मालपूर ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे अंडर ग्राउंड गटारिचे पाणी गल्लीत नागरिकांचा संताप. प्रतिनिधी :- संजय कोळी दोंडाईचा दोंडाईचा :- शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे प्रत्येक वार्डात अक्षरशहा घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांचा प्रादुर्भाव व दुर्गंधी युक्तवासाने नागरिक त्रस्त झाले आहेत . ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवक दुर्लक्ष करीत आहेत तरी वारंवार निवेदन व लेखी पत्र देऊन सुध्दा ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक काम करत नाही प्रशासक व ग्रामसेवक यांनी गल्लोगल्ली फिरुन वस्तीत येऊन पाहणी करावी. व नागरिकांच्यां आरोग्याशी खेळ खेळू नये. घाण व दुर्गंधी चे मतदार बोगस आहेत. बेफिकरी, बेजबाबदार प्रशासन व ग्रामविकास अधिकाऱ्यांनो जर बरेवाईट झाल्यास सर्वस्वी आपणच जबाबदार असणार सर्वप्रथम तुमच्यावरच कार्यवाही मनुष्य हानिचा दावा दाखल करण्यांत येईल. प्रशासक व ग्रामसेवक झोपले आहेत का येवढी सरकार निधी कुठे टाकतात. प्रशासक व ग्रामसेवक यांच्यावर संताप व्यक्त केला आहे . आठदिवसात संपूर्ण गटारी स्वच्छ न केल्यास प्रशासकाच्या दालनात आंदोलन करू असा इशारा गावातील नागरिक व महिला बांधवांनी दिलाआहे.

- धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि महसूल तसेच रेल्वे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र वाद उफाळून आला. योग्य मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा देण्यास नकार देत आक्रमक भूमिका घेतली.1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- aap ki kya ray hai1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार १ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव , *बातमी सोयगाव* जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.1
- चांदवडच्या जेआरजी विद्यालयात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान श्रीमंत कोकाटे शिव शाहु फुले आंबेडकर साहित्याचे व्याख्याते2
- पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे. आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला. तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.2
- धुळे शहरातील देवपूर भागात जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या विद्युत डीपीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कडाक्याच्या उन्हामुळे डीपीने क्षणार्धात पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.1