वाशिम शहरातील कौवा गँग'च्या म्होरक्यावर प्राणघातक हल्ला प्रकरण तापलं! वाशीम शहरातील आय यु डी पी कॉलनी परिसरातील मनिष मार्बल जवळील चौकात १० सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या कौवा गँग'चा म्होरक्या अभिषेक भुजाडे (वय २०) या युवकावर कुणाल उर्फ शेट्टी धबाले आणि त्याच्या साथीदारांनी चाकूने सपासप वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी वाशीम शहर पोलिसांत चौघांविरुद्ध बीएनएस (BNS) १०९(१), ३(५) अन्वये प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. *भांडण सोडवणे पडले महाग* रितेश सुभाष भुजाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ अभिषेक हा १० सप्टेंबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास मित्र रोशन शिरसाटसोबत महेश सारस्कर याला सोडण्यासाठी आययूडीपी (IUDP) कॉलनी येथे जात होता. मनिष मार्बल चौकात तुषार वाघमारे, अमन धबाले, कुणाल उर्फ शेट्टी धबाले आणि गोविंद ठोंबरे पाटील हे महेश सारस्कर याच्याशी वाद घालत होते. हा वाद सोडवण्यासाठी अभिषेक मध्यस्ती करण्यास गेला असता, आरोपींनी त्याच्यावरच हल्ला चढवला. *"याला जिवंत मारून टाका..." आणि चाकूने केले सपासप वार* वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी अत्यंत आक्रमक होत अभिषेकला शिवीगाळ केली. तुमची भांडणात मध्यस्ती करण्याची हिम्मत कशी झाली ? याला जिवंत मारून टाका" असे म्हणत कुणाल उर्फ शेट्टी धबाले याने जवळील चाकू काढून अभिषेकच्या पाठीवर आणि डोक्यात सपासप वार केले. गंभीर दुखापत झाल्याने अभिषेक रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. घटनेनंतर चौघेही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिषेकला तातडीने वाशीमच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अकोला आणि त्यानंतर प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने नागपूर येथील मेयो शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सलग दोन-तीन दिवस व्हेंटिलेटरवर जिंदगीशी झुंज दिल्यानंतर अभिषेक शुद्धीवर आला, त्यानंतर या भीषण घटनेचा उलगडा झाला. अभिषेकच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. याप्रकरणी वाशीम शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन तुषार वाघमारे, अमन धबाले, कुणाल उर्फ शेट्टी धबाले आणि गोविंद ठोंबरे पाटील या चौघांना अटक केल्याची माहिती वाशिम शहर पोलिसांनी दिली.

- महिना उलटला पाऊस नाही, विहिर बोरवेलला पुरेसे पाणी असूनही शेतातील वीज गुल,खरीप पिके धोक्यात,शेतकऱ्याचा टाहो हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके हातची गेली आहेत,तूर ,कापूस, सोयाबीन,हळद ही पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहे.एकंदरीत तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.महिनाभरापासून पाऊस नाही विहिरी बोरला पुरेशी पाणी असताना देखील शेतातील वीज वारंवार गुण होत आहे त्यामुळे मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही,अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे कळमनुरी तालुक्यातील सांडस परीसरात शेतकऱ्यांनी या समस्या बद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे .1
- “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक" “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"1
- बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.3
- आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.3
- बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!1
- मंजूर झालेले सोलर संबंधित सोलर कंपनीने बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सोलर तात्काळ बसून देण्याची सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांची महावितरण कडे मागणी मंजुर सोलर परंतु न बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्या अभावी नुकसान! (शेतकऱ्यांनी वर्ग संबंधित ऑफिसमध्ये मारतात चक्ररा) तात्काळ सोलर बसवावे जाधव यांनी केली मागणी, मालेगाव प्रतिनिधी,दि,१५:- पावसाने तर मारली दांडी परंतु सोलर व महावितरण अधिकारी पण देत आहेत उडवा उडी चे उत्तर, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेतातील हळद सोयाबीन इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे नुकसान शासन दरबारी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलर सह इतर योजना असल्या तरी मात्र पात्र लाभार्थ्यांनी दोन दोन तीन तीन महिने पूर्वी लागणारी कागदपत्रे व सोलर साठी लागणारी रक्कम ची भरणा केली परंतु अद्यापही त्यांना सोलर कंपनी मार्फत सोलर तसेच महावितरण कंपनीकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून खंत शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत, मालेगाव तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध सोलर कंपन्याकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत, अमानी येथील शेतकरी राजू भिमराव गवळी,व अनिल गंगाराम जाधव यांनी मागील दोन - महीन्यापृर्वी सोलर साठी,ओस्वाल कंपनी साठी ऑनलाइन अर्ज केला तसेच लागणारी रक्कम सुद्धा भरली परंतु अद्याप यांच्या शेतात बोरवर सोलर बसवण्यात आले नसल्याने यांचे हळद ,सोयाबीन इतर पिक वाळून चालले यांनी मालेगाव महावितरण कंपनीकडे तसेच वाशिम कंपनीकडे चकरा मारून परेशान झाले असता आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय वाशिम संदीप दत्तात्रेय दरवडे यांची प्रत्यक्ष भेट सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव तसेच शेतकरी राजु गवळी यांनी घेतली असता, त्यांनी संबंधित महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्हि बी चव्हाण, तसेच ओसवाल कंपनीचे विनोद ब्रह्मेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात सांगितले, याबाबत ओबीसी सेलचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी यांनी सुद्धा दूरध्वनीवरून साहेबांशी संपर्क साधून विचारणा केली, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी थेट महावितरण चे वरिष्ठ अधीक्षक दरवडे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली व त्यांनी तात्काळ दाखल घेऊन दोनच दिवसात सोलर बसवल्या जातील असे यावेळी जाधव यांना सांगितले, जाधव यांनी महावितरण व सोलर कंपनी वाले शेतकऱ्याकडून पैशाची मागणी देखील करतात असे सांगितले असता, दरवडे म्हणाले ज्यांनी पैशाची मागणी केली असेल त्यांना डायरेक्ट लाच लुचपत विभागाकडे तक्रार करून पकडून द्या , काही शेतकरी तर आमचे अधिकाऱ्यांचे पाय धरायचे राहिले हो साहेब असे म्हणाले तेव्हा या बाबीची तात्काळ दखल घेऊन पात्र परंतु सोलर पासून वंचित असलेले सर्व शेतकऱ्यांचे सोलर तात्काळ बसून द्यावे अशी मागणीही अनिल जाधव यांनी यावेळी केली2
- शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; शेतकरी वर्ग आक्रमक प्रस्तावित शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी वर्ग आक्रमक झाले असल्याचे दिसून आले चोंडी येथे शेतकरी बांधवांनी तिव्र विरोध दर्शविला1
- हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कृषी विभागाला निर्देश जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीकनिहाय अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक झाली. बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची सद्य:स्थिती तसेच दुष्काळाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शिवाजी बुचाले, जिल्ह्याचे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती. जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ७९५.३ मि.मी. आहे. १३ सप्टेंबरअखेर ५०१.५ मि.मी. पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ६३.१ टक्के आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ ३०.२ टक्के पाऊस झाला आहे. या कालावधीत १४ ते १८ दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्येही आतापर्यंत केवळ १७.५ मि.मी. पाऊस झाला आहे. या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निकषानुसार आवश्यक त्या उपाययोजनेसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा. कृषी विभागासह वरिष्ठ भूवैज्ञानिक, पशुसंवर्धन विभागाने समन्वय ठेवत आवश्यक ती कार्यवाही तत्काळ पार पाडावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले.1
- ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड1