logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार ; रोहित पगारीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी खामगाव : येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी रोहित पगारीया नामक व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दर गुरुवारी गुरांचा बाजार भरवला जातो. या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व विक्री होणाऱ्या जनावरांची रीतसर नोंद ठेवली जाते. इयर टॅगिंगशिवाय जनावरांच्या खरेदी-विक्रीवर पूर्णतः बंदी असून सर्व कामकाज कायदेशीर प्रक्रियेनुसार चालते. ​असे असतानाही, रोहित पगारीया या व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी व शिपायांबद्दल अत्यंत अश्लील व शिवीगाळयुक्त भाषेचा वापर केला. तसेच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून येणाऱ्या गोवंशाची व नंदीची परस्पर अवैध विक्री सुरू आहे.पास व वैद्यकीय प्रमाणपत्र न बनवता पैसे खाऊन जनावरे कसायांच्या हवाली केली जातात, असा गंभीर व बिनबुडाचा आरोप त्याने केला. याशिवाय त्याने पोलीस प्रशासनाबाबतही बदनामीकारक वक्तव्ये करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे व दोन समाजांत तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक विधान केले आहे.कोणताही अधिकृत पुरावा नसताना सार्वजनिक व्यासपीठावर खोटी माहिती पसरवून बाजार समितीची प्रतिमा मलीन करणे, शिवीगाळ करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी आरोपी रोहित पगारीयावर विविध कलमांन्वये तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.

3 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
3 hrs ago

कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार ; रोहित पगारीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी खामगाव : येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी रोहित पगारीया नामक व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती, संचालक, अधिकारी

व कर्मचाऱ्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दर गुरुवारी गुरांचा बाजार भरवला जातो. या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व विक्री होणाऱ्या जनावरांची रीतसर नोंद ठेवली जाते. इयर टॅगिंगशिवाय जनावरांच्या खरेदी-विक्रीवर पूर्णतः बंदी असून सर्व कामकाज कायदेशीर प्रक्रियेनुसार चालते. ​असे असतानाही, रोहित पगारीया या व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून

एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी व शिपायांबद्दल अत्यंत अश्लील व शिवीगाळयुक्त भाषेचा वापर केला. तसेच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून येणाऱ्या गोवंशाची व नंदीची परस्पर अवैध विक्री सुरू आहे.पास व वैद्यकीय प्रमाणपत्र न बनवता पैसे खाऊन जनावरे कसायांच्या हवाली केली जातात, असा गंभीर व बिनबुडाचा आरोप त्याने केला. याशिवाय त्याने पोलीस प्रशासनाबाबतही

बदनामीकारक वक्तव्ये करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे व दोन समाजांत तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक विधान केले आहे.कोणताही अधिकृत पुरावा नसताना सार्वजनिक व्यासपीठावर खोटी माहिती पसरवून बाजार समितीची प्रतिमा मलीन करणे, शिवीगाळ करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी आरोपी रोहित पगारीयावर विविध कलमांन्वये तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गवंढाळा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल अपूर्ण; संतप्त ग्रामस्थांचा पंचायत समितीत ठिय्या! खामगाव : तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायती मधील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि विकासकामांच्या अनियमिततेची चौकशी करून पूर्ण अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन मांडले. ​काही दिवसांपूर्वी गवंढाळा येथील रहिवासी गोपाल सतीश पांढरे आणि महेंद्र रमेश पाटील यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी गट विकास अधिकारी यांनी १० दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.त्यानुसार आज सोमवारी सादर करण्यात आलेला चौकशी अहवाल अत्यंत अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाने सादर केलेला अहवाल अपूर्ण असून तो आम्हाला अजिबात मान्य नाही.जोपर्यंत सर्व मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी होऊन पूर्ण अहवाल दिला जात नाही, तोपर्यंत पंचायत समितीतून उठणार नाही. गरज पडल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
    4
    गवंढाळा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल अपूर्ण; संतप्त ग्रामस्थांचा पंचायत समितीत ठिय्या!


खामगाव :  तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायती मधील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि विकासकामांच्या अनियमिततेची चौकशी करून पूर्ण अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन मांडले. ​काही दिवसांपूर्वी गवंढाळा येथील रहिवासी गोपाल सतीश पांढरे आणि महेंद्र रमेश पाटील यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी गट विकास अधिकारी यांनी १० दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.त्यानुसार आज सोमवारी सादर करण्यात आलेला चौकशी अहवाल अत्यंत अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाने सादर केलेला अहवाल अपूर्ण असून तो आम्हाला अजिबात मान्य नाही.जोपर्यंत सर्व मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी होऊन पूर्ण अहवाल दिला जात नाही, तोपर्यंत पंचायत समितीतून उठणार नाही. गरज पडल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष! ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष! ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह हजारो नागरिक, विद्यार्थी रॅलीत सहभागी... जळगाव जामोद(प्रतिनिधी): भारताच्या राष्ट्रध्वजाचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ११ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले. राष्ट्रभक्तीपर गीतांचे मंत्रमुग्ध करणारे स्वर, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि आसमंत दुमदुमून टाकणारा ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष यामुळे शहरातील वातावरण भारावून गेले होते. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर राष्ट्रप्रेमाचा उत्साह दिसून येत होता.‘देश प्रथम, राष्ट्र सर्वोच्च’ या भावनेने प्रेरित झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. विशेषतः युवा वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविला.यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे, नगराध्यक्ष गणेश दांडगे, डॉ. अपर्णा कुटे, उपाध्यक्ष कैलास पाटील, अनिल जयस्वाल, किशोर केला, शहर अध्यक्ष अजय वंडाळे, ग्रामीण अध्यक्ष संजय पांडव, बंडू पाटील, परिक्षित ठाकरे, निलेश शर्मा, पांडुरंग मिसाळ, शाकीर खान, अक्षय देशमुख, ऋषिकेश देशमुख, गणेश गिरे, वैभव अढाव यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. तसेच दि. न्यू. ईरा हायस्कूल आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, युवा वर्ग आणि मोठ्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान, समृद्ध वर्तमानाचा विश्वास आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प आहे. या भावनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासोबतच प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीचा तिरंगा सदैव उंच राहावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
    1
    भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष!
‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष!
‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह हजारो नागरिक, विद्यार्थी रॅलीत सहभागी...
जळगाव जामोद(प्रतिनिधी): 
भारताच्या राष्ट्रध्वजाचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ११ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले.
राष्ट्रभक्तीपर गीतांचे मंत्रमुग्ध करणारे स्वर, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि आसमंत दुमदुमून टाकणारा ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष यामुळे शहरातील वातावरण भारावून गेले होते. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर राष्ट्रप्रेमाचा उत्साह दिसून येत होता.‘देश प्रथम, राष्ट्र सर्वोच्च’ या भावनेने प्रेरित झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. विशेषतः युवा वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविला.यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे, नगराध्यक्ष गणेश दांडगे, डॉ. अपर्णा कुटे, उपाध्यक्ष कैलास पाटील, अनिल जयस्वाल, किशोर केला, शहर अध्यक्ष अजय वंडाळे, ग्रामीण अध्यक्ष संजय पांडव, बंडू पाटील, परिक्षित ठाकरे, निलेश शर्मा, पांडुरंग मिसाळ, शाकीर खान, अक्षय देशमुख, ऋषिकेश देशमुख, गणेश गिरे, वैभव अढाव यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
तसेच दि. न्यू. ईरा हायस्कूल आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, युवा वर्ग आणि मोठ्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान, समृद्ध वर्तमानाचा विश्वास आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प आहे. या भावनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासोबतच प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीचा तिरंगा सदैव उंच राहावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • साधू-संतांच्या नाराजीचीही सरकारला पर्वा नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साधू-संतांच्या नाराजीचीही सरकारला पर्वा नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
    1
    साधू-संतांच्या नाराजीचीही सरकारला पर्वा नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
साधू-संतांच्या नाराजीचीही सरकारला पर्वा नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जामनेर आगारातून एसटी बस गायब परिसरात खळबळ जामनेर आगारातून एसटी बस गायब झाल्याची घटना समोर आली आहे. जामनेर आगारातून एसटी बस गायब; परिसरात खळबळ जामनेर आगारातून एसटी बस गायब झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संबंधित विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर आगार परिसरातून एक एसटी बस उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकाराची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे समजते. या घटनेबाबत नेमकी बस कधी आणि कोणत्या परिस्थितीत आगारातून बाहेर गेली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. दरम्यान, या घटनेशी संबंधित काही दृश्ये उपलब्ध झाली असून, त्यामध्ये बसच्या हालचालींबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणात नेमके काय घडले, बस कोणी आणि कोणत्या कारणाने नेली, तसेच यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, याबाबत अधिकृत तपास पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आरोपी किंवा दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणी पोलिसांकडून किंवा संबंधित एसटी प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे नेमके चित्र स्पष्ट होईल. या घटनेबाबत पुढील अधिकृत अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला माहिती देऊ.
    1
    जामनेर आगारातून एसटी बस गायब परिसरात खळबळ जामनेर आगारातून एसटी बस गायब झाल्याची घटना समोर आली आहे.
जामनेर आगारातून एसटी बस गायब; परिसरात खळबळ
जामनेर आगारातून एसटी बस गायब झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संबंधित विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर आगार परिसरातून एक एसटी बस उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकाराची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे समजते.
या घटनेबाबत नेमकी बस कधी आणि कोणत्या परिस्थितीत आगारातून बाहेर गेली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.
दरम्यान, या घटनेशी संबंधित काही दृश्ये उपलब्ध झाली असून, त्यामध्ये बसच्या हालचालींबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, या प्रकरणात नेमके काय घडले, बस कोणी आणि कोणत्या कारणाने नेली, तसेच यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, याबाबत अधिकृत तपास पूर्ण होणे बाकी आहे.
त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आरोपी किंवा दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही.
या प्रकरणी पोलिसांकडून किंवा संबंधित एसटी प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे नेमके चित्र स्पष्ट होईल.
या घटनेबाबत पुढील अधिकृत अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला माहिती देऊ.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    11 hrs ago
  • चिखली:-माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक एक दीड वर्षांपासून शाळेतच आला नाही. कार्यालयीन कामकाजाचे नावावर शिक्षक सतत गैरहजर .. पगार मात्र सुरळीत सुरू. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर . सहावी ते आठवी चे विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान .
    1
    चिखली:-माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक एक दीड वर्षांपासून शाळेतच आला नाही.
कार्यालयीन कामकाजाचे नावावर शिक्षक सतत गैरहजर ..
पगार मात्र सुरळीत सुरू.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर .
सहावी ते आठवी चे विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान .
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार ; रोहित पगारीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी खामगाव : येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी रोहित पगारीया नामक व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दर गुरुवारी गुरांचा बाजार भरवला जातो. या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व विक्री होणाऱ्या जनावरांची रीतसर नोंद ठेवली जाते. इयर टॅगिंगशिवाय जनावरांच्या खरेदी-विक्रीवर पूर्णतः बंदी असून सर्व कामकाज कायदेशीर प्रक्रियेनुसार चालते. ​असे असतानाही, रोहित पगारीया या व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी व शिपायांबद्दल अत्यंत अश्लील व शिवीगाळयुक्त भाषेचा वापर केला. तसेच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून येणाऱ्या गोवंशाची व नंदीची परस्पर अवैध विक्री सुरू आहे.पास व वैद्यकीय प्रमाणपत्र न बनवता पैसे खाऊन जनावरे कसायांच्या हवाली केली जातात, असा गंभीर व बिनबुडाचा आरोप त्याने केला. याशिवाय त्याने पोलीस प्रशासनाबाबतही बदनामीकारक वक्तव्ये करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे व दोन समाजांत तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक विधान केले आहे.कोणताही अधिकृत पुरावा नसताना सार्वजनिक व्यासपीठावर खोटी माहिती पसरवून बाजार समितीची प्रतिमा मलीन करणे, शिवीगाळ करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी आरोपी रोहित पगारीयावर विविध कलमांन्वये तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.
    4
    कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार ;  रोहित पगारीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी


खामगाव : येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी रोहित पगारीया नामक व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे.  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दर गुरुवारी गुरांचा बाजार भरवला जातो. या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व विक्री होणाऱ्या जनावरांची रीतसर नोंद ठेवली जाते. इयर टॅगिंगशिवाय जनावरांच्या खरेदी-विक्रीवर पूर्णतः बंदी असून सर्व कामकाज कायदेशीर प्रक्रियेनुसार चालते. ​असे असतानाही, रोहित पगारीया या व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी व शिपायांबद्दल अत्यंत अश्लील व शिवीगाळयुक्त भाषेचा वापर केला. तसेच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून येणाऱ्या गोवंशाची व नंदीची परस्पर अवैध विक्री सुरू आहे.पास व वैद्यकीय प्रमाणपत्र न बनवता पैसे खाऊन जनावरे कसायांच्या हवाली केली जातात, असा गंभीर व बिनबुडाचा आरोप त्याने केला. याशिवाय त्याने पोलीस प्रशासनाबाबतही बदनामीकारक वक्तव्ये करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे व दोन समाजांत तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक विधान केले आहे.कोणताही अधिकृत पुरावा नसताना सार्वजनिक व्यासपीठावर खोटी माहिती पसरवून बाजार समितीची प्रतिमा मलीन करणे, शिवीगाळ करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी आरोपी रोहित पगारीयावर विविध कलमांन्वये तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कुरेशीपुरात घरात गोवंश मांसाची विक्री? अकोट पोलिसांचा छापा; २३५ किलो मांस जप्त, चौघे ताब्यात ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; डी.बी. पथकाची कारवाई... अकोला प्रतिनिधी : पूर्णाजी खोडके अकोट, दि. ११ : कुरेशीपुरा परिसरातील एका घरात गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अकोट शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत अंदाजे २३५ किलो गोवंश जातीचे मांस, किंमत ४७ हजार रुपये, जप्त करण्यात आले असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अकोट शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बाराहाते यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांना दिल्यानंतर त्यांच्या आदेशाने पोलीस पथकाने दोन पंचांसह कुरेशीपुरा परिसरातील संबंधित घरावर छापा टाकला. पोलिसांच्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान शे. इमरान शे. इस्माईल (३४), जमिल अहमद अब्दल हमीद (५५), शारुख खान हिरेखान (३४) आणि शे. मुकद्दर अब्दुल सत्तार कुरेशी (६१), सर्व रा. कुरेशीपुरा, अकोट, हे शे. इमरान शे. इस्माईल यांच्या घरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांसाचे तुकडे करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करून २३५ किलो मांस व इतर मुद्देमाल असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बाराहाते, पोहेकॉ गणेश सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल मोहन दुर्गे व अश्विन चौव्हाण यांच्या पथकाने केली.
    2
    कुरेशीपुरात घरात गोवंश मांसाची विक्री? अकोट पोलिसांचा छापा; २३५ किलो मांस जप्त, चौघे ताब्यात

४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; डी.बी. पथकाची कारवाई... 
अकोला प्रतिनिधी : पूर्णाजी खोडके
अकोट, दि. ११ : कुरेशीपुरा परिसरातील एका घरात गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अकोट शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत अंदाजे २३५ किलो गोवंश जातीचे मांस, किंमत ४७ हजार रुपये, जप्त करण्यात आले असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अकोट शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बाराहाते यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांना दिल्यानंतर त्यांच्या आदेशाने पोलीस पथकाने दोन पंचांसह कुरेशीपुरा परिसरातील संबंधित घरावर छापा टाकला.
पोलिसांच्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान शे. इमरान शे. इस्माईल (३४), जमिल अहमद अब्दल हमीद (५५), शारुख खान हिरेखान (३४) आणि शे. मुकद्दर अब्दुल सत्तार कुरेशी (६१), सर्व रा. कुरेशीपुरा, अकोट, हे शे. इमरान शे. इस्माईल यांच्या घरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांसाचे तुकडे करीत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करून २३५ किलो मांस व इतर मुद्देमाल असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बाराहाते, पोहेकॉ गणेश सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल मोहन दुर्गे व अश्विन चौव्हाण यांच्या पथकाने केली.
    user_पुर्णाजी खोडके
    पुर्णाजी खोडके
    प्रतिनिधी अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.