*समृद्धी महामार्गावर अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; 469 किलो गांजा जप्त* *दोन वेगवेगळ्या कारवायांत तब्बल 2 कोटी 64 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, समृद्धी महामार्गावर 6 ऑक्टोबर रोजी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल 469 किलो गांजा आणि दोन वाहने असा एकूण 2 कोटी 64 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी यापूर्वी अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्समध्ये कर्तव्य बजावले आहे. या अनुभवाचा फायदा वाशिम जिल्ह्यातील अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला होत असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात येत आहेत. *मालेगाव हद्दीत 126 किलो गांजा जप्त* समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नियमित पेट्रोलिंग नेमण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 ते 5.15 वाजताच्या सुमारास मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईट पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना महिंद्रा मॅक्स पिकअप क्रमांक MH-12-YQ-2085 हे मालवाहू वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळले. पोलिसांनी चालकाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहन सोडून फरार झाला. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 126 किलो गांजा आढळून आला. गांजा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 73 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. *कारंजा हद्दीत 343 किलो गांजा पकडला* दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 6 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजता कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी मोहीम राबविली. यावेळी आयशर ट्रक क्रमांक MH-04-JK-2446 थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चालकाने आपले नाव सुनील गणपतराव सूर्यवंशी, रा. लातूर असे सांगितले. वाहनातील मालाबाबत त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. वाहनाची झडती घेतली असता चालकाच्या कॅबिनमध्ये गुप्तपणे लपवून ठेवलेला 343 किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत 1 कोटी 71 लाख 50 हजार रुपये, तर वाहनाची किंमत 30 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत एकूण 2 कोटी 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांत 469 किलो गांजा* मालेगाव आणि कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 469 किलो गांजा तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2 कोटी 64 लाख 50 हजार रुपये आहे. दोन्ही प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, मालेगाव येथील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे, तर कारंजा येथील गुन्ह्याचा तपास कारंजा शहर पोलिसांकडे देण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे (कारंजा), रामकृष्ण पवार (वाशिम), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक अमर चोरे, मालेगावचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, जिल्हा वाहतूक शाखेचे सपोनि गोकुळसिंग राठोड यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली. या कारवाईत पोउपनि निलेश जाधव, सचिन गोखले, विशाल बोरकर, तसेच पोलीस अंमलदार गजानन वाणी, धनंजय अरखराव, उमेश गिन्हे, गजानन झगरे, ज्ञानदेव मात्रे, आशिष बिडवे, सुरज खडके, गजानन अवगळे, विनोद अवगळे, दिलीप देवकते, अमोल इरतकर, गोपाल चौधरी, संदीप दुतोंडे, विठ्ठल महाले, राजकुमार यादव, शाम इंगळे, सुनील तायडे, मयुरेश तिवारी, उमेशकुमार बिबेकर, अजय धनकर, मोहम्मद परसुवाले, अमित भगत, नितीन पाटील, अनिस निन्सुरवाले, अविनाश खिराडे, पोर्णिमा मोटे, नरेंद्र खाडे यांचा सहभाग होता. अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवायांमुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
*समृद्धी महामार्गावर अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; 469 किलो गांजा जप्त* *दोन वेगवेगळ्या कारवायांत तब्बल 2 कोटी 64 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, समृद्धी महामार्गावर 6 ऑक्टोबर रोजी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल 469 किलो गांजा आणि दोन वाहने असा एकूण 2 कोटी 64 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी यापूर्वी अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्समध्ये कर्तव्य बजावले आहे. या अनुभवाचा फायदा वाशिम जिल्ह्यातील अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला होत असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात येत आहेत. *मालेगाव हद्दीत 126 किलो गांजा जप्त* समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नियमित पेट्रोलिंग नेमण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 ते 5.15 वाजताच्या सुमारास मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईट पेट्रोलिंगदरम्यान
पोलिसांना महिंद्रा मॅक्स पिकअप क्रमांक MH-12-YQ-2085 हे मालवाहू वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळले. पोलिसांनी चालकाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहन सोडून फरार झाला. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 126 किलो गांजा आढळून आला. गांजा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 73 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. *कारंजा हद्दीत 343 किलो गांजा पकडला* दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 6 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजता कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी मोहीम राबविली. यावेळी आयशर ट्रक क्रमांक MH-04-JK-2446 थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चालकाने आपले नाव सुनील गणपतराव सूर्यवंशी, रा. लातूर असे सांगितले. वाहनातील मालाबाबत त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. वाहनाची
झडती घेतली असता चालकाच्या कॅबिनमध्ये गुप्तपणे लपवून ठेवलेला 343 किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत 1 कोटी 71 लाख 50 हजार रुपये, तर वाहनाची किंमत 30 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत एकूण 2 कोटी 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांत 469 किलो गांजा* मालेगाव आणि कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 469 किलो गांजा तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2 कोटी 64 लाख 50 हजार रुपये आहे. दोन्ही प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, मालेगाव येथील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे, तर कारंजा येथील गुन्ह्याचा तपास कारंजा शहर पोलिसांकडे देण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक
निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे (कारंजा), रामकृष्ण पवार (वाशिम), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक अमर चोरे, मालेगावचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, जिल्हा वाहतूक शाखेचे सपोनि गोकुळसिंग राठोड यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली. या कारवाईत पोउपनि निलेश जाधव, सचिन गोखले, विशाल बोरकर, तसेच पोलीस अंमलदार गजानन वाणी, धनंजय अरखराव, उमेश गिन्हे, गजानन झगरे, ज्ञानदेव मात्रे, आशिष बिडवे, सुरज खडके, गजानन अवगळे, विनोद अवगळे, दिलीप देवकते, अमोल इरतकर, गोपाल चौधरी, संदीप दुतोंडे, विठ्ठल महाले, राजकुमार यादव, शाम इंगळे, सुनील तायडे, मयुरेश तिवारी, उमेशकुमार बिबेकर, अजय धनकर, मोहम्मद परसुवाले, अमित भगत, नितीन पाटील, अनिस निन्सुरवाले, अविनाश खिराडे, पोर्णिमा मोटे, नरेंद्र खाडे यांचा सहभाग होता. अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवायांमुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
- दुष्काळाच्या छायेत सोयाबीनची कापणी! मिरापूरात पीक कापणी प्रयोगातून उत्पादनाची नोंद | India News R7 मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम मंडळ अंतर्गत मिरापूर येथे सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग महसूल विभागाच्या वतीने नियमानुसार पार पडला. ग्राम महसूल अधिकारी प्रियंका पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रयोगात महसूल विभाग, विमा कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. युनूस शेख यांच्या शेतातील नमुन्यात ४२० ग्रॅम, तर अजहर जमील यांच्या शेतातील नमुन्यात ९५५ ग्रॅम उत्पादनाची नोंद करण्यात आली. पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला असून, दुष्काळग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत, पीक विमा भरपाई, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. 📺 इंडिया न्यूज आर सेवन सहसंपादक : सफदर शाह व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe करा.1
- मोईन गवळी खून प्रकरणाचा छडा लावण्यात यश दोन आरोपी गजाआड अकोला : बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत २९ सप्टेंबर रोजी झालेल्या मोईन गवळी यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला. प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. २९ सप्टेंबरच्या रात्री अमरावतीहून अर्टिगा कारने बाळापूरकडे येत असताना पारस फाटा उड्डाणपुलाजवळ रस्त्यावरून जाण्यावरून दुचाकीवरील दोघांशी वाद झाला. त्यानंतर अडाणपुलाजवळ आरोपींनी चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मोईन गवळी गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात भा.न्या.सं. कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींची पूर्वओळख नसल्याने तसेच घटनास्थळी सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याने तपासाचे आव्हान होते. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हळकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने माहितीदारांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. त्यातून वैभव पुरुषोत्तम शितळे (२२) आणि गौरव गजानन घुगे (२६), दोघेही खडकी, अकोला, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत वाहनाला कट लागल्याच्या वादातून हल्ला केल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील कारवाईसाठी दोघांना बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.1
- BABBAN Ali BABBAN Ali1
- एम पी चा मुलगा वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी गोंड अभंग गातो धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलासाठी शाळेची व्यवस्था घोटा देवी येथे केली1
- बाभळी येथील उर्दू शाळा क्र. १० मधील शालेय पोषण आहाराच्या खिचडीत कीटक आढळल्याचा गंभीर प्रकार समोर. बाभळी येथील उर्दू शाळा क्र. १० मधील शालेय पोषण आहाराच्या खिचडीत कीटक आढळल्याचा गंभीर प्रकार समोर.1
- BABBAN Ali BABBAN Ali1
- *समृद्धी महामार्गावर अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; 469 किलो गांजा जप्त* *दोन वेगवेगळ्या कारवायांत तब्बल 2 कोटी 64 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, समृद्धी महामार्गावर 6 ऑक्टोबर रोजी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल 469 किलो गांजा आणि दोन वाहने असा एकूण 2 कोटी 64 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी यापूर्वी अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्समध्ये कर्तव्य बजावले आहे. या अनुभवाचा फायदा वाशिम जिल्ह्यातील अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला होत असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात येत आहेत. *मालेगाव हद्दीत 126 किलो गांजा जप्त* समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नियमित पेट्रोलिंग नेमण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 ते 5.15 वाजताच्या सुमारास मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईट पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना महिंद्रा मॅक्स पिकअप क्रमांक MH-12-YQ-2085 हे मालवाहू वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळले. पोलिसांनी चालकाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहन सोडून फरार झाला. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 126 किलो गांजा आढळून आला. गांजा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 73 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. *कारंजा हद्दीत 343 किलो गांजा पकडला* दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 6 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजता कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी मोहीम राबविली. यावेळी आयशर ट्रक क्रमांक MH-04-JK-2446 थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चालकाने आपले नाव सुनील गणपतराव सूर्यवंशी, रा. लातूर असे सांगितले. वाहनातील मालाबाबत त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. वाहनाची झडती घेतली असता चालकाच्या कॅबिनमध्ये गुप्तपणे लपवून ठेवलेला 343 किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत 1 कोटी 71 लाख 50 हजार रुपये, तर वाहनाची किंमत 30 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत एकूण 2 कोटी 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांत 469 किलो गांजा* मालेगाव आणि कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 469 किलो गांजा तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2 कोटी 64 लाख 50 हजार रुपये आहे. दोन्ही प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, मालेगाव येथील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे, तर कारंजा येथील गुन्ह्याचा तपास कारंजा शहर पोलिसांकडे देण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे (कारंजा), रामकृष्ण पवार (वाशिम), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक अमर चोरे, मालेगावचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, जिल्हा वाहतूक शाखेचे सपोनि गोकुळसिंग राठोड यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली. या कारवाईत पोउपनि निलेश जाधव, सचिन गोखले, विशाल बोरकर, तसेच पोलीस अंमलदार गजानन वाणी, धनंजय अरखराव, उमेश गिन्हे, गजानन झगरे, ज्ञानदेव मात्रे, आशिष बिडवे, सुरज खडके, गजानन अवगळे, विनोद अवगळे, दिलीप देवकते, अमोल इरतकर, गोपाल चौधरी, संदीप दुतोंडे, विठ्ठल महाले, राजकुमार यादव, शाम इंगळे, सुनील तायडे, मयुरेश तिवारी, उमेशकुमार बिबेकर, अजय धनकर, मोहम्मद परसुवाले, अमित भगत, नितीन पाटील, अनिस निन्सुरवाले, अविनाश खिराडे, पोर्णिमा मोटे, नरेंद्र खाडे यांचा सहभाग होता. अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवायांमुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.4
- घरगुती LPG सिलेंडरमधून गॅस काढून विक्रीचा पर्दाफाश,गुन्हे शाखेचा छापा;दोन आरोपी ताब्यात ९ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त1