Shuru
Apke Nagar Ki App…
१ ते १५ मे या कालावधीत स्वगणना मोहिम - परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
Max Parbhani Live
१ ते १५ मे या कालावधीत स्वगणना मोहिम - परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Jafar tarodekar1
- पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी - परभणी मार्गावर पिंगळी शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.२१) रात्री केलेल्या कारवाईत ८३ हजारांचा चार किलो गांजा जप्त केला आहे. पिंगळी ते परभणी मार्गावरील गोकुळनाथ उपहारगृह व रसवंती समोरील सार्वजनिक रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण ८४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एकूण ८३ हजार ६०० रूपयांचा चार किलो १८० गॅम गांजा व एक हजार रूपयांची सुटकेस आसा एकूण ८४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुरनं ११६/२०२६ मध्ये एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईत आरोपी प्रदिप सिताराम फुलमाळी राहणार साठे नगर परतुर या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, दुधाटे, फड, क्षिरसागर, ढगे, रफीयोद्दीन, हनवते, सायबर चे गणेश कौटकर यांच्या पथकाने केली.1
- Post by Mohsin ahmed khan1
- छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार : महिलेने केला महिलेचा खून ! महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बोकाळली असे आपल्याला वाटते का ? कॉमेट करून सांगा छत्रपती संभाजीनगर शहरात आज बुधवारी अवघ्या काही तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या हत्याकांडांनी मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळूज महानगर (बजाजनगर) परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली, तर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- लातूर : लातूरमध्ये बुलेट मोटारसायकलचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली : लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात उभी असलेली बुलेट मोटारसायकल अचानक पेट घेऊन जोरदार आवाजासह फुटल्याची धक्कादायक एकच खळबळ उडाली.. या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बुलेट मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक पेट घेतला आणि त्यानंतर स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलेटला लागलेल्या आगीचे आणि स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, इंधन गळती किंवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमागील नेमके अद्याप स्पष्ट आहे.4
- परभणी शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीसाठी शिवसेना उबाठा पक्ष मनपा नगरसेविका प्रतिमा अतुल सरोदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा शुक्रवारी २४ एप्रिल रोजी होईल. महापालिकेच्या प्रभााग समिती अ सभापतीपासाठी रईस खान सरफराज खान शिवसेना उबाठा, प्रभाग समीती ब- खान मुसद्दीक खान नुरुल्ला खान कॉग्रेस, प्रभाग समिती क- तबस्सुम वसीम शेख राष्ट्वादी काँग्रेस , समाजकल्याण सभापतीसाठी प्रा. राजेश रणखांबे शिवसेना उबाठा, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी अमोल जाधव कॉग्रेस, स्थापत्य समिती सायरा बैगम अलीमोद्दीन काजी शिवसेना उबाठा, वैद्यकीय व आरोग्य सभापती अबोली अनिल कांबळे शिवसेना उबाठा, शहर सुधार समिती शुभांगी शुभम पाष्टे शिवसेना उबाठा, माध्यमिक पुर्व माध्यमिक व तांत्रिक समिती सभापती शमदा बेगम सय्यद इलाही कॉग्रेस, विधी समिती सभापती रुखसाना बेगम अब्दुल हमीद जागीरदार कॉग्रेस यांनी आज बुधवार २२ एप्रिल रोजी अर्ज दाखल केले.1
- निलंगा तालुक्यात धक्कादायक घटना ... ५२ वर्षीय महिलेवर घरात घुसून बलात्कार.... आरोपीने हात-पाय बांधून केला अत्याचार... #ZEE 24 TAAS1
- Post by Today One Live1