Shuru
Apke Nagar Ki App…
कुणकेश्वरमध्ये सापडले प्राचीन कुंड;ग्रामस्थांकडून साफसफाई दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर परिसरात आणखी एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा दडलेला असल्याचा रोचक शोध समोर आला आहे. कुणकेश्वर मंदिरापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या खालचीवाडी येथील ओहोळाजवळ पुरातन गंगाकुंड असल्याची माहिती पुढे येत असून, स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत या दुर्लक्षित स्थळाला नवसंजीवनी दिली आहे. सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीचे किंवा त्याहूनही प्राचीन असावे, असा अंदाज वर्तवण्यात येणारे हे गंगाकुंड अनेक वर्षे गाळ, झाडाझुडपांचा पालापाचोळा आणि दुर्लक्षामुळे पूर्णतः बुजून गेले होते. वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढून, झाडाझुडपं हटवून गंगाकुंड पुन्हा मोकळं करण्यात आले.
MH07NEWS
कुणकेश्वरमध्ये सापडले प्राचीन कुंड;ग्रामस्थांकडून साफसफाई दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर परिसरात आणखी एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा दडलेला असल्याचा रोचक शोध समोर आला आहे. कुणकेश्वर मंदिरापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या खालचीवाडी येथील ओहोळाजवळ पुरातन गंगाकुंड असल्याची माहिती पुढे येत असून, स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत या दुर्लक्षित स्थळाला नवसंजीवनी दिली आहे. सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीचे किंवा त्याहूनही प्राचीन असावे, असा अंदाज वर्तवण्यात येणारे हे गंगाकुंड अनेक वर्षे गाळ, झाडाझुडपांचा पालापाचोळा आणि दुर्लक्षामुळे पूर्णतः बुजून गेले होते. वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढून, झाडाझुडपं हटवून गंगाकुंड पुन्हा मोकळं करण्यात आले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिक मध्ये काल एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संतापली होती, यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महिला विधेयक हे आधीच मंजूर झालेलं होत, परंतु महिला विधेयकाच्या आडून दुसरच विधेयक मांडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. विरोधी पक्षाची बदनामी करण्यासाठी हे विधेयक मांडल होत. परंतु त्यांच्या दुर्दैवाने भारतातील महिलाना माहिती झालं गॅसची दरवाढ, महागाई किती झाली. त्यामुळे नको त्या विषयाकडे लक्ष विचलित करायचा यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक प्रकार म्हणून नाशिक मध्ये महिलेने महिला आंदोलनाला विरोध केल्याने मंत्री गिरीश महाजन यांची त्रेधातिरपीट झाली. राज्यात सर्वत्र महिलांसाठी आंदोलन होत असताना प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे लोकांना भाजप सरकारची प्रतिमा माहिती झाली आहे.1
- Post by E city news network1
- कोल्हापूर ता.22 : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 25 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या 2 पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील कत्यानी कॉम्प्लेक्स ते नेहरुनगर, लक्ष्मीपूरी रिलायन्स मॉल मागे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्योच काम सुरु आहे. महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 50 कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने 476 नाल्यापैकी 130 लहान नाले व 20 मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये मुनष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बापूराम नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्रनगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपूरी, कोंबडी बझार, राजारामपूरी जनता बझार चौक, साईस एक्सटेशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसलेमळा, साळोखेमळा, सरदेसाई पाणंद, बुध्दविहार, समाज कल्याण ऑफिस अशा 130 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.1
- Post by MSN MARATHI1
- विषय: देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनियमितता व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाबाबत देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या गंभीर अनियमितता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. येथे नियुक्त असलेल्या दोन मेडिकल ऑफिसरपैकी एक डॉक्टर आज सकाळी 10.30 वाजता उशिरा हजर झाले, तर दुसरे डॉक्टर पूर्णपणे अनुपस्थित होते. नियमांनुसार दोन्ही डॉक्टरांनी केंद्राच्या ठिकाणी राहणे आवश्यक असताना देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या प्रकाराकडे तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, संबंधित आरोग्य अधिकारी साळुंखे हे नागरिकांशी उद्धट वर्तन करतात व योग्य प्रतिसाद देत नाहीत, अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी साळुंखे यांची तात्काळ येथून हकालपट्टी करण्यात यावी तसेच देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी, जबाबदार व सेवा देणारे डॉक्टर नेमण्यात यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर बाबींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. आपला विश्वासू, श्री रुपेश विश्वनाथ सुर्वे मास फॉर सिटीझन पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- Post by Nityanand More1
- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथे टोलनाका कार्यान्वित करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निविदा उद्या पर्यंत सादर करायच्या असून २४ एप्रिलला निविदा उघडली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर ३ महिन्यासाठी ही निविदा राबविण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे, मात्र टोल वसुलीला उबाठा सेनेने विरोध केला आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी तर टोल ला विरोध दर्शवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. नितीन गडकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले, त्यानंतर ओसरगाव येथे टोलनाका कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही या टोलला विरोध केला होता, आता देखील निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्याला आजही विरोध असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. १४ वर्ष झाली तरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नसल्याने या महामार्गाला टोलमाफी दिली पाहिजे होती. नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि इथले सत्ताधारी पक्षातील कोणीतरी टोल वसुलीसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. नितीन गडकरी जिल्ह्यात आल्यानंतर काही दिवसांत टोल वसुलीसाठी निविदा कशी निघते असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर वेळ पडल्यास आंदोलन करणार असल्याचं देखील म्हटलं आहे.1