Shuru
Apke Nagar Ki App…
काँग्रेसला महिलाविरोधी दाखविण्याचे षडयंत्र खा. रवींद्र चव्हाण यांचा पत्रकार परिषदेतून भाजपवर आरोप
Jafar tarodekar
काँग्रेसला महिलाविरोधी दाखविण्याचे षडयंत्र खा. रवींद्र चव्हाण यांचा पत्रकार परिषदेतून भाजपवर आरोप
More news from Maharashtra and nearby areas
- पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी - परभणी मार्गावर पिंगळी शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.२१) रात्री केलेल्या कारवाईत ८३ हजारांचा चार किलो गांजा जप्त केला आहे. पिंगळी ते परभणी मार्गावरील गोकुळनाथ उपहारगृह व रसवंती समोरील सार्वजनिक रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण ८४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एकूण ८३ हजार ६०० रूपयांचा चार किलो १८० गॅम गांजा व एक हजार रूपयांची सुटकेस आसा एकूण ८४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुरनं ११६/२०२६ मध्ये एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईत आरोपी प्रदिप सिताराम फुलमाळी राहणार साठे नगर परतुर या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, दुधाटे, फड, क्षिरसागर, ढगे, रफीयोद्दीन, हनवते, सायबर चे गणेश कौटकर यांच्या पथकाने केली.1
- Post by Mohsin ahmed khan1
- परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण1
- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची संत नामदेव कॉटन मार्केट यार्डात पाहणी; शेतकरी व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संत नामदेव कॉटन मार्केट यार्ड, हळद मार्केट येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाजारातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत शेतकरी तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, मालाच्या विक्री प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांची माहिती घेतली. तसेच व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्याही त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. बाजारातील सुविधा, व्यवस्थापन आणि व्यवहारातील पारदर्शकता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारातील व्यवहार सुरळीत पार पडावेत यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.4
- Post by वैजनाथ पावडे1
- पैठण-शेवगाव मार्गावर दगडफेक; अज्ञातांकडून वाहनांवर हल्ला ! पैठण : गोलनाका ते शेवगाव रोडदरम्यान अज्ञात चार ते पाच जणांकडून ये-जा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्याचे दिसून आले असून, स्वास्तिक गोलनाका परिसरात वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि काही काळ वाहतूकही ठप्प झाली.1
- परभणी शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीसाठी शिवसेना उबाठा पक्ष मनपा नगरसेविका प्रतिमा अतुल सरोदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा शुक्रवारी २४ एप्रिल रोजी होईल. महापालिकेच्या प्रभााग समिती अ सभापतीपासाठी रईस खान सरफराज खान शिवसेना उबाठा, प्रभाग समीती ब- खान मुसद्दीक खान नुरुल्ला खान कॉग्रेस, प्रभाग समिती क- तबस्सुम वसीम शेख राष्ट्वादी काँग्रेस , समाजकल्याण सभापतीसाठी प्रा. राजेश रणखांबे शिवसेना उबाठा, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी अमोल जाधव कॉग्रेस, स्थापत्य समिती सायरा बैगम अलीमोद्दीन काजी शिवसेना उबाठा, वैद्यकीय व आरोग्य सभापती अबोली अनिल कांबळे शिवसेना उबाठा, शहर सुधार समिती शुभांगी शुभम पाष्टे शिवसेना उबाठा, माध्यमिक पुर्व माध्यमिक व तांत्रिक समिती सभापती शमदा बेगम सय्यद इलाही कॉग्रेस, विधी समिती सभापती रुखसाना बेगम अब्दुल हमीद जागीरदार कॉग्रेस यांनी आज बुधवार २२ एप्रिल रोजी अर्ज दाखल केले.1
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील राजुरा (बु) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे ४७ वे वर्ष सुरू झाले आहे. या धार्मिक सोहळ्याची सुरुवात २२ एप्रिल २०२६ रोजी झाली असून सांगता २९ एप्रिल रोजी होणार आहे. या सप्ताहात दररोज काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन व हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच विविध कीर्तनकारांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांना व्यसनमुक्त जीवनाचा मार्ग दाखवणे व समाजात सद्गुणांची जोपासना करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. दि २२/०४/०४/२०२६ बुद्ध बुधवार हरिभक्त कीर्तनकार भागवताचार्य. ह.भ.प.ब्रम्हानंद महाराज जाहुरकर दि २३/०४/२०२६ गुरुवारी हरिभक्त कीर्तनकार ह भ प.सुधिर महाराज पळशीकर. दि /२४/०४/२०२६ शुक्रवार हरिभक्त कीर्तनकार ह भ प भागवताचार्य संतोष पुरी चोळाखेकर. दि २५/०४/२०२६ शनिवार हरिभक्त कीर्तनकार श्री ह.भ.प.विनोदाचार्य. विकास महाराज गजगे बोधीरकर. दि.२६/०४/२०२६ रविवार हरिभक्त कीर्तनकार. श्री ह भ प.विनोदाचार्य, प्रशांत महाराज बलयुलकर (धाराशिव) दि २७/०४/२०२६/सोमवार हरिभक्त कीर्तनकार ह भ प.शिवचरित्रकार किशोर महाराज कोकाटे आळंदी देवाची. दि २८/०४/२०२६ मंगलवार हरिभक्त कीर्तनकार ह भ प.विनोदाचार्य. पांडुरंग महाराज उगले बिग. दि २९/०४/२०२६ बुधवार हरिभक्त कीर्तनकार वारकरी भुषण. माऊली महाराज शिदगीकर. हा सोहळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे होत असून ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. आयोजन भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी GS24X7 न्यूज मारोती पाटील वडजे उंद्रीकर यांचा खास रिपोर्ट1
- हॉस्पिटलमधील वाढती लूट थांबवण्यासाठी शासन-प्रशासनाने कडक पावले उचलावीत नांदेड जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गरीब व कष्टकरी वर्गासाठी आजारपण हे दुहेरी संकट ठरत आहे—एकीकडे आरोग्याचा प्रश्न, तर दुसरीकडे आर्थिक ओझे. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, गरीब माणूस आयुष्यभर कष्ट करून जेवढी कमाई करतो, त्यापेक्षा जास्त खर्च काही दिवसांच्या उपचारासाठी करावा लागतो. औषधांचे दर, तपासण्या, आयसीयू शुल्क, डॉक्टर फी—या सर्व गोष्टींमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो. अनेक रुग्णालयांमध्ये बिलांचा तपशील स्पष्ट दिला जात नाही, ज्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये संभ्रम आणि असहायता निर्माण होते. या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णालयांच्या शुल्कांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस धोरणे आखली पाहिजेत. तसेच, प्रत्येक रुग्णालयाने उपचारांचे दर स्पष्टपणे दर्शवणे बंधनकारक करावे. आरोग्य सेवा ही व्यवसाय नसून सेवा आहे, ही भावना पुन्हा रुजवण्याची वेळ आली आहे. सरकारी रुग्णालयांची सेवा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर सरकारी रुग्णालयांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या, तर नागरिकांचा कल खासगी रुग्णालयांकडे कमी होईल आणि आर्थिक शोषणावर आळा बसेल. या संदर्भात A. P. J. Abdul Kalam यांच्या विचारांची आठवण होते—“समाजाच्या विकासासाठी आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत.” त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे. यासंदर्भात *एस. के. बबलू (अध्यक्ष)* डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समिति,मुखेड यांनी देखील प्रशासनाकडे मागणी केली आहे की, नांदेड येथील काही खासगी रुग्णालयांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. गरिबांच्या घामाच्या पैशावर होणारी ही लूट थांबवण्यासाठी ठोस निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. शेवटी, रुग्णांच्या हितासाठी पारदर्शक, सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हेच खरे लोककल्याणकारी शासनाचे लक्षण आहे.1