Shuru
Apke Nagar Ki App…
Bageshvar Dham Sarkar In Jalgaon District : श्री हनुमान कथेत रमले मंत्री गुलाबराव पाटील !
Monu Pawar pawar
Bageshvar Dham Sarkar In Jalgaon District : श्री हनुमान कथेत रमले मंत्री गुलाबराव पाटील !
More news from Jalgaon and nearby areas
- जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि वादळाचा जबर तडाखा बसलाय. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यामुळं केळीच्या बागा आणि रब्बीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.1
- जळगाव-प्रविण पाटील | जळगाव शहरातील बेंडाळे महिला महाविद्यालय ते नवीन बस स्थानकांपर्यंत असलेल्या मुख्य रस्त्यांवर मोठ-मोठे असे असंख्य खड्डे पडलेले आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालय, खासगी कोचिंग क्लासेस, बँक, दवाखाने, क्रीडा संकुल, बस स्थानक इत्यादी आहेत. त्यामुळे विद्यार्थी, खेळाडू व रूग्णांची सतत ये-जा सुरू असते. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने "जळगावातील या रस्त्याचे नाव अपूर्णाव्यवस्थेत" या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करत नागरिक व वाहनधारकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. दरम्यान प्रकाशित केलेल्या वृत्तांची दखल घेत जळगाव मनपा प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डांच्या डागडुजी करण्यास सुरूवात केली. पहा याचा वृत्तांत...1
- धरणगाव-अविनाश बाविस्कर । धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे बागेश्वर धाम सरकार यांच्या श्री हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेत धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या दरबारचे आयोजनही करण्यात आलेले आहे. दरम्यान या कथेमध्ये जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. गुरूवारी २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत मंगळसूत्र लांबवणारी महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाली होती. या टोळीला धरणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे.1
- जळगाव: रोगमुक्त टिश्युकल्चर रोपांची लागवड करा आणि अधिक उत्पादन घ्या.1
- ज्योतिष मंडळातील दीपस्तंभ। अभिजित प्रतिष्ठान सिल्व्हर ज्युबिलि इव्हेंट -------------------- या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावें। श्री. सुनिल पुरोहित अभिजित प्रतिष्ठान -------------------- How to Develope your Destiny । वक्त्या सौ. श्वेता बोकील -------------------- ज्योतिष शास्त्रातील एक आगळा वेगळा कार्यक्रम - ज्योतिष अदालत । ॲस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी -------------------- श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिजित प्रतिष्ठान २५ वर्षपूर्ती निमित्त सिल्व्हर ज्युबिलि इव्हेंट हा दिनांक ०८ डिसेंबर २०२४ रोजी राजे संभाजी सांस्कृतिक भवन, मुलुंड, मुंबई येथे अगदी उत्साहात पार पडला.1
- जळगाव-प्रविण पाटील | जळगाव शहरात गजानन हॉस्पिटल प्रायोजित पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अनिल धाकू कांबळी यांना स्व. गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार देण्यात आला, तर प्रदीप कोकरे यांना स्व. दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार देण्यात आला. पहा वृत्तांत...1
- जळगाव-प्रविण पाटील | ओम साई मित्र मंडळांच्या वतीने जळगाव ते शिर्डी पर्यंत साईबाबा यांच्या पायी पालखीचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेची सुरूवात आज २८ डिसेंबरपासून झाली असून ४ जानेवारीला शिर्डीला पोहचणार आहे. गेल्या २० वर्षांपासून ओम साई मित्र मंडळाच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. पदयात्रेच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत प्रबोधन करण्यात आलेले आहे. पहा वृत्तांत..1
- जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमान कथेचे आयोजन करण्यात आलंय. मंत्री गुलाबराव पाटील यांनी कथास्थळी जाऊन कथा श्रवणाचा आनंद घेतला.1