छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. या वेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दर्शनानंतर विभागीय आयुक्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर बाह्य विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली. भाविकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा बळकट करणे तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती आयुक्तांना देण्यात आली. विकासकामांचा आढावा घेताना विभागीय आयुक्तांनी कामांची गुणवत्ता, नियोजन आणि वेळेत पूर्णत्व यावर भर देत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे, मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुरेंद्र डफाळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. या वेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दर्शनानंतर विभागीय आयुक्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर बाह्य विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली. भाविकांसाठी आधुनिक
व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा बळकट करणे तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती आयुक्तांना देण्यात आली. विकासकामांचा आढावा घेताना विभागीय आयुक्तांनी कामांची गुणवत्ता, नियोजन आणि वेळेत पूर्णत्व यावर भर देत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे, मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुरेंद्र डफाळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
- छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. या वेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दर्शनानंतर विभागीय आयुक्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर बाह्य विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली. भाविकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा बळकट करणे तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती आयुक्तांना देण्यात आली. विकासकामांचा आढावा घेताना विभागीय आयुक्तांनी कामांची गुणवत्ता, नियोजन आणि वेळेत पूर्णत्व यावर भर देत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे, मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुरेंद्र डफाळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.2
- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये वानरांच्या टोळ्यांमुळे खरीप हंगामातील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. परिसरामध्ये पेरणी केलेल्या कोवळ्या सोयाबीन पिकात वानर हैदोस घालत असून वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान केले जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पिके वाचवण्यासाठी या वानरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.1
- दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात आणि लोकशाहीवर झालेल्या लाठीच्या प्रहाराच्या निषेधार्थ परभणीत वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारला आहे. दिल्लीतील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडी परभणीत आक्रमक झाली आहे.1
- पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे आज पशु लसीकरण आणि लंपी रोगावर निदान शिबिर पार पडले आहे.1
- जालना जिल्ह्यातील मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने ओबीसी सेलच्या सरचिटणीसपदी सारिका वरणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे सत्कार करण्यात येत आहेत.1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्रतर्फे २३ जुलै २०२६ रोजीच्या महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.1
- दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाथरीमध्ये कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. या घटनेच्या विरोधात पाथरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.1
- देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या NEET पेपर लीकच्या गंभीर प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या संवेदनशील मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय विधान केलं आहे, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे.1