बाजारात दवा मिळते दुवा मिळत नाही हजारो रुग्णांची दुवा सरकार साहेबांना दिर्घायुष्य करते - नगराध्यक्षा नयनकुँवर रावल. सरकारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे महाआरोग्य शिबिरात ५७० रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार. प्रतिनिधी संजय कोळी दोंडाईचा :– आदरणीय लोकनेते मा. श्री. सरकारसाहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, दोंडाईचा शहर व हर्षल सर्जिकल हॉस्पिटल, सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर रोटरी भवन, दोंडाईचा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा माँसाहेब नयनकुँवर रावल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. हर्षल मिस्त्री होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, विक्रम पाटील व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन यांची उपस्थिती लाभली. या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ५७० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. यामध्ये शल्यचिकित्सक डॉ. हर्षल मिस्त्री, औषधीतज्ञ डॉ. प्रधान निकुंभ, डॉ. कल्पेश जिन्जाला, डॉ. मिलन धोला, डॉ. मितुल जिन्जाला आदींचा समावेश होता. रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी व औषधोपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. तसेच, गंभीर व दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी सुरत येथे मोफत किंवा माफक दरात शस्त्रक्रिया व औषधोपचार उपलब्ध करून देण्याची विशेष सोय करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी नगराध्यक्षा माँसाहेब नयनकुँवर रावल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सरकारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविल्याने गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळतो व त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभेल.” प्रास्ताविकात प्रविण महाजन यांनी सांगितले की, “दरवर्षी सरकारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया व उपचार करून हा दिवस साजरा केला जातो, ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी आहे.” कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन शिबिराचे कौतुक केले. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रविंद्र सोनवणे डॉ अनिकेत मंडाले राजेश मुणोत भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे गटनेते निखिल जाधव बांधकाम सभापती मुकेश देवरे जितु गिरासे सर विजय मराठे, महेंद्र पाटील, कृष्णा नगराळे, नरेंद्र गिरासे भरतरी ठाकूर, संजोग रामोळे, संजय तावडे, मनोज धनगर, महेंद्र कोळी, अनिल अग्रवाल भालचंद्र पाटील तसेच नगरसेविका सौ. वैशाली महाजन, आरोग्य सभापती सौ. सरला सोनवणे शिक्षण सभापती सौ वैशाली कागणे सौ. ललिता गिरासे, सौ भावना महाले सौ. भारती मराठे, सौ. राणी अग्रवाल, सौ. देवयानी रामोळे, सौ. मनीषा गिरासे, सौ. पूजा खडसे सौ रोहिणी लिंभारे यांची उपस्थिती होती. तसेच रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष कमलेश कांकरिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश माहेश्वरी, लायन्स क्लबचे अध्यक्ष गजेंद्र घोडके, आरसीसी दोंडाईचाकरच्या अध्यक्षा सौ. वैशाली सोनार, जायंट्स सहेलीच्या अध्यक्षा सौ. मिनाक्षी जाधव जेष्ठ पत्रकार जे.पी. गिरासे मनोहर देवरे, जितेंद्र गिरासे रणजीत राजपूत रविंद्र चौधरी अण्णा कोळी प्रमोद राजपूत मंजुम पठाण अजमल सिकलीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण महाजन यांनी केले, सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली महाजन यांनी मानले. एकूणच, या भव्य आरोग्य शिबिरामुळे दोंडाईचा शहर व परिसरातील शेकडो रुग्णांना मोफत उपचार मिळून मोठा दिलासा मिळाला असून हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

- Muslim colony Khadka Gram Panchayat ward kramank 31
- *भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त Bharat 24taas News भोकरदन | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे1
- शासकीय कार्यक्रमातून जि.प.-पं.स. सदस्यांना डावलल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांसमोर मंत्र्यांच्या उपस्थितीत तक्रार छत्रपती संभाजीनगर : महा राजस्व अभियानांतर्गत आयोजित शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत जिल्हा परिषद सभापतींनी मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत तक्रार केली. तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. वारंवार अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना वगळले जात असल्याची खंत व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.1
- ऑन फडणवीस केंद्रात सामनातून दावा.. - ubt चा न्यूजपेपर सामना त्यात मानला वाटेल तसे लिहितात. कोठून स्वप्न पडतात, काहीतरी गेस करतात आणि लिहितात. फडणवीसांना जायचा की नाही, पक्षातील वरिष्ठांनी ठरवले की नाही, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. अशा बकवास बातम्या देऊन सामानाचा खप मर्यादित राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर.. *मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर* - भविष्य सांगायला यांना ठेवलेलं नाही. आम्ही यांच्या बातम्याकडे लक्ष देत नाही. ऑन दिल्लीत सुप्त संघर्ष.. - दिल्लीत सुप्त संघर्ष आहे आणि यांना तडजोडीसाठी बोलावले आहे का? - *आता सामना वैचारिक नाही तर फेकु पेपर झाला आहे.* ऑन मोदी FB लाईव्ह वरून टीका - एकनाथ शिंदे हे लोकांमध्ये जाऊन भेटत होते, रेमसिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होते, ऑक्सिजन, बेड व्यवस्था करीत होते. लाखो कार्यकर्ते रस्त्यावर होते, एकनाथ शिंदे यांना कोरोना झाला होता. तरीही सर्व सामन्यासाठी त्यांनी झोकून दिले. - मोदी काय करता यापेक्षा तुम्ही काय केले यावर लक्ष द्या. मुख्यमंत्री असताना मदतीचा ओघ तरी दिले आहे का? त्याकाळी ऑनलाइनचं यायचे, आता उद्धव ठाकरे यांना लोकांनी त्यांना फेसबुकवर ठेवले... ऑन गणेश नाईक टीका - दर वेळेस काहीतरी बडबड करीत असतो, त्यांना ना पक्षात वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत ही नाही. इतरांनी काय कॉमेंट केले आम्ही लक्ष देत नहीं . शिंदेंनी त्यांच्या जिल्ह्यात काय करावे. ऑन शहा सुनेत्रा पवार पुणे भेट. - शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली. काल पुण्यात अमित शहा यांनी सुनेत्रा वाहिनी यांच्याशी बोलले. प्रत्येक भेटीचे राजकारण करू नये. स्वतः सुनेत्रा वाहिनी आणि शाह हे सक्षम आहे. ऑन उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आदेश. - धनुष्यबाण चिन्ह हे आम्हालाच मिळेल, कारण आम्ही आमची बाजू मजबुतीने मंडाले आहे. उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे. ऑन राज ठाकरे आरोप. - मला कल्पना नाही. आरोप असेल तर सरकार चौकशी करेल.1
- ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या सदस्यांना डावलले महा राजस्व अभियानाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रणच मिळाले नसल्याची मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सभापतीची खंत वारंवार जिल्हा परिषदेच्या सदस्यांना आमंत्रण केली होती तक्रार तीन तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना डावलल्याची मंत्र्यांचे उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार3
- हाजी अन्वर हॉस्पिटलमध्ये भव्य आरोग्य शिबीर; माजी आमदार फारुख शाह यांच्या पुढाकाराने सर्वसामान्यांना दिलासा... हाजी अन्वर हॉस्पिटलमध्ये भव्य आरोग्य शिबीर; माजी आमदार फारुख शाह यांच्या पुढाकाराने सर्वसामान्यांना दिलासा धुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने माजी आमदार फारुख शाह यांच्या वतीने धुळ्यात एका भव्य 'मेगा हेल्थ चेकअप कॅम्प'चे आयोजन करण्यात आले होते. ऐंशी फुटी रोडवरील लोकमान्य पेट्रोल पंपासमोर असलेल्या 'हाजी अन्वर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये पार पडलेल्या या आरोग्य शिबिराला शहर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराला माजी आमदार फारुख शाह यांनी स्वतः उपस्थित राहून संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी अत्यंत आस्थेने संवाद साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. तसेच, उपस्थित लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते आरोग्यविषयक माहितीपत्रके आणि वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. या भव्य शिबिरात जनरल मेडिसिन, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग आणि अस्थिरोग अशा विविध विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. नागरिकांच्या सोयीसाठी शिबिराच्या ठिकाणी मोफत ईसीजी, ब्लड शुगर तपासणी आणि वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यात आला होता. याशिवाय, सर्व प्रकारच्या लॅब टेस्टवर ५० टक्के सवलत देण्यात आल्याने अनेक गरजू रुग्णांची मोठी आर्थिक बचत झाली. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, प्राथमिक तपासणीनंतर ज्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासेल, त्यांच्यावर 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना' आणि 'आयुष्यमान भारत योजने'अंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत. वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना एकाच छताखाली अद्ययावत आणि मोफत उपचार मिळावेत, या हेतूने माजी आमदार फारुख शाह यांच्या वतीने राबवण्यात आलेला हा आरोग्यदायी उपक्रम धुळेकरांसाठी मोठा आधार ठरला आहे.1
- भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.समाज बांधवांची उपस्थिती होती..1
- अनुपस्थिती व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; १५ ऑगस्टनंतर कठोर कारवाईचा आमदार प्रशांत बंब यांचा इशारा 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत आंबेलोहोळ व खुलताबाद येथे आयोजित समाधान शिबिरात आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांशी संवाद साधत महसूल विभागाच्या विविध सेवांचा आढावा घेतला. यावेळी ७/१२ उतारे, विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसुली कामांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. शासनाच्या योजना व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करत लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासनासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा देताना, अनुपस्थिती आणि हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, १५ ऑगस्टनंतर अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला. जनतेला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.1
- MH13DQ7143 नंबरची गाडीच्या पाळधी बायपास येथे पलटी...... पाळधी बायपास येथे आज दिनांक 2/ 8 /2026 रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली घटनास्थळी पोलीस दाखल जखमींना पुढील उपचार साठी रवाना3