महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा; शेगाव-चिखलीत कार्यक्रमांची धावपळ! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा; शेगाव-चिखलीत कार्यक्रमांची धावपळ! बुलढाणा, दि.16 (जिमाका): राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यामुळे शेगाव व चिखली परिसरात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दौऱ्यानुसार सकाळी 10 वाजता नागपूरहून शेगाव येथील हेलिपॅडवर आगमन होणार आहे. त्यानंतर ते तत्काळ श्री संत गजानन महाराज संस्थान येथे जाऊन दर्शन घेणार असून हा कार्यक्रम सकाळी 10.15 वाजता निश्चित करण्यात आला आहे. यानंतर सकाळी 11 वाजता ते चिखलीकडे रवाना होणार आहेत. सकाळी 11.30 वाजता चिखली येथे आगमन होऊन शेरखजी बोंदरे यांच्या शेतातील हेलिपॅडवर उतरणार आहेत. पुढे दुपारी 11.45 वाजता देव्हडे फार्म अॅन्ड अॅग्रो टुरिझमच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याचा समारोप दुपारी 1 वाजता चिखली येथून नागपूरकडे प्रयाण करून होणार आहे. या दौऱ्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा; शेगाव-चिखलीत कार्यक्रमांची धावपळ! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा; शेगाव-चिखलीत कार्यक्रमांची धावपळ! बुलढाणा, दि.16 (जिमाका): राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यामुळे शेगाव व चिखली परिसरात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दौऱ्यानुसार सकाळी 10 वाजता नागपूरहून शेगाव येथील हेलिपॅडवर आगमन होणार आहे. त्यानंतर ते तत्काळ श्री संत गजानन महाराज संस्थान येथे जाऊन दर्शन घेणार असून हा कार्यक्रम सकाळी 10.15 वाजता निश्चित करण्यात आला आहे. यानंतर सकाळी 11 वाजता ते चिखलीकडे रवाना होणार आहेत. सकाळी 11.30 वाजता चिखली येथे आगमन होऊन शेरखजी बोंदरे यांच्या शेतातील हेलिपॅडवर उतरणार आहेत. पुढे दुपारी 11.45 वाजता देव्हडे फार्म अॅन्ड अॅग्रो टुरिझमच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याचा समारोप दुपारी 1 वाजता चिखली येथून नागपूरकडे प्रयाण करून होणार आहे. या दौऱ्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा; शेगाव-चिखलीत कार्यक्रमांची धावपळ! बुलढाणा, दि.16 (जिमाका): राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यामुळे शेगाव व चिखली परिसरात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दौऱ्यानुसार सकाळी 10 वाजता नागपूरहून शेगाव येथील हेलिपॅडवर आगमन होणार आहे. त्यानंतर ते तत्काळ श्री संत गजानन महाराज संस्थान येथे जाऊन दर्शन घेणार असून हा कार्यक्रम सकाळी 10.15 वाजता निश्चित करण्यात आला आहे. यानंतर सकाळी 11 वाजता ते चिखलीकडे रवाना होणार आहेत. सकाळी 11.30 वाजता चिखली येथे आगमन होऊन शेरखजी बोंदरे यांच्या शेतातील हेलिपॅडवर उतरणार आहेत. पुढे दुपारी 11.45 वाजता देव्हडे फार्म अॅन्ड अॅग्रो टुरिझमच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याचा समारोप दुपारी 1 वाजता चिखली येथून नागपूरकडे प्रयाण करून होणार आहे. या दौऱ्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे.1
- खामगाव: वारकरी संप्रदायातील विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खामगाव येथे वारकरी धर्मरक्षक परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.या आंदोलनाद्वारे वारकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मानधनाची अट रद्द करा,शासनाने वारकरी मानधनासाठी लावलेली ५० वर्षे वयाची अट त्वरित रद्द करावी,सर्व महिला भजनी मंडळांना वार्षिक २५,००० रुपये अनुदान मिळावे, महिला मंडळातील सदस्यांना वैयक्तिक रित्या दरमहा ५,००० रुपये मानधन सुरू करावे,बुलढाणा जिल्ह्यामध्ये 'जिल्हा मानधन समिती' स्थापन करून प्रलंबित असलेले सर्व अर्ज त्वरित मंजूर करावेत,वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी रासायनिक सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे.ती तातडीने प्रदूषण मुक्त करण्यासाठी कंपन्यांवर कारवाई करावी. या मागण्या मांडण्यात आल्या. जर तीन महिन्यांच्या आत उपरोक्त मागण्या मान्य झाल्या नाही,तर संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी मुंबईत मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वारकरी,महिला भजनी मंडळाच्या भगिनी आणि संप्रदायातील नागरिक उपस्थित होते.1
- Post by Amol Gawai3
- Post by Sharad Dayedar1
- गॅससाठी जीवावर उदार! एजन्सीसमोरच व्यक्तीने फोडले डोके – प्रशासनावर प्रश्नचिन्ह छत्रपती संभाजीनगर : घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या संतापातून एका ५० वर्षीयv व्यक्तीने स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१६ एप्रिल) दुपारी रांजणगाव शेणपुजी (ता. गंगापूर) येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बालचंद नेमाने (वय ५०, रा. रांजणगाव) हे गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलिंडरसाठी कमल गॅस एजन्सीवर वारंवार चकरा मारत होते. मात्र, सततच्या प्रयत्नांनंतरही त्यांना सिलिंडर मिळाला नाही. शुक्रवारी दुपारी एजन्सीसमोर उभे राहून त्यांनी “घरी बायकोला काय तोंड दाखवू? मुलं उपाशी आहेत...” अशी व्यथा व्यक्त केली. संतापाच्या भरात त्यांनी स्वतःच्या डोक्यावर जोरात मारल्याने त्यांचे डोके फुटले आणि ते रक्तबंबाळ झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना मदत केली व उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रांजणगाव-वालूज परिसरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. एजन्सीवर मोठ्या रांगा लागत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सींना घरपोच वितरण करण्याचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्राहकांसाठी आवाहन : गॅस संदर्भातील तक्रारींसाठी1
- भोकरदनमध्ये जयंती उत्सव 2026मोठ्या उत्सहात साजरा, जयंती मिरवणुकीत वृद्धसह, तरुण तरुणीनी धरला तालावर ठेका1
- Post by Amravati News Update1
- खामगांव : गौ सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन कडून खामगांव शहरातील बेवारस गौ वंश वर उपचार करण्यात आले. येथील आठवडी बाजार स्थित एक नंदीच्या शिंगेला दुखापत होऊन त्याच्या मागच्या पायाची नस कटून तो गंभीर जखमी अवस्थेत जास्त प्रमाणात रक्तस्त्राव वाहून गेल्याने तो रक्त बंबाळ अवस्थेत होता एकनिष्ठा गौ सेवकांनी लगेच त्याच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचविला. आठवडी बाजार स्थित एक वासरूला मोठ्या प्रमाणात विष बाधा झाली होती त्या वासरूवर उपचार करण्यात आले परंतु दुर्दैवाने तो मृत्युमुखी पडला. सिव्हिल लाईन स्थित एक गौ माता विष बाधा होऊन मृत्युमुखी पडलेली होती घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवकांनी नगर परिषद ला माहिती देऊन तिचा अंतिम संस्कार करायला लावला. समन्वय नगर स्थित एक गौ माता दोन दिवसा पासून रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत तडफडत होती तिच्यावर उपचार करून तिला वाचविण्यात गौ सेवकांना यश आले. जगदंबा चौक स्थित एका नंदिच्या पायाला मुका मार लागलेला होता गौ सेवकांनी लगेच उपचार करून त्याचा पाय चांगला केला. बारादरी स्थित एका गौ मातेच्या समोरच्या पायाच्या खुरात जखम झाली होती तिच्यावर उपचार करून तिची जखम बरी करण्यात आली. मेनरोड फरशी भागात एका नंदीच्या समोरच्या पायाला दुखापत होऊन तो तडफडत होता त्या नंदीवर लगेच उपचार करण्यात आले. पाण्याची टाकी वामन नगर स्थित एक गौ माता प्रसूती दरम्यान शॉक मध्ये गेलेली होती तिच्या पोटात वासरू आडवा होऊन फसलेला होता तिच्यावर उपचार करून वासरूला वाचविण्यात डॉक्टर गौ सेवकांना यश आले परंतु दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ती बेवारस गौ माता शांत झाली. अमृत नगर स्थित एका नंदीच्या पाठीच्या मागे मोठ्या प्रमाणात जखम होऊन त्याच्यात अळ्या पडलेल्या होते गौ सेवकांनी लगेच उपचार करून नंदीला चांगले केले. या गौ सेवेत एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनचे गौ सेवक सुरजभैय्या यादव, डॉ. शुभम जरांगे, डॉ. पवन घडेकर, ज्ञानेश सेवक सर, योगेश राऊत, नरेश मसनेवार, आकाश शेंबरे, निलेश हजारे, राहुल नाटेकर, अजय वानखडे, मनिष सिरसाठ, प्रमोद ढोलेकर, भारत इंगळे, दिपक महाकाळे, योगेश ईर, स्वप्निल दांदळे, शुभम, आर्यन निळे, करण ठाकुर, करण मोरे, पृथ्वी जाधव, गौरव कवटेकर, प्रदीप शमी, आशिष शर्मा, चेतन कदम, विशाल ठाकुर, अविनाश इंगळे, सागर अवसरमोल, लखन पिवाल, संतोष जाधव आदि लोकांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे गौ वंश वर उपचारासाठी परिश्रम घेतले या गौ सेवेत संपूर्ण लागलेला खर्च एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आला. अशी माहिती स्वप्निल दांदळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.1