Shuru
Apke Nagar Ki App…
लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्रतर्फे २३ जुलै २०२६ रोजीच्या महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.
सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्रतर्फे २३ जुलै २०२६ रोजीच्या महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्रतर्फे २३ जुलै २०२६ रोजीच्या महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.1
- नांदेडच्या देगलूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.2
- नीट पेपर फुटी प्रकरणी जंतर मंतर येथील आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या या महाराष्ट्र बंदला नांदेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंददरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनात सर्वपक्षीय नेतेही सहभागी झाले होते.1
- दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात आणि लोकशाहीवर झालेल्या लाठीच्या प्रहाराच्या निषेधार्थ परभणीत वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारला आहे. दिल्लीतील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडी परभणीत आक्रमक झाली आहे.1
- छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. या वेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दर्शनानंतर विभागीय आयुक्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर बाह्य विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली. भाविकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा बळकट करणे तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती आयुक्तांना देण्यात आली. विकासकामांचा आढावा घेताना विभागीय आयुक्तांनी कामांची गुणवत्ता, नियोजन आणि वेळेत पूर्णत्व यावर भर देत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे, मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुरेंद्र डफाळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.2
- पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे आज पशु लसीकरण आणि लंपी रोगावर निदान शिबिर पार पडले आहे.1
- लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवून धडाकेबाज कामगिरी केली आहे. या कारवाईत दोन सराईत वाहनचोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून २ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ८ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील एकूण आठ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पहिल्या पथकाने बरकत नगर, लातूर येथे सापळा रचून तोहित ऊर्फ तोह्या अकबर पठाण (वय २५ वर्षे, रा. हणमंतवाडी, कव्हा नाका, लातूर, सध्या बरकत नगर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने लातूर शहरातून तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १,१५,००० रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून गांधी चौक पोलीस ठाणे, उदगीर शहर पोलीस ठाणे आणि पुणे शहरातील प्रत्येकी एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच दिवशी दुसऱ्या पथकाने मळवटी रोड, लातूर येथे छापा टाकून अमोल तेजराव नागरवाड (वय २६ वर्षे, रा. थोरलेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) याला ताब्यात घेतले. त्याने लातूर, निलंगा, गांधी चौक, विवेकानंद चौक आणि पुणे जिल्ह्यातील चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १,२०,००० रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या वाहनांमध्ये होंडा शाईन, हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो पॅशन प्लस, हिरो पॅशन प्रो, बजाज पल्सर आणि होंडा अक्टिव्हा या वाहनांचा समावेश आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, राजेश घाडगे, सहायक फौजदार सर्जेराव जगताप आणि अंमलदारांच्या पथकाने केली आहे.2
- विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे परभणीमध्ये तीव्र पडसाद उमटले असून या कारवाईचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी या लाठीचार्जविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.1