साध्वी पू. आभाश्रीजी म.सा., आगम ज्योती साध्वी पू. डॉ. महिमाश्रीजी म.सा. तसेच मधुर व्याख्यानी साध्वी पू. डॉ. श्रेयांश्रीजी म.सा. यांचे पावन सान्निध्य लाभले आहे. चातुर्मास काळात दररोज सकाळी ६.३० वाजता प्रार्थना, सकाळी ८.४५ ते ९.४५ या वेळेत प्रवचन, दुपारी २.३० वाजता महिलांसाठी धार्मिक वर्ग तसेच सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण आयोजित करण्यात आले आहे. चातुर्मासाची सुरुवात धर्मचक्र तपाने करण्यात आली असून अधिकाधिक भाविकांनी एकासना, आयंबिल, उपवास, दया, रात्री संवर व पौषध यांसारख्या धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धर्मचक्र तपस्वींच्या पारण्याची व्यवस्था श्री जैन युवा परिषद करणार असून चातुर्मास कालावधीत गौतम प्रसादीची व्यवस्था पंचायत भवन भोजनशाळेत करण्यात आली आहे. दर्शन, प्रार्थना, प्रवचन, धर्मचर्चा, मांगलिक व प्रतिक्रमणाचा लाभ घेऊन आत्मशुद्धी आणि कर्मनिर्जरा साधावी, असे आवाहन जैन श्रावक संघाने केले आहे. हा कार्यक्रम स्व. श्री सुखलालजी खाबिया धर्मसभा मंडप, पंचायत भवन, घोडनदी येथे होत आहे.
    2
    घोडनदी येथे जैन समाजाच्या चातुर्मासाला उत्साहात प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: घोडनदी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने यंदाच्या चातुर्मास-2026 सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला आहे. धर्मसभा मंडपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाच्या चातुर्मासात प्रवचन प्रभाविका ज्ञान प्रबोधिनी साध्वी पू. आभाश्रीजी म.सा., आगम ज्योती साध्वी पू. डॉ. महिमाश्रीजी म.सा. तसेच मधुर व्याख्यानी साध्वी पू. डॉ. श्रेयांश्रीजी म.सा. यांचे पावन सान्निध्य लाभले आहे.
चातुर्मास काळात दररोज सकाळी ६.३० वाजता प्रार्थना, सकाळी ८.४५ ते ९.४५ या वेळेत प्रवचन, दुपारी २.३० वाजता महिलांसाठी धार्मिक वर्ग तसेच सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण आयोजित करण्यात आले आहे.
चातुर्मासाची सुरुवात धर्मचक्र तपाने करण्यात आली असून अधिकाधिक भाविकांनी एकासना, आयंबिल, उपवास, दया, रात्री संवर व पौषध यांसारख्या धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धर्मचक्र तपस्वींच्या पारण्याची व्यवस्था श्री जैन युवा परिषद करणार असून चातुर्मास कालावधीत गौतम प्रसादीची व्यवस्था पंचायत भवन भोजनशाळेत करण्यात आली आहे.
दर्शन, प्रार्थना, प्रवचन, धर्मचर्चा, मांगलिक व प्रतिक्रमणाचा लाभ घेऊन आत्मशुद्धी आणि कर्मनिर्जरा साधावी, असे आवाहन जैन श्रावक संघाने केले आहे.
हा कार्यक्रम स्व. श्री सुखलालजी खाबिया धर्मसभा मंडप, पंचायत भवन, घोडनदी येथे होत आहे.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • वडिलांच्या सामाजिक कार्याचा आदर्श पाहत चिमुकलीने गुरुपौर्णिमा साजरी वडिलांच्या सामाजिक कार्याचा आदर्श पाहत चिमुकलीने गुरुपौर्णिमा साजरी
    1
    वडिलांच्या सामाजिक कार्याचा आदर्श पाहत चिमुकलीने गुरुपौर्णिमा साजरी
वडिलांच्या सामाजिक कार्याचा आदर्श पाहत चिमुकलीने गुरुपौर्णिमा साजरी
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    खेड, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
    3
    श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
    1
    जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.
    1
    हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर)
३१ जुलै :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर)
३१ जुलै :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे.
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०१ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०२ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०३ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०४ ऑगस्ट :
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण)
रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता.
दृश्यमानता कमी होण्याची शक्यता.
कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान.
असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान.
स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना.
विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे:
नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता.
सर्वसाधारण सूचना
जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात:
प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी.
प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे.
पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे.
धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे.
मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात:
मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे.
झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये.
विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत.
हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम
बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे.
भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे.
नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे.
सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे.
भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे.
वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे.
कृषी सल्ला
उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा.
खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी.
मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी.
भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • धाराशिव (उस्मानाबाद) येथील सोनारी जिल्हा परिषद शाळेला कुलुप.?
    1
    धाराशिव (उस्मानाबाद) येथील सोनारी जिल्हा परिषद शाळेला कुलुप.?
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • "स्वाभिमानी"च्या जिल्हा अध्यक्षाने बँक मॅनेजरच्या कानशिलात का लगावली !
    1
    "स्वाभिमानी"च्या जिल्हा अध्यक्षाने बँक मॅनेजरच्या कानशिलात का लगावली !
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.