logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीत सलग चार वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार सकाळी ९:५६ वाजता पहिला, ९:५९ वाजता दुसरा, १०:०० वाजता तुलनेने अधिक तीव्र आणि १०:०१ वाजता चौथा धक्का बसला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अचानक जमिनीला कंपने जाणवल्याने सराड, घागबारी, वाझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे दिगर, भिंतघर आणि जामनेमाळ या गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरांमधील पंखे व भांडी हलल्याने नागरिक, महिला व लहान मुलांनी भर पावसातच मोकळ्या जागेत धाव घेतली. सराड गावातील शिवसेना (शिंदे गट) तालुका अध्यक्ष हरिभाऊ भोये, पोलीस पाटील कांतीलाल भोये, रामचंद्र चौरे, लक्ष्मण चौरे व पंडित भोये तसेच घागबारी येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य चिंतामण गायकवाड, माजी उपसरपंच तुळशीदास पिठे, पोलीस पाटील गोपाळ गायकवाड व प्रकाश गायकवाड यांनी या भूकंपाच्या धक्क्यांची पुष्टी केली. भूकंपाचे धक्के जाणवताच महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. प्राथमिक पंचनामे आणि माहिती संकलनानंतर कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी संकलित केलेली माहिती तहसील कार्यालयामार्फत नाशिक येथील भूकंप मापन केंद्राकडे पाठवण्यात आली असून तज्ज्ञांच्या पुढील तांत्रिक अहवालाची प्रतीक्षा आहे. सुरगाणाचे तहसीलदार रामजी राठोड यांनी परिस्थितीवर सतत लक्ष असल्याचे सांगत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या अफवा पसरल्या असल्या तरी प्रशासनाने त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. डोंगराळ व आदिवासीबहुल असलेल्या सुरगाणा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना शांत राहण्याचे, इमारती व विजेच्या खांबांपासून दूर राहण्याचे आणि सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

4 hrs ago
user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
दिव्य भारत बीएसएम न्यूज
Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
4 hrs ago

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीत सलग चार वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार सकाळी ९:५६ वाजता पहिला, ९:५९ वाजता दुसरा, १०:०० वाजता तुलनेने अधिक तीव्र आणि १०:०१ वाजता चौथा धक्का बसला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अचानक जमिनीला कंपने जाणवल्याने सराड, घागबारी, वाझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे दिगर, भिंतघर आणि जामनेमाळ या गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरांमधील पंखे व भांडी हलल्याने नागरिक, महिला व लहान मुलांनी भर पावसातच मोकळ्या जागेत धाव घेतली. सराड गावातील शिवसेना (शिंदे गट) तालुका अध्यक्ष हरिभाऊ भोये, पोलीस पाटील कांतीलाल भोये, रामचंद्र चौरे, लक्ष्मण चौरे व पंडित भोये तसेच घागबारी येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य चिंतामण गायकवाड, माजी उपसरपंच तुळशीदास पिठे, पोलीस पाटील गोपाळ गायकवाड व प्रकाश गायकवाड यांनी

या भूकंपाच्या धक्क्यांची पुष्टी केली. भूकंपाचे धक्के जाणवताच महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. प्राथमिक पंचनामे आणि माहिती संकलनानंतर कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी संकलित केलेली माहिती तहसील कार्यालयामार्फत नाशिक येथील भूकंप मापन केंद्राकडे पाठवण्यात आली असून तज्ज्ञांच्या पुढील तांत्रिक अहवालाची प्रतीक्षा आहे. सुरगाणाचे तहसीलदार रामजी राठोड यांनी परिस्थितीवर सतत लक्ष असल्याचे सांगत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या अफवा पसरल्या असल्या तरी प्रशासनाने त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. डोंगराळ व आदिवासीबहुल असलेल्या सुरगाणा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना शांत राहण्याचे, इमारती व विजेच्या खांबांपासून दूर राहण्याचे आणि सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड परिसरात २५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे, तहसीलदार रामजी राठोड आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रभावित भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सराड गावात भेट देऊन जीवित अथवा वित्तहानीची माहिती घेतली आणि सर्व संबंधित यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या. प्रशासकीय दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी हतगडजवळील गायदरपाडा येथील अंगणवाडी व शाळेला भेट देऊन इमारतीची सुरक्षितता, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आणि पोषण आहाराच्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर गारमाळ येथे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडल्याने पीडित कुटुंबाची भेट घेऊन नुकसानाची पाहणी केली. महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नियमानुसार मदत देण्याचे निर्देश देण्यात आले असून, नागरिकांना धोकादायक इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर देवलदरी येथे तालुका कृषी विभागाच्या 'खत वितरण बांधावर' या उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी स्वतः पारंपरिक घोंगडे (इरले) परिधान करून चिखलात उतरत भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी त्यांनी पावसाचे प्रमाण, भात लागवड, खत पुरवठा आणि कृषी योजनांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते व तांत्रिक मार्गदर्शन पुरवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे, संजय पवार, विलास भोये, श्रीमती सहारे आणि पोलीस पाटील रेखा पवार यांच्यासह अनेक अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
    2
    नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड परिसरात २५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे, तहसीलदार रामजी राठोड आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रभावित भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सराड गावात भेट देऊन जीवित अथवा वित्तहानीची माहिती घेतली आणि सर्व संबंधित यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या.

प्रशासकीय दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी हतगडजवळील गायदरपाडा येथील अंगणवाडी व शाळेला भेट देऊन इमारतीची सुरक्षितता, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आणि पोषण आहाराच्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर गारमाळ येथे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडल्याने पीडित कुटुंबाची भेट घेऊन नुकसानाची पाहणी केली. महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नियमानुसार मदत देण्याचे निर्देश देण्यात आले असून, नागरिकांना धोकादायक इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.

यानंतर देवलदरी येथे तालुका कृषी विभागाच्या 'खत वितरण बांधावर' या उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी स्वतः पारंपरिक घोंगडे (इरले) परिधान करून चिखलात उतरत भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी त्यांनी पावसाचे प्रमाण, भात लागवड, खत पुरवठा आणि कृषी योजनांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते व तांत्रिक मार्गदर्शन पुरवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे, संजय पवार, विलास भोये, श्रीमती सहारे आणि पोलीस पाटील रेखा पवार यांच्यासह अनेक अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नाशिक रोड परिसरातील 'प्रतिपंढरपूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या विहितगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली. अखंड नामस्मरण, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. पहाटे पांडुरंगाच्या मूर्तीचा अभिषेक, काकड आरती, भजन आणि 'रामकृष्ण हरी' नामजपाने सोहळ्याची सुरुवात झाली. पंढरपूरला प्रत्यक्ष दर्शनासाठी जाऊ न शकलेल्या भाविकांनी विहितगावातील विठ्ठलाचे दर्शन घेतले. या सोहळ्यादरम्यान आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी गायक सागर कुलकर्णी यांच्या 'चला हो पंढरीसी जाऊ या' या भक्तिसंगीत कार्यक्रमाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर संगीत कुलकर्णी, हार्मोनियमवर अभिजित भटजिरे आणि मृदंगावर दिनेश मोजाड यांनी साथ दिली. सायंकाळी पळसे येथील संत आईसाहेब महाराज भजनी मंडळाने 'रामवाणी तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' ही भजन संध्या सादर केली. दिवसभर मंदिर परिसरात 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' या नामाचा अखंड गजर सुरू होता आणि भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार सरोज अहिरे, माजी मंत्री बबनराव घोलप, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विती शिंदे, माजी खासदार हेमंत गोडसे, प्रभाग सभापती रमेश धोंगडे, ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, गटनेते केशव पोरजे, नगरसेवक योगेश गाडेकर, वैशाली दाणी, संजीवनी हंडोरे, डॉ. बाळासाहेब कोठुळे यांच्यासह देवस्थान समितीचे अध्यक्ष रवींद्र हांडोरे, उपाध्यक्ष दिनेश हांडोरे, सचिव शांताराम कोठुळे, खजिनदार शिवाजी हांडोरे, बाळू कोठूळे, उत्तमराव कोठुळे, संजय हांडोरे, विक्रम कोठुळे, अनिल हांडोरे, कैलास हांडोरे, नाना हांडोरे, शरद हांडोरे, विजय हांडोरे, किरण कोठुळे, अमर जमधडे, भक्तिधाम मंडळ विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नाशिक रोड परिसरातील 'प्रतिपंढरपूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या विहितगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली. अखंड नामस्मरण, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. पहाटे पांडुरंगाच्या मूर्तीचा अभिषेक, काकड आरती, भजन आणि 'रामकृष्ण हरी' नामजपाने सोहळ्याची सुरुवात झाली. पंढरपूरला प्रत्यक्ष दर्शनासाठी जाऊ न शकलेल्या भाविकांनी विहितगावातील विठ्ठलाचे दर्शन घेतले.

या सोहळ्यादरम्यान आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी गायक सागर कुलकर्णी यांच्या 'चला हो पंढरीसी जाऊ या' या भक्तिसंगीत कार्यक्रमाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर संगीत कुलकर्णी, हार्मोनियमवर अभिजित भटजिरे आणि मृदंगावर दिनेश मोजाड यांनी साथ दिली. सायंकाळी पळसे येथील संत आईसाहेब महाराज भजनी मंडळाने 'रामवाणी तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' ही भजन संध्या सादर केली. दिवसभर मंदिर परिसरात 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' या नामाचा अखंड गजर सुरू होता आणि भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी आमदार सरोज अहिरे, माजी मंत्री बबनराव घोलप, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विती शिंदे, माजी खासदार हेमंत गोडसे, प्रभाग सभापती रमेश धोंगडे, ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, गटनेते केशव पोरजे, नगरसेवक योगेश गाडेकर, वैशाली दाणी, संजीवनी हंडोरे, डॉ. बाळासाहेब कोठुळे यांच्यासह देवस्थान समितीचे अध्यक्ष रवींद्र हांडोरे, उपाध्यक्ष दिनेश हांडोरे, सचिव शांताराम कोठुळे, खजिनदार शिवाजी हांडोरे, बाळू कोठूळे, उत्तमराव कोठुळे, संजय हांडोरे, विक्रम कोठुळे, अनिल हांडोरे, कैलास हांडोरे, नाना हांडोरे, शरद हांडोरे, विजय हांडोरे, किरण कोठुळे, अमर जमधडे, भक्तिधाम मंडळ विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती माने यांच्या समवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. महापूजेनंतर झालेल्या सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर मंदिर परिसराचा विकास ‘पंढरपूर कॉरिडॉर’च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची घोषणा केली. कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसनासह हे काम पुढील अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. वाढती गर्दी लक्षात घेता या कॉरिडॉर प्रकल्पामुळे भाविकांना सुलभ दर्शन, नागरिकांचे पुनर्वसन आणि स्थानिक व्यावसायिकांना चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यंदाच्या वारीत २५ किलोमीटरहून अधिक लांबीची दर्शनरांग लागली तरी वारकऱ्यांनी विठ्ठलनामाचा गजर करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतल्याचे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्याचे सांगितले. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठुरायाची सेवा असल्याचे सांगत, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीज आणि थकीत वीजबिले माफ करण्याचे निर्णय घेतले असून यातून ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापूजेनंतर मुख्यमंत्री व अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करून त्यांना एसटी महामंडळाकडून वर्षभरासाठी मोफत प्रवास पास प्रदान करण्यात आला. यावेळी पाणी, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार वितरित करण्यात आले. यामध्ये कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानला प्रथम, जालन्याच्या वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठानला द्वितीय आणि आळंदी देवाची येथील गोऱ्हेकर संस्थेला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
    1
    आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती माने यांच्या समवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. महापूजेनंतर झालेल्या सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर मंदिर परिसराचा विकास ‘पंढरपूर कॉरिडॉर’च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची घोषणा केली. कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसनासह हे काम पुढील अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. वाढती गर्दी लक्षात घेता या कॉरिडॉर प्रकल्पामुळे भाविकांना सुलभ दर्शन, नागरिकांचे पुनर्वसन आणि स्थानिक व्यावसायिकांना चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यंदाच्या वारीत २५ किलोमीटरहून अधिक लांबीची दर्शनरांग लागली तरी वारकऱ्यांनी विठ्ठलनामाचा गजर करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतल्याचे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्याचे सांगितले. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठुरायाची सेवा असल्याचे सांगत, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीज आणि थकीत वीजबिले माफ करण्याचे निर्णय घेतले असून यातून ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापूजेनंतर मुख्यमंत्री व अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करून त्यांना एसटी महामंडळाकडून वर्षभरासाठी मोफत प्रवास पास प्रदान करण्यात आला. यावेळी पाणी, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार वितरित करण्यात आले. यामध्ये कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानला प्रथम, जालन्याच्या वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठानला द्वितीय आणि आळंदी देवाची येथील गोऱ्हेकर संस्थेला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नाशिक जिल्हा परिषदेच्या पर्यटन स्थळ योजनेअंतर्गत येवला तालुक्यातील कोटमगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य निवारा शेडचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. मूलभूत सुविधा आणि अनुषंगिक कामांअंतर्गत उभारण्यात आलेल्या या निवारा शेडसाठी ४२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या सोहळ्याचे लोकार्पण शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे आणि शरदचंद्र पवार गटाचे ॲड. माणिकराव शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष कुणाल दराडे यांच्यासह गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सरपंच, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे निवारा शेड विठ्ठल मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
    1
    नाशिक जिल्हा परिषदेच्या पर्यटन स्थळ योजनेअंतर्गत येवला तालुक्यातील कोटमगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य निवारा शेडचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. मूलभूत सुविधा आणि अनुषंगिक कामांअंतर्गत उभारण्यात आलेल्या या निवारा शेडसाठी ४२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

या सोहळ्याचे लोकार्पण शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे आणि शरदचंद्र पवार गटाचे ॲड. माणिकराव शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष कुणाल दराडे यांच्यासह गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सरपंच, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे निवारा शेड विठ्ठल मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी हा लढा संपलेला नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. मोदी सरकारच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेस पक्षाचा लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्यासह या रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, संसदेत यावर चर्चा झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे रद्द केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागितल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावाच लागला, पण या राजीनाम्याने हुरळून जाण्याची गरज नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या काळात परीक्षेवर पकड निर्माण करून 'वन नेशन, वन एक्झामिनेशन'च्या माध्यमातून १५२ वेळा पेपर लीक करण्यात आला. यातून एका वर्ग विशेषाला व भाजपच्या लोकांना फायदा पोहोचवून भ्रष्ट मार्गाने पैसे कमवण्यात आले. नीट परीक्षेसाठी पालक जेवढा पैसा खर्च करतात, तो केंद्र सरकारच्या पाच विभागांतील खर्चापेक्षा जास्त आहे. या रॅकेटची मुळे खोलवर गेलेली असून या सर्वांचा शोध लागल्याशिवाय शांत बसणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने काँग्रेसचे आंदोलन थांबणार नसून कँडल मार्चही काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    1
    नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी हा लढा संपलेला नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. मोदी सरकारच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेस पक्षाचा लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्यासह या रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, संसदेत यावर चर्चा झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे रद्द केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागितल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावाच लागला, पण या राजीनाम्याने हुरळून जाण्याची गरज नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या काळात परीक्षेवर पकड निर्माण करून 'वन नेशन, वन एक्झामिनेशन'च्या माध्यमातून १५२ वेळा पेपर लीक करण्यात आला. यातून एका वर्ग विशेषाला व भाजपच्या लोकांना फायदा पोहोचवून भ्रष्ट मार्गाने पैसे कमवण्यात आले. नीट परीक्षेसाठी पालक जेवढा पैसा खर्च करतात, तो केंद्र सरकारच्या पाच विभागांतील खर्चापेक्षा जास्त आहे. या रॅकेटची मुळे खोलवर गेलेली असून या सर्वांचा शोध लागल्याशिवाय शांत बसणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने काँग्रेसचे आंदोलन थांबणार नसून कँडल मार्चही काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीत सलग चार वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार सकाळी ९:५६ वाजता पहिला, ९:५९ वाजता दुसरा, १०:०० वाजता तुलनेने अधिक तीव्र आणि १०:०१ वाजता चौथा धक्का बसला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अचानक जमिनीला कंपने जाणवल्याने सराड, घागबारी, वाझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे दिगर, भिंतघर आणि जामनेमाळ या गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरांमधील पंखे व भांडी हलल्याने नागरिक, महिला व लहान मुलांनी भर पावसातच मोकळ्या जागेत धाव घेतली. सराड गावातील शिवसेना (शिंदे गट) तालुका अध्यक्ष हरिभाऊ भोये, पोलीस पाटील कांतीलाल भोये, रामचंद्र चौरे, लक्ष्मण चौरे व पंडित भोये तसेच घागबारी येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य चिंतामण गायकवाड, माजी उपसरपंच तुळशीदास पिठे, पोलीस पाटील गोपाळ गायकवाड व प्रकाश गायकवाड यांनी या भूकंपाच्या धक्क्यांची पुष्टी केली. भूकंपाचे धक्के जाणवताच महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. प्राथमिक पंचनामे आणि माहिती संकलनानंतर कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी संकलित केलेली माहिती तहसील कार्यालयामार्फत नाशिक येथील भूकंप मापन केंद्राकडे पाठवण्यात आली असून तज्ज्ञांच्या पुढील तांत्रिक अहवालाची प्रतीक्षा आहे. सुरगाणाचे तहसीलदार रामजी राठोड यांनी परिस्थितीवर सतत लक्ष असल्याचे सांगत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या अफवा पसरल्या असल्या तरी प्रशासनाने त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. डोंगराळ व आदिवासीबहुल असलेल्या सुरगाणा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना शांत राहण्याचे, इमारती व विजेच्या खांबांपासून दूर राहण्याचे आणि सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
    2
    नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीत सलग चार वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार सकाळी ९:५६ वाजता पहिला, ९:५९ वाजता दुसरा, १०:०० वाजता तुलनेने अधिक तीव्र आणि १०:०१ वाजता चौथा धक्का बसला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अचानक जमिनीला कंपने जाणवल्याने सराड, घागबारी, वाझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे दिगर, भिंतघर आणि जामनेमाळ या गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरांमधील पंखे व भांडी हलल्याने नागरिक, महिला व लहान मुलांनी भर पावसातच मोकळ्या जागेत धाव घेतली.

सराड गावातील शिवसेना (शिंदे गट) तालुका अध्यक्ष हरिभाऊ भोये, पोलीस पाटील कांतीलाल भोये, रामचंद्र चौरे, लक्ष्मण चौरे व पंडित भोये तसेच घागबारी येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य चिंतामण गायकवाड, माजी उपसरपंच तुळशीदास पिठे, पोलीस पाटील गोपाळ गायकवाड व प्रकाश गायकवाड यांनी या भूकंपाच्या धक्क्यांची पुष्टी केली. भूकंपाचे धक्के जाणवताच महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. प्राथमिक पंचनामे आणि माहिती संकलनानंतर कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी संकलित केलेली माहिती तहसील कार्यालयामार्फत नाशिक येथील भूकंप मापन केंद्राकडे पाठवण्यात आली असून तज्ज्ञांच्या पुढील तांत्रिक अहवालाची प्रतीक्षा आहे. सुरगाणाचे तहसीलदार रामजी राठोड यांनी परिस्थितीवर सतत लक्ष असल्याचे सांगत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या अफवा पसरल्या असल्या तरी प्रशासनाने त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. डोंगराळ व आदिवासीबहुल असलेल्या सुरगाणा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना शांत राहण्याचे, इमारती व विजेच्या खांबांपासून दूर राहण्याचे आणि सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील जायविहिर मनखेड येथे डोंगराच्या शेजारी भूस्खलनासारखा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील जायविहिर मनखेड येथे डोंगराच्या शेजारी भूस्खलनासारखा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.