Shuru
Apke Nagar Ki App…
मुंब्रा येथील वाढती लोकसंख्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन AIMIM चे नगरसेवक शोएब डोंगरे यांनी महासभेत स्लॉटर हाऊसची व्यवस्था करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या मागणीला AIMIM चे गट नेते आणि नगरसेवक सैफ पठान यांनी जोरदार पाठिंबा दिला असून मुंब्रा येथील नागरिकांच्या सोयी-सुविधा लक्षात घेता लवकरात लवकर स्लॉटर हाऊसची व्यवस्था करण्यात यावी, असे म्हटले आहे. सैफ पठान यांनी पुढे बोलताना सांगितले की, ही मागणी थेट सामान्य जनतेच्या गरजांशी जोडलेली असून संबंधित प्रशासनाने या दिशेने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. जनतेच्या हिताशी संबंधित मुद्दे प्रत्येक व्यासपीठावर अत्यंत मजबुतीने मांडत राहू, अशी भूमिका AIMIM कडून व्यक्त करण्यात आली आहे.
Imran Shaikh
मुंब्रा येथील वाढती लोकसंख्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन AIMIM चे नगरसेवक शोएब डोंगरे यांनी महासभेत स्लॉटर हाऊसची व्यवस्था करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या मागणीला AIMIM चे गट नेते आणि नगरसेवक सैफ पठान यांनी जोरदार पाठिंबा दिला असून मुंब्रा येथील नागरिकांच्या सोयी-सुविधा लक्षात घेता लवकरात लवकर स्लॉटर हाऊसची व्यवस्था करण्यात यावी, असे म्हटले आहे. सैफ पठान यांनी पुढे बोलताना सांगितले की, ही मागणी थेट सामान्य जनतेच्या गरजांशी जोडलेली असून संबंधित प्रशासनाने या दिशेने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. जनतेच्या हिताशी संबंधित मुद्दे प्रत्येक व्यासपीठावर अत्यंत मजबुतीने मांडत राहू, अशी भूमिका AIMIM कडून व्यक्त करण्यात आली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुंब्रा येथील वाढती लोकसंख्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन AIMIM चे नगरसेवक शोएब डोंगरे यांनी महासभेत स्लॉटर हाऊसची व्यवस्था करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या मागणीला AIMIM चे गट नेते आणि नगरसेवक सैफ पठान यांनी जोरदार पाठिंबा दिला असून मुंब्रा येथील नागरिकांच्या सोयी-सुविधा लक्षात घेता लवकरात लवकर स्लॉटर हाऊसची व्यवस्था करण्यात यावी, असे म्हटले आहे. सैफ पठान यांनी पुढे बोलताना सांगितले की, ही मागणी थेट सामान्य जनतेच्या गरजांशी जोडलेली असून संबंधित प्रशासनाने या दिशेने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. जनतेच्या हिताशी संबंधित मुद्दे प्रत्येक व्यासपीठावर अत्यंत मजबुतीने मांडत राहू, अशी भूमिका AIMIM कडून व्यक्त करण्यात आली आहे.1
- वर्धा जिल्ह्यातील रोठा येथे एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे एकत्र येत आंदोलन केले. महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवून खटला जलदगतीने निकाली काढण्याची आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. नरसापूर येथील प्रकरणाच्या धर्तीवर या घटनेतील आरोपींनाही फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा अमानुष कृत्यांना आळा बसेल, अशी ठाम मागणी महिलांनी केली आहे. महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त करत, अशा गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, 'निष्पाप बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे' असा आक्रमक सूर यावेळी उमटला.2
- वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील उन्नती गृह उद्योगाच्या माध्यमातून पंतप्रधान अन्न सूक्ष्म प्रक्रिया अंतर्गत शेंगदाणा लाडू तयार केले जात आहेत.4
- नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या तपासी पथकाने घरफोडीच्या गंभीर प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत एका सराईत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करून फरियादीला परत सोपवत धडाकेबाज कामगिरी केली आहे. भंडारा रोड, पाडी येथील रहिवासी आदित्य गौरव आर्य (वय २१) यांच्या 'वन क्लिकी एंटरप्रायझेस' या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोराने रोख रकमेसह साहित्य लांबवले होते. या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३०५(अ) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि गुप्त बातमीदार तसेच गुन्ह्याच्या विशिष्ट पद्धतीचा (मोडस ऑपरेंडी) अभ्यास करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जाळे विणून ओमप्रकाश पुनम लहरे (वय २६, रा. मिनीमाता नगर, पाचपावली, नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने या चोरीची कबुली दिली. पोलीस तपासात आरोपी हा गुन्हेगारी अभिलेखावरील शातिर गुन्हेगार असल्याचे आणि त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेसंबंधी अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी बंद दुकाने व घरांचे शटर उचकटून सहज नेता येईल असा मौल्यवान माल चोरणे ही त्याची गुन्हे करण्याची पद्धत होती. नागपूर शहर पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.2
- चंद्रपूर येथे बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दल गौरवद्गार काढले असून, संघर्षाचा समानार्थी शब्द म्हणजे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. अन्यायाविरुद्ध अखंड लढा, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष आणि जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देणारे नेतृत्व हीच त्यांची खरी ओळख असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी नमूद केले.1
- नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दुकानाचे शटर उचकटून झालेल्या घरफोडीचा गंभीर गुन्हा अवघ्या २४ तासांच्या आत उघडकीस आणला आहे. गुप्त माहिती आणि आरोपीच्या गुन्ह्यांच्या पद्धतीचा अभ्यास करून पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली असून, चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करून फिर्यादीला परत मिळवून दिला आहे. दिनांक २०/०७/२०२६ रोजी भंडारा रोड, पाडी येथील रहिवासी २१ वर्षीय फिर्यादी आदित्य गौरव आर्य यांच्या 'वन क्लिकी इंटरप्रायझेस' या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानातील कॅश व साहित्य चोरून नेले होते. या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा क्र. ४५०/२०२६ दाखल करण्यात आला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मिनीमाता नगर, पाचपावली येथील २६ वर्षीय आरोपी ओमप्रकाश पुनम लहरे याला ताब्यात घेतले. कडक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून तो पोलिसांच्या क्राईम चार्टवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पोलीस निरीक्षक मनोज चौधरी, पीएसआय दीपक पोफळे, देवेंद्र शेलुकर, ईश्वर मोहेकर आणि आशिष बांते यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी बजावली. नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.1
- आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले आहे की, ज्या नेत्यांचे त्यांच्यावर मोठे ऋण आहे, त्यामध्ये पहिले नाव केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी आणि दुसरे नाव लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच बल्लारशा तहसीलच्या निर्मितीचा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली. मुनगंटीवार यांच्या मते, हा निर्णय केवळ एक प्रशासकीय बदल नसून जनतेच्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला मिळालेला खरा न्याय होता. या ज्येष्ठ नेत्यांच्या ऋणाची जाणीव आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपल्या मनात आयुष्यभर कायम राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत।1
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील साखरा येथील उड्डाण पुलावर रास्त धान्य दुकानात रेशनचा माल घेऊन जाणाऱ्या ४०७ मिनीडोर आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात २० जुलै रोजी दुपारी सुमारे ३:३० वाजताच्या सुमारास घडला. या अपघातात दिनेश नारायणराव मुरतलवार (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा दिनेश मुरतलवार (वय १८, रा. दोरली, पांढरकवडा) हे गंभीर जखमी झाले आहेत. शासकीय धान्य गोदाम पांढरकवडा येथून ४०७ मिनीडोर वाहनाने (क्र. एम.एच. १२ एफ.डी. १४४०) तालुक्यातील मंगी येथे धान्य घेऊन जात असताना साखरा उड्डाणपुलाजवळ धान्याचे एक पोते खाली रस्त्यावर पडले. चालकाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी ते पोते उचलण्यासाठी गाडी उड्डाणपुलावरच फिरवून राँग साईडने टाकली. त्याच वेळी हैदराबादवरून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने (क्र. आर.जे. ११ जीबी ३१२९) मिनीडोरला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने एकमेकांमध्ये अडकली आणि ४०७ मधील लोक व ट्रकचालक आत फसले. मृतक व जखमींना बाहेर काढण्यासाठी अखेर क्रेन आणि कटरचा वापर करावा लागला. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत असल्याची माहिती २१ जुलै रोजी पोलिसांनी दिली आहे.1