बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील उमरा पानाचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकाची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शिक्षण विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी "शिक्षक द्या... आम्हाला शिक्षक द्या..." अशा घोषणा दिल्या. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ३३ विद्यार्थी असून सध्या केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. यापूर्वीही शिक्षक नियुक्तीबाबत संबंधित प्रशासनाकडे मागणी करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आठ दिवसांच्या आत शिक्षक नियुक्तीबाबत लेखी आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आमचे लक्ष राहील. आता पाहूया आंदोलनाचे प्रत्यक्ष दृश्य...
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील उमरा पानाचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकाची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शिक्षण विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी "शिक्षक द्या... आम्हाला शिक्षक द्या..." अशा घोषणा दिल्या. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ३३ विद्यार्थी असून सध्या केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. यापूर्वीही शिक्षक नियुक्तीबाबत संबंधित प्रशासनाकडे मागणी करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आठ दिवसांच्या आत शिक्षक नियुक्तीबाबत लेखी आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आमचे लक्ष राहील. आता पाहूया आंदोलनाचे प्रत्यक्ष दृश्य...
- आषाढी एकादशी निमित्त केशव शिवणी येथे श्री केशवराजांची भक्तिमय महापूजा; हजारो भाविकांनी घेतले दर्शन बलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी येथील श्री केशवराज संस्थानात आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री केशवराजांची विधिवत महापूजा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. संस्थानचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक वसंतराव उदावंत यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या गजरात महापूजा पार पडली. या सोहळ्यास परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्री केशवराजांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला. आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. वेदमंत्र, हरिनामाचा गजर आणि धार्मिक विधींनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. महापूजेनंतर श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी श्री केशवराजांचे दर्शन घेत सुख, समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता. विशेष म्हणजे, श्री केशवराज मंदिराचा नुकताच भव्य जीर्णोद्धार करण्यात आला असून मंदिराची उभारणी पारंपरिक हेमाडपंथी स्थापत्यशैलीत करण्यात आली आहे. मंदिरातील श्री केशवराजांची आकर्षक मूर्ती नेपाळमधील पवित्र गंडकी पाषाणापासून साकारण्यात आली आहे. या मूर्तीचे सौंदर्य, शिल्पकला आणि दिव्यता भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. श्री केशवराज महाराजांविषयी एक प्राचीन आख्यायिका प्रचलित आहे. त्यानुसार, भगवान श्रीराम प्रभू वनगमनाच्या प्रवासात असताना मार्गात भगवान शंकरांचे दर्शन घेतले. त्यावेळी जवळच भगवान विष्णूंचे अर्थात श्री केशवराजांचे मंदिर असल्याचे समजताच त्यांनी मार्ग बदलून श्री केशवराजांचे दर्शन घेतले. त्यामुळे त्या परिसराला 'मुरुडेश्वर' हे नाव प्रचलित झाले. तसेच श्री केशवराजांच्या नावावरून पुढे गावाचे नाव 'केशव शिवणी' पडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पुराणांमध्ये श्री केशवराज हे भगवान श्रीविठ्ठलाचेच दुसरे स्वरूप असल्याचा उल्लेख आढळतो. तसेच मंदिरातील श्री केशवराजांची मूर्ती अयोध्येतील भगवान श्रीरामांच्या मूर्तीशी साम्य दर्शवित असल्याचे भाविकांकडून सांगितले जाते. या मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या पाच भव्य हेमाडपंथी मंदिरांमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली, भगवान श्रीराम, संत शिरोमणी नरहरी महाराज, मुक्ताबाई आईसाहेब, माता पार्वती, श्री गणेश, भगवान शंकर तसेच संत भगवान बाबा यांच्या मनमोहक मूर्ती भाविकांना पाहावयास मिळतात. या सर्व मूर्ती नेपाळमधील गंडकी पाषाणापासून साकारण्यात आल्या असून त्यांचे कलात्मक सौंदर्य भाविकांना आध्यात्मिक अनुभूती देणारे ठरत आहे. श्री केशवराज संस्थानात दरवर्षी श्रीराम नवमी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी आदी धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विशेष म्हणजे, सर्व धर्मीय नागरिकांच्या सहकार्याने येथे सर्वधर्म समभावाची परंपरा जपली जाते. अन्नदान, नामस्मरण आणि समाजात भक्तीभाव रुजविणे हा संस्थानचा मुख्य उद्देश असून ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. या महापूजेला संस्थानचे सर्व विश्वस्त, गावाचे सरपंच विकास आंधळे, उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच गावातील बहुसंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या सोयीसाठी संस्थानच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष वसंतराव उदावंत यांनी आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करत समाजात भक्ती, संस्कार आणि अध्यात्माची परंपरा जपण्याचे आवाहन केले. तसेच सरपंच विकास आंधळे यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, भाविक आणि संस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. श्रद्धा, भक्ती, सेवा, अन्नदान आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा हा आषाढी एकादशी उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला असून संपूर्ण केशव शिवणी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.1
- ही जनहितार्थ माहिती ग्रामपंचायत बाबत जनजागृती अतिशय उपयुक्त ठरेल. 📢 जनहितार्थ माहिती – प्रत्येक नागरिकाने जाणून घ्यावी! 🏛️ ग्रामपंचायत ही तुमची संस्था आहे. तुमचे हक्क जाणून घ्या! ✅ ग्रामसभेला उपस्थित राहणे हा प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे. ✅ ग्रामपंचायतीचा वार्षिक अंदाजपत्रक, विकासकामे, खर्चाची माहिती आणि विविध योजनांची माहिती नागरिकांना पाहण्याचा अधिकार आहे. ✅ १५ वा वित्त आयोग, राज्य वित्त आयोग व इतर योजनांचा निधी कोणत्या कामासाठी खर्च झाला याची माहिती मागू शकता. ✅ ग्रामसभेची सूचना वेळेवर प्रसिद्ध करणे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. ✅ कोणत्याही कामात अनियमितता वाटल्यास लेखी तक्रार गटविकास अधिकारी (BDO), मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे करता येते. ✅ माहितीचा अधिकार (RTI) वापरून ग्रामपंचायतीची कागदपत्रे, ठराव, खर्चाची माहिती व कामांचे तपशील मिळवू शकता. 👉 जागरूक नागरिक बना... ग्रामविकासात आपला सहभाग वाढवा! जनहितार्थ जारी 🇮🇳1
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात1
- गोपाळनगरमध्ये जुगारावर पोलिसांची धाड; ११ जणांवर गुन्हा खामगाव : गोपाळनगर परिसरात बेकायदेशीरपणे एका घरात सुरू असलेल्या 'एक्का-बादशहा' जुगारावर शिवाजीनगर पोलिसांनी धाड टाकून ११ जुगारींना रंगेहात पकडले आहे.या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन कौटुंबिक त्रासाबाबत तक्रार दिली होती.या तक्रारीच्या शहानिशेसाठी पोलीस पथक गोपाळनगर येथे गेले असता, उमेश चव्हाण याच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पैशांच्या हार-जीतवर ५२ ताश पत्यांचा 'एक्का-बादशहा' जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनानुसार, पोउपनि अमित तळोले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत उमेश जीवनसिंग चव्हाण, जयसिंग प्रल्हाद सोळंके , नितीन आत्माराम बिलारे, आकाश रामेश्वर लाहुडकर,सूर्यकांत सुखदेव निमकर्डे,विजय काशिराम सुलताने,केशव सिताराम टाले,गुलचंद रामसिंग चव्हाण,पुरुषोत्तम दादाराव वखारे,अंबादास शिवनारायण जाधव,शंकर विठ्ठल कुकडे सर्व रा.गोपाळनगर या ११ जणांना जागीच पकडण्यात आले,तर काही इसम घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले.कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींन कडून नगदी,मोबाईल व इतर साहित्यासह इतर असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमरसिंग पवार यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.1
- भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आली असून **तीन आरोपींना अटक** करण्यात आली आहे. 23 जुलै रोजी बँकेतून काढलेली रक्कम पिकअप वाहनातून चोरट्यांनी लंपास केली होती. सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून **₹8.80 लाखांची रोख रक्कम** जप्त करण्यात आली असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे व भोकरदन पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.1
- दिवसाढवळ्या 9 लाखांची रक्कम लंपास, भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई . मध्य प्रदेशातून 8 लाख 80 हजार हस्तगत, 3 आंतरराज्य चोरटे गजाआड महिलांचा विश्वास परत मिळवला बचत गटाच्या महिलांनी पोलिसांचा केला सत्कार भोकरदन शहर आणि परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या 9 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाचा भोकरदन पोलिसांनी अवघ्या 5 दिवसांत छडा लावला आहे. मध्य प्रदेशातील राजगड आणि गुणा जिल्ह्यातून 3 आंतरराज्य चोरट्यांना अटक करून 8 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या धडाकेबाज कारवाईने कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिलांचा जीव भांड्यात पडला असून त्यांनी पोलिसांचा सत्कार करून आभार मानले दि. 23 जुलै 2026 रोजी दुपारी 4 ते 4.30 च्या सुमारास कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिला बबीता भागाजी इच्चे वय 40 या भारतीय स्टेट बँक भोकरदन शाखेतून बचत गटाचे 9 लाख रुपये काढून त्यांच्या पिकअप वाहन क्रमांक MH-21-BH-0504 मध्ये ठेवून भोकरदन ते जाफ्राबाद रोडवरील रत्नमाला लॉनजवळ चहा पिण्यासाठी थांबल्या. काही क्षणांतच अज्ञात चोरट्यांनी वाहनाची डावी बाजूची काच फोडून आतील रोख रक्कम लंपास केली. या घटने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल होताच मा. पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंह संधू, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किरण बिडवे यांनी विशेष पथक तयार केले. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच SBI बँक आणि परिसरातील CCTV फुटेज तपासले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरटे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील गुलखेडी येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल बांगर, संतोष बनकर, पोलीस अंमलदार यांच्या पथकाने तात्काळ मध्य प्रदेशात धाव घेऊन 3 आरोपींना ताब्यात घेतले. 1.राहुल उत्तम सिसोदीया वय 22, रा. गुलखेडी, ता. पचोर, जि. राजगड 2.कालू उर्फ शिवप्रसाद सिसोदीया, रा. कडीया, ता. पचोर, जि. राजगड 3.कल्लू उर्फ जगप्रकाश सांसी वय 25, रा. मुगावली, ता. गुणा, जि. अशोकनगर आरोपींकडून 8 लाख 80 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले पोलिसांच्या तपासात समोर आले की, हे आरोपी टोळीने काम करतात. एकजण बँकेत आणि सोन्याच्या दुकानात रेकी करतो, तर दुसरा वाहनासह बाहेर लक्ष ठेवतो. गुन्हा करून ते लगेच लॉजवर थांबत नाहीत आणि मोटारसायकलसह हेल्मेटचा वापर करतात पोलिसांनी हस्तगत केलेली रक्कम आज भोकरदन पोलीस स्टेशनच्या आवारात बचत गटाच्या महिलांना परत करण्यात आली. पैसे परत मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. महिलांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बचत गटाच्या महिला म्हणाल्या, आमची आयुष्यभराची पुंजी होती. पोलीसांनी ती परत मिळवून दिली. आमचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. या प्रकरणानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोठी रक्कम एकट्याने घेऊन जाऊ नये. शक्यतो ऑनलाईन व्यवहार करावा. रक्कम उघडपणे दाखवू नये. बँकेतून पैसे काढल्यानंतर थेट घरी किंवा ऑफिसला जावे. निर्जन ठिकाणी वाहन थांबवू नये. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ 112 किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या यशस्वी कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू यांनी संपूर्ण भोकरदन पोलीस टीमचे कौतुक केले आहे. इसरारखान पठाण पत्रकार भोकरदन तर्फे भोकरदन पोलिसांच्या या तत्पर आणि व्यावसायिक कामगिरीचे अभिनंदन!4
- सीसीटीव्हीत कैद झाला भामट्याचा कारनामा; गंगापूरच्या सराफा दुकानातून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास सीसीटीव्हीत कैद झाला भामट्याचा कारनामा; गंगापूरच्या सराफा दुकानातून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरातील एका सराफा दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका भामट्याने दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सराफा दुकानात ग्राहक असल्याचे भासवत आला. त्याने विविध दागिने पाहिल्यानंतर दीड तोळ्याची सोन्याची अंगठी पाहण्यासाठी घेतली. संधी साधत त्याने अंगठी स्वतःजवळ ठेवली आणि दुकानातून बाहेर पडत पोबारा केला. काही वेळाने अंगठी नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुकान मालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गंगापूरमधील सराफा व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, ग्राहकांना दागिने दाखविताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील उमरा पानाचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकाची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शिक्षण विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी "शिक्षक द्या... आम्हाला शिक्षक द्या..." अशा घोषणा दिल्या. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ३३ विद्यार्थी असून सध्या केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. यापूर्वीही शिक्षक नियुक्तीबाबत संबंधित प्रशासनाकडे मागणी करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आठ दिवसांच्या आत शिक्षक नियुक्तीबाबत लेखी आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आमचे लक्ष राहील. आता पाहूया आंदोलनाचे प्रत्यक्ष दृश्य...1