logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

फलक रेखाटनातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश व सर्वधर्मसमभावाचे चित्रण! शिक्षण मंडळ भगूर संचालित भाटगाव (ता. चांदवड) येथील नूतन माध्यमिक विद्यालयात ईद-ए-मिलाद व रक्षाबंधन सणांच्या निमित्ताने एक अतिशय आकर्षक आणि सामाजिक संदेश देणारे शालेय फलक रेखाटन करण्यात आले आहे. या फलकामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य, बंधुभाव आणि ‘पैगाम-ए-मुहब्बत’ या संदेशातून सर्वधर्मसमभावाचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. हिंदू मुस्लिम मित्रभाव तसेच मुस्लिम मुलगी हिंदू मुलाच्या हातावर राखी बांधतानाचे हृदयस्पर्शी दृश्य साकारून प्रेम, एकता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला आहे. विद्यालयातील कलाशिक्षक देव हिरे यांच्या कलात्मक संकल्पनेतून साकारलेल्या या फलक रेखाटनाचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून कौतुक होत आहे. विविध धर्मांचे सण परस्पर प्रेम, सौहार्द आणि सामाजिक एकात्मता वाढविणारे असावेत, हा या फलकाचा मुख्य संदेश आहे.

20 hrs ago
user_Mahendra kantubhai Gujrathi
Mahendra kantubhai Gujrathi
Local News Reporter चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
20 hrs ago
7adc2be2-a6e7-49c1-b959-15b6f75db9c9

फलक रेखाटनातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश व सर्वधर्मसमभावाचे चित्रण! शिक्षण मंडळ भगूर संचालित भाटगाव (ता. चांदवड) येथील नूतन माध्यमिक विद्यालयात ईद-ए-मिलाद व रक्षाबंधन सणांच्या निमित्ताने एक अतिशय आकर्षक आणि सामाजिक संदेश देणारे शालेय फलक रेखाटन करण्यात आले आहे. या फलकामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य, बंधुभाव आणि ‘पैगाम-ए-मुहब्बत’ या संदेशातून सर्वधर्मसमभावाचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. हिंदू मुस्लिम मित्रभाव तसेच मुस्लिम मुलगी हिंदू मुलाच्या हातावर राखी बांधतानाचे हृदयस्पर्शी दृश्य साकारून प्रेम, एकता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला आहे. विद्यालयातील कलाशिक्षक देव हिरे यांच्या कलात्मक संकल्पनेतून साकारलेल्या या फलक रेखाटनाचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून कौतुक होत आहे. विविध धर्मांचे सण परस्पर प्रेम, सौहार्द आणि सामाजिक एकात्मता वाढविणारे असावेत, हा या फलकाचा मुख्य संदेश आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    1
    टिपू सुलतान फोटोवरून  पुन्हा वाद !                                                    फोटो काढायला लावणार - दादा भुसे
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    1
    दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. -- --
    1
    आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा

सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा
सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे.
नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.
अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
--
--
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे
    1
    सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प 
प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे
    user_Harish Kumar Gautam
    Harish Kumar Gautam
    Voice of people नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला... पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला. चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले. सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. #DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews
    1
    Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला...
पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला.
चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले.
सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
#DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ​नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा
    1
    ​नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा फोटो, उपमहापौर शाने हिंद यांच्या कार्यालयात पुन्हा लावला फोटो मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा फोटो, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फ़ोटो लावला. त्यामुळे टिपू सुलतानच्या फोटो वरून वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शाने ए हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा लावला टिपू सुलतानचा फोटो..
    1
    मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा
फोटो, उपमहापौर शाने हिंद यांच्या कार्यालयात पुन्हा लावला फोटो
मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा
फोटो, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फ़ोटो लावला. त्यामुळे टिपू सुलतानच्या फोटो वरून वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमहापौर शाने ए हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा लावला टिपू सुलतानचा फोटो..
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • खड्ड्याने घेतला सुनील बोरसेंचा बळी महापौरांसमोर आई-पत्नी-मुलींचा आक्रोश महापौरांकडून आर्थिक मदत-नोकरीचे आश्वासन अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकहाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला. या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोरसे यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी महापौरांसमोरच एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘घर चालवणारा माणूसच गेला… आता आम्ही कोणाकडे पाहायचं?’ या आक्रोशाने बोरसे कुटुंबीयांचे दुःख शब्दांतून व्यक्त होत होते. सुनील हे रंगकाम करून सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला आहे. महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले. कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. बोरसे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे बोरसे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही. महापौरांनी कुटुंबीयांना धीर देत ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’ या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र, बोरसे कुटुंबीयांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.
    4
    खड्ड्याने घेतला सुनील बोरसेंचा बळी महापौरांसमोर आई-पत्नी-मुलींचा आक्रोश

महापौरांकडून आर्थिक मदत-नोकरीचे आश्वासन
अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकहाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला. या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोरसे  यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी महापौरांसमोरच एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले.
‘घर चालवणारा माणूसच गेला… आता आम्ही कोणाकडे पाहायचं?’ या आक्रोशाने बोरसे कुटुंबीयांचे दुःख शब्दांतून व्यक्त होत होते. सुनील हे रंगकाम करून सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला आहे.
महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले. कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
बोरसे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून 
सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे बोरसे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही.
महापौरांनी कुटुंबीयांना धीर देत ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’ या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र, बोरसे कुटुंबीयांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    12 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.