अकोट तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रशासन कर वसुली करत आहे. खाई नदी मोठ्या प्रमाणात दूषित आहे वार्ड क्रमांक 14 व 15 मध्ये रोड नाल्यांची अवस्था मोठ्या प्रमाणात आहे याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे पाण्याची समस्या आरोग्य समस्या निर्माण होतात आहे.येथे प्राथमिक उपचार केंद्र असून त्याची वेळ अयोग्य आहे ही वेळ 11 ते 1.00 वाजेपर्यंतच आहे. आणि कर्मचाऱ्यांना पगार खूप मोठ्या प्रमाणात दिला जाते त्यामुळे नागरिकांच्या रकमेचा अयोग्य रकमेचा योग्य वापर होता याकडे राज्य शासनाने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे सामान्य 9 ते 8 हजारात काम करत आहे. यांना कामाची वेळ कमी आणि खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बारा ते तेरा तास काम करावे लागत आहे अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित प्रशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढलेले झाले आहे स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारची रोजगार प्राची व्यवस्था नाही. यावर स्थानिक प्रशासन आणि राज्य शासन कुठल्याही प्रकारचे उपयोजना जना करत नाहीत. आमदार असून सुद्धा नसल्यासारखा आहे कारण विधानसभेत कुठल्याही प्रकारच्या तालुक्यातील समस्या गाजवल्या नाही आमदाराचा उपयोग तरी काय प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतात निवडणूक विभाग कुठल्या प्रकारची कारवाई करेल याची अपेक्षा नागरिकांना आहे शासनाने आमदारांची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे
अकोट तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रशासन कर वसुली करत आहे. खाई नदी मोठ्या प्रमाणात दूषित आहे वार्ड क्रमांक 14 व 15 मध्ये रोड नाल्यांची अवस्था मोठ्या प्रमाणात आहे याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे पाण्याची समस्या आरोग्य समस्या निर्माण होतात आहे.येथे प्राथमिक उपचार केंद्र असून त्याची वेळ अयोग्य आहे ही वेळ 11 ते 1.00 वाजेपर्यंतच आहे. आणि कर्मचाऱ्यांना पगार खूप मोठ्या प्रमाणात दिला जाते त्यामुळे नागरिकांच्या रकमेचा अयोग्य रकमेचा योग्य वापर होता याकडे राज्य शासनाने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे सामान्य 9 ते 8 हजारात काम
करत आहे. यांना कामाची वेळ कमी आणि खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बारा ते तेरा तास काम करावे लागत आहे अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित प्रशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढलेले झाले आहे स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारची रोजगार प्राची व्यवस्था नाही. यावर स्थानिक प्रशासन आणि राज्य शासन कुठल्याही प्रकारचे उपयोजना जना करत नाहीत. आमदार असून सुद्धा नसल्यासारखा आहे कारण विधानसभेत कुठल्याही प्रकारच्या तालुक्यातील समस्या गाजवल्या नाही आमदाराचा उपयोग तरी काय प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतात निवडणूक विभाग कुठल्या प्रकारची कारवाई करेल याची अपेक्षा नागरिकांना आहे शासनाने आमदारांची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे
- Prashant WarghatMurtijapur, Akola👏on 17 March
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा; शेगाव-चिखलीत कार्यक्रमांची धावपळ! बुलढाणा, दि.16 (जिमाका): राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यामुळे शेगाव व चिखली परिसरात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दौऱ्यानुसार सकाळी 10 वाजता नागपूरहून शेगाव येथील हेलिपॅडवर आगमन होणार आहे. त्यानंतर ते तत्काळ श्री संत गजानन महाराज संस्थान येथे जाऊन दर्शन घेणार असून हा कार्यक्रम सकाळी 10.15 वाजता निश्चित करण्यात आला आहे. यानंतर सकाळी 11 वाजता ते चिखलीकडे रवाना होणार आहेत. सकाळी 11.30 वाजता चिखली येथे आगमन होऊन शेरखजी बोंदरे यांच्या शेतातील हेलिपॅडवर उतरणार आहेत. पुढे दुपारी 11.45 वाजता देव्हडे फार्म अॅन्ड अॅग्रो टुरिझमच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याचा समारोप दुपारी 1 वाजता चिखली येथून नागपूरकडे प्रयाण करून होणार आहे. या दौऱ्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे.1
- खामगाव: वारकरी संप्रदायातील विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खामगाव येथे वारकरी धर्मरक्षक परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.या आंदोलनाद्वारे वारकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मानधनाची अट रद्द करा,शासनाने वारकरी मानधनासाठी लावलेली ५० वर्षे वयाची अट त्वरित रद्द करावी,सर्व महिला भजनी मंडळांना वार्षिक २५,००० रुपये अनुदान मिळावे, महिला मंडळातील सदस्यांना वैयक्तिक रित्या दरमहा ५,००० रुपये मानधन सुरू करावे,बुलढाणा जिल्ह्यामध्ये 'जिल्हा मानधन समिती' स्थापन करून प्रलंबित असलेले सर्व अर्ज त्वरित मंजूर करावेत,वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी रासायनिक सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे.ती तातडीने प्रदूषण मुक्त करण्यासाठी कंपन्यांवर कारवाई करावी. या मागण्या मांडण्यात आल्या. जर तीन महिन्यांच्या आत उपरोक्त मागण्या मान्य झाल्या नाही,तर संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी मुंबईत मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वारकरी,महिला भजनी मंडळाच्या भगिनी आणि संप्रदायातील नागरिक उपस्थित होते.1
- Post by Amravati News Update1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Amol Gawai3
- जालना आरटीओ कार्यालयाशेजारी भीषण आग; गायरान जळून खाक जालना शहरातील आरटीओ कार्यालयाच्या शेजारील परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गायरान जमिनीवरील सुकलेल्या गवताने क्षणात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गायरान क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुकलेल्या गवतामुळे आग अधिक भडकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.1
- हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. २०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी न्यायापासून वंचित निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- खामगांव : गौ सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन कडून खामगांव शहरातील बेवारस गौ वंश वर उपचार करण्यात आले. येथील आठवडी बाजार स्थित एक नंदीच्या शिंगेला दुखापत होऊन त्याच्या मागच्या पायाची नस कटून तो गंभीर जखमी अवस्थेत जास्त प्रमाणात रक्तस्त्राव वाहून गेल्याने तो रक्त बंबाळ अवस्थेत होता एकनिष्ठा गौ सेवकांनी लगेच त्याच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचविला. आठवडी बाजार स्थित एक वासरूला मोठ्या प्रमाणात विष बाधा झाली होती त्या वासरूवर उपचार करण्यात आले परंतु दुर्दैवाने तो मृत्युमुखी पडला. सिव्हिल लाईन स्थित एक गौ माता विष बाधा होऊन मृत्युमुखी पडलेली होती घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवकांनी नगर परिषद ला माहिती देऊन तिचा अंतिम संस्कार करायला लावला. समन्वय नगर स्थित एक गौ माता दोन दिवसा पासून रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत तडफडत होती तिच्यावर उपचार करून तिला वाचविण्यात गौ सेवकांना यश आले. जगदंबा चौक स्थित एका नंदिच्या पायाला मुका मार लागलेला होता गौ सेवकांनी लगेच उपचार करून त्याचा पाय चांगला केला. बारादरी स्थित एका गौ मातेच्या समोरच्या पायाच्या खुरात जखम झाली होती तिच्यावर उपचार करून तिची जखम बरी करण्यात आली. मेनरोड फरशी भागात एका नंदीच्या समोरच्या पायाला दुखापत होऊन तो तडफडत होता त्या नंदीवर लगेच उपचार करण्यात आले. पाण्याची टाकी वामन नगर स्थित एक गौ माता प्रसूती दरम्यान शॉक मध्ये गेलेली होती तिच्या पोटात वासरू आडवा होऊन फसलेला होता तिच्यावर उपचार करून वासरूला वाचविण्यात डॉक्टर गौ सेवकांना यश आले परंतु दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ती बेवारस गौ माता शांत झाली. अमृत नगर स्थित एका नंदीच्या पाठीच्या मागे मोठ्या प्रमाणात जखम होऊन त्याच्यात अळ्या पडलेल्या होते गौ सेवकांनी लगेच उपचार करून नंदीला चांगले केले. या गौ सेवेत एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनचे गौ सेवक सुरजभैय्या यादव, डॉ. शुभम जरांगे, डॉ. पवन घडेकर, ज्ञानेश सेवक सर, योगेश राऊत, नरेश मसनेवार, आकाश शेंबरे, निलेश हजारे, राहुल नाटेकर, अजय वानखडे, मनिष सिरसाठ, प्रमोद ढोलेकर, भारत इंगळे, दिपक महाकाळे, योगेश ईर, स्वप्निल दांदळे, शुभम, आर्यन निळे, करण ठाकुर, करण मोरे, पृथ्वी जाधव, गौरव कवटेकर, प्रदीप शमी, आशिष शर्मा, चेतन कदम, विशाल ठाकुर, अविनाश इंगळे, सागर अवसरमोल, लखन पिवाल, संतोष जाधव आदि लोकांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे गौ वंश वर उपचारासाठी परिश्रम घेतले या गौ सेवेत संपूर्ण लागलेला खर्च एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आला. अशी माहिती स्वप्निल दांदळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.1