Shuru
Apke Nagar Ki App…
सोनम वांगचुक यांना त्यांच्या आंदोलन स्थळावरून हटवण्यात आले आहे. आंदोलन स्थळावरून त्यांना अशा प्रकारे हटवल्यामुळे थेट लोकशाहीचा खून झाला आहे.
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
सोनम वांगचुक यांना त्यांच्या आंदोलन स्थळावरून हटवण्यात आले आहे. आंदोलन स्थळावरून त्यांना अशा प्रकारे हटवल्यामुळे थेट लोकशाहीचा खून झाला आहे.
- Local News Marathiमुदखेड, नांदेड, महाराष्ट्र👏22 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आषाढी वारीच्या उत्साहात गोरेवाडी येथे अत्यंत भक्तीमय वातावरणात बहे-बोरगाव येथील संत परंपरेतील दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. दिंडीच्या प्रस्थानापूर्वी सकाळपासूनच संपूर्ण गाव विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमले होते. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी गावात भव्य रिंगण सोहळा पार पडला. तसेच, पिटू व शंकर गणपती शेळके यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा शेकडो वारकऱ्यांनी लाभ घेतला. टाळ, मृदंग, झांज आणि विण्याच्या गजरात "ज्ञानोबा तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल"च्या जयघोषाने संपूर्ण गोरेवाडी परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्याप्रसंगी सरपंच विवेक गायकवाड, प्रकाश गायकवाड आणि इतर भाविक भक्त उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून आणि त्यांचे पाय धुऊन वंदन केले. या सोहळ्यामुळे संपूर्ण खानापूर घाटमाता परिसर विठ्ठलमय झाला आहे.1
- आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. याप्रसंगी ग्रामविकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन, पुष्पहार अर्पण करत पालखीचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि पालकमंत्री स्वतः टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीसोबत चालले. यावेळी धर्मपुरी पालखीतळावर वारकरी भाविक व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण परिसर 'राम कृष्ण हरी' आणि 'ज्ञानोबा माऊली, तुकाराम' च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता, तर पोलीस बँड पथकाने भक्तीमय धून वाजवून पालखीचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प. श्री भावार्थ देखणे महाराज यांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड आणि तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी धर्मपुरी पालखीतळावर जिल्हा प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय पथक, वीज, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने वारकरी भाविकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात असून, जिल्हा परिषदेच्या वतीने हिरकणी कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच, भाविकांच्या पायांना आराम मिळण्यासाठी फूट मसाज मशीनची सोय करण्यात आली असून हजारो भाविक याचा लाभ घेत आहेत. यासोबतच वारकऱ्यांच्या तातडीच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य दूत आणि आरोग्य बाईक तैनात करण्यात आल्या आहेत.1
- दिल्लीमधील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात येत आहे.1
- पुण्यातील भोर येथे निवडणूक आयोगामार्फत मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम राबवली जात आहे. या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी केले आहे. मतदार यादी अद्ययावत व निर्दोष करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.1
- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कव्हे येथे संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा विसावा झाला आहे.1
- सरकारच्या हुकूमशाहीविरुद्ध लढा देणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आणि भारतातील प्रत्येक तरुणाच्या आवाजाला बळ देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दादर येथील शिवाजीपार्क येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी मुंबई ठाकरे शिवसेनेच्या वतीने या आंदोलनाला भेट देण्यात आली असून 'आजची एकजूट हीच उद्याच्या लोकशाहीची ताकद आहे' असा संदेश यादरम्यान देण्यात आला आहे.1
- दिल्लीत वातावरण चिघळले असून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. पोलिसांनी थेट विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्यामुळे येथील वातावरण अधिकच बिघडले आहे.1