Shuru
Apke Nagar Ki App…
पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी गेल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विक्रम खुटवड नाराज विक्रम शिंदे / भोर दि.18 पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस वीरधवल जगदाळे यांची तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मात्र भोर तालुक्याची संधी गेल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मात्र भोंगवली कामथडी गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले भोरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विक्रम खुटवड यांना अध्यक्षपदी संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी गेल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विक्रम खुटवड नाराज विक्रम शिंदे / भोर दि.18 पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस वीरधवल जगदाळे यांची तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मात्र भोर तालुक्याची संधी गेल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मात्र भोंगवली कामथडी गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले भोरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विक्रम खुटवड यांना अध्यक्षपदी संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पिंपरी चिंचवड : - खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात, पवन छगन उजगरे, सुमित हनुमंत कराड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, या कारवाईत पोलिसांनी दोन रिक्षा, दोन कोयते, मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम असा 5 लाख 16 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केलाय, आरोपींना अटक केल्याने भोसरी आणि सांगवी पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली आहे....2
- तासगाव प्रतिनिधी अट्रोसिटी कायद्यातील तातडीच्या अटकेची तरतूद शिथिल करण्याचा सरकारचा निर्णय हा दलितांवरील अत्याचारांना प्रोत्साहन देणारा असल्याचा आरोप राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर पँथर सेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दंडाला काळी फित बांधून समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “अट्रोसिटी कायद्यातील बदल हे संविधानविरोधी असून दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या अधिकारांवर गदा आणणारे आहेत,” असे मत प्रशांत केदार व राज्य संपर्क प्रमुख युनूस कोल्हापूरे यांनी व्यक्त केले. तहसीलदार अतुल पाटोळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, अट्रोसिटी कायदा हा केंद्र सरकारचा असून राज्य सरकारने केवळ त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. मात्र तातडीची अटक थांबवून आधी प्राथमिक तपासणी करण्याचा निर्णय हा पीडितांना न्याय मिळण्यात अडथळा निर्माण करणारा आहे. “तातडीची अटक शिथिल केल्यास गुन्हेगारांचे मनोबल वाढेल आणि पीडितांवर दबाव टाकण्याची शक्यता वाढेल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. तसेच, या निर्णयामुळे दलित आणि आदिवासी समाजाच्या विश्वासाला तडा गेल्याचे सांगत, हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात प्रमिला गावडे, विजयाताई माळी, निशांत आवळेकर, अंकुश केंगार, ऋषिकेश गुजले, श्रुष्टी कांबळे, गुरुनाथ धाबडे, राहुल साठे, नितीन जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. फोटो ओळ : दंडाला काळी फित बांधून समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या विरोधात निदर्शने करताना प्रशांत केदार, युनूस कोल्हापूरे, प्रमिला गावडे व अन्य कार्यकर्ते.1
- Post by Maharashtra 18 news1
- पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य मा. प्रा. डॉ. जयश्री मगदूम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षस्थान भूषवले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. जयश्री मगदूम यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी लक्ष्मीबाई पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिलेल्या खंबीर साथीसह शिक्षण क्षेत्रातील योगदानाची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागमय जीवनाचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी समर्पित केल्याचे सांगितले. या कार्यक्रमास विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. संगीता अहिवळे, कला शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. कामयानी सुर्वे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, बी. व्होक मास कम्युनिकेशनचे नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय हिंगणे, प्रा. स्वप्ना हजारे, डॉ. शुभदा लोंढे, डॉ. निळकंठ डहाळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.1
- Post by Shubham Jadhav1
- आज बारामती तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे अनेक पिकाचे भरघोस नुकसान झाले आहे1
- पिंपरी चिंचवड : - लोणावळ्यात सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत ४ आरोपींना अटक केली आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवत 97 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही रक्कम विविध बँकांच्या करंट अकाउंटमधून फिरवली जात होती. पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपीला लोणावळ्यातून अटक केली असून त्याच्याकडून लॅपटॉप, ७ मोबाईल सिम कार्ड, 14 डेबिट कार्ड आणि 5 बँक खात्यांची माहिती जप्त करण्यात आली.तपासात आरोपींनी 1 कोटींहून अधिक रकमेची सायबर फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना 1 टक्के कमिशन दिले जात होते. घटनेत चीन कनेक्शन देखील उघड झाले आहे...2
- Post by Maharashtra 18 news1
- Post by Shubham Jadhav1