घरकुलासाठी जे पात्र आहेत त्यांना प्रत्येकांना घरकुल मिळायला हवे जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा- खासदार डॉ. शिवाजी काळगे लातूर (प्रतिनिधी)जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी योग्य नियोजन करावे आणि घरकुलाचे अनुदान कोणत्याही विलंबाशिवाय दिले जाईल यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष तथा खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज दिशा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहूल कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी, अशासकीय सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत योजनांच्या लाभार्थी वयोवृद्ध व्यक्तींच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामात येत असलेल्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही खासदार डॉ. काळगे यांनी सांगितले. सध्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने कृषी विभागाने तत्काळ अहवाल तयार करून शासनाकडे पाठवावा आणि पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक करून नुकसानीची अचूक नोंद करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेण्यात यावीत, तसेच पोषण आहाराच्या बाबतीत सर्व आवश्यक निकष काटेकोरपणे पाळले जावेत, असेही त्यांनी सांगितले. यावर्षी जिल्ह्यातील एकही गाव स्मशानभूमीविना राहू नये, यासाठी व्ही. बी. जी. राम जी आणि जिल्हा वार्षिक योजनेतून कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना आमदार विक्रम काळे यांनी यावेळी दिल्या. तसेच शहरी व ग्रामीण भागात एकही अंगणवाडी इमारतीविना राहू नये आणि सर्व अंगणवाड्यांना स्वतःची इमारत मिळावी, यासाठी जिथे जागा उपलब्ध नाही तिथे ती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण हा बालकांच्या शिक्षण व पोषणाचा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर भुयारी गटार योजनेची कामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. भुयारी गटाराच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांची वेळेत दुरुस्ती न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. आगामी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक गावात व्ही. बी. जी. राम जी योजनेतून किमान एकतरी काम सुरू करावे, असे त्यांनी सांगितले. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता अवैध पाणी उपसा रोखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिका, महसूल आणि पोलिस विभागाने संयुक्त पथक स्थापन करून आवश्यक कार्यवाही करावी, अशा त्यांनी दिल्या. प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय इंगळे यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीत केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. लोकप्रतिनिधी, अशासकीय सदस्य यांनीही यावेळी आपल्या सूचना मांडल्या. तसेच योजनांच्या अंमलबजावणीविषयी संबंधित शासकीय विभाग प्रमुखांनी माहिती दिली. सूत्रसंचालन जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी केले.

- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला.3
- दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला?? निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!! तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!! महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?1
- नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.4
- रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी1
- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न1
- ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला1
- कंदलगावात घरफोडीसह जबरी चोरी; दोन ठिकाणी महिलांना मारहाण. सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला; दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी व जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आठ जणांच्या टोळक्याने परिसरात धुमाकूळ घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव गौरप्पा कोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून तेथील दोन वयोवृद्ध महिलांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कंदलगाव मधील विंचूर रोड लगत असलेल्या बुद्धाप्पा घोडके यांच्या वस्तीवरही चोरट्यांनी धाड टाकल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घोडके वस्ती या ठिकाणीही महिलांना मारहाण करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवण्यात आला असल्याचे घोडके कुटुंबीयांनी सांगितले . सदर घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन डी.वाय.एसपी गणेश शिंदे पाटील , पी.एस.आय अमितकुमार करपे आणि पी.एस.आय राज डांगे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पंचनामे, फिंगरप्रिंट सह श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकास पाचरण करत घटनास्थळी पाहणी करून तपास यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. दरम्यान, कंदलगाव परिसरात अलीकडील काळात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे तसेच शक्य असल्यास घर, वस्ती आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन मंद्रूप पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.1
- लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.1