*भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त Bharat 24taas News भोकरदन | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे
*भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त Bharat 24taas News भोकरदन | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे
- माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही.. माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही.. आज दिनांक 2 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याच्या कारणावरून खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणने या प्रकरणाची दखल घेत रात्रीच वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला.1
- बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती1
- शेतकऱ्यांचे सिबील खराब होणार आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे - शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांचे सिबील खराब होणार आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे - शेतकरी नेते रविकांत तुपकर1
- अनुपस्थिती व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; १५ ऑगस्टनंतर कठोर कारवाईचा आमदार प्रशांत बंब यांचा इशारा 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत आंबेलोहोळ व खुलताबाद येथे आयोजित समाधान शिबिरात आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांशी संवाद साधत महसूल विभागाच्या विविध सेवांचा आढावा घेतला. यावेळी ७/१२ उतारे, विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसुली कामांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. शासनाच्या योजना व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करत लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासनासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा देताना, अनुपस्थिती आणि हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, १५ ऑगस्टनंतर अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला. जनतेला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.1
- शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार *ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर* शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या सदस्यांना डावलले महा राजस्व अभियानाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रणच मिळाले नसल्याची मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सभापतीची खंत वारंवार जिल्हा परिषदेच्या सदस्यांना आमंत्रण केली होती तक्रार तीन तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना डावलल्याची मंत्र्यांचे उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार2
- तर.... जनता वसाहत नाल्याचा पाणी प्रश्न असा सुटणार आमदार किशोर आप्पा पाटील....!!! तर.... जनता वसाहत नाल्याचा पाणी प्रश्न असा सुटणार आमदार किशोर आप्पा पाटील....!!!1
- लाडकी बहीण’चे बंद मानधन तात्काळ सुरू करा; रामभाऊ घोगरे यांचे अनोखे आंदोलन महिलांचा वेश परिधान करून समाधान शिबिरात सरकारविरोधात जोरदार निदर्शने; थकीत मानधन जमा करण्याची मागणी लाडकी बहीण’चे बंद मानधन तात्काळ सुरू करा; रामभाऊ घोगरे यांचे अनोखे आंदोलन महिलांचा वेश परिधान करून समाधान शिबिरात सरकारविरोधात जोरदार निदर्शने; थकीत मानधन जमा करण्याची मागणी आज दिनांक 2 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत केवायसी, पडताळणी व अन्य तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आलेले पात्र महिलांचे मानधन तात्काळ पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी धर्मवीर सामाजिक क्रांतीचे प्रांताध्यक्ष रामभाऊ घोगरे यांनी घनसावंगी येथे अनोखे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात त्यांनी महिलांचा वेश परिधान करून शासनाचे लक्ष वेधत जोरदार निदर्शने केली.1
- बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या स्व. रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय १०० टक्के भरले - आमदार संजय गायकवाड बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या स्व. रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय १०० टक्के भरले - आमदार संजय गायकवाड1
- बसस्थानकात आला हार्ट अटॅक, कंडक्टरने वाचवला जीव कंडक्टरची माणुसकीचे दर्शन ANC - छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका येऊन ती बेशुद्ध पडली. यावेळी वाहक संगीता पालवे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षक कविता भुतेकर यांनीही मदत केली. वेळेत मिळालेल्या प्राथमिक उपचारांमुळे महिलेची श्वसनक्रिया पूर्ववत होण्यास मदत झाली. त्यानंतर तिला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या धाडसी आणि तत्पर कृतीबद्दल प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांनी संगीता पालवे यांचे कौतुक केले.1