logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गणेशोत्सवामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक जाणीव जपल्याबद्दल रक्तदात्यांना हेल्मेट वाटप गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश गणेश मंडळाचे रक्तदान शिबिर; सुवर्णा सराफ गणेश मंडळासह ७१ हेल्मेटचे वाटप. लातूर (प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा संदेश देत पोलीस स्टेशन गांधी चौक हद्दीतील श्री शिवछत्रपती गणेश मंडळ, मोती नगर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच नागरिकांच्या रस्ते सुरक्षेचा विचार करून मंडळाच्या वतीने ५० हेल्मेटचे वाटप करण्यात आले. याच उपक्रमांतर्गत सुवर्णा सराफ गणेश मंडळ, सराफ लाईन यांच्या वतीनेही २१ हेल्मेटचे वाटप करण्यात आले.पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवावेत तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही गणेश मंडळांनी पुढाकार घेत रक्तदान व हेल्मेट वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम राबविला. गांधी चौकचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजितवाड यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमास सुवर्णा सराफ गणेश मंडळ, सराफ लाईनचे अध्यक्ष अजय पाटील, तसेच नरसिंग कापसे, गोपाळ भंडे व तानाजी पायाळ उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्री शिवछत्रपती गणेश मंडळ, मोती नगरचे अध्यक्ष विश्वजीत बुद्रे, उपाध्यक्ष गणेश बतनपुरे, तसेच गणेश कांबळे, आकाश देवकर, कार्तिक कापसे व अजय हुच्चे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत मिळावी, तर हेल्मेट वाटपाच्या माध्यमातून दुचाकीस्वारांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता. “हेल्मेट वापरा, सुरक्षित प्रवास करा” हा संदेश या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक बांधिलकी, नागरिकांची सुरक्षितता आणि समाजोपयोगी कार्याला चालना मिळावी, या उद्देशाने लातूर शहरातील इतर गणेश मंडळांनीही रक्तदान, हेल्मेट वाटप, वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. “गणेशोत्सवातून भक्तीबरोबरच समाजसेवा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा संदेश देऊया,” हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

2 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
c06e1636-00e1-468c-b1e5-77dbc7f7ea39

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी)          मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले.  हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी)   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले.  हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला.
    3
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

(मुखेड :- प्रतिनिधी)  

       मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल."

तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. 

हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला.

    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला?? निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!! तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!! महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?
    1
    दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला??
निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!!
तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!!
महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?
    user_सुरज हादवे
    सुरज हादवे
    Business banking service निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.
    4
    नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान.
नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026.
नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाहतूक विस्कळीत.
मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
जुनी झाडे हटवण्याची मागणी
या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी
    1
    रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी
    user_Beed News Express
    Beed News Express
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
    1
    सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
    1
    ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • कंदलगावात घरफोडीसह जबरी चोरी; दोन ठिकाणी महिलांना मारहाण. सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला; दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी व जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आठ जणांच्या टोळक्याने परिसरात धुमाकूळ घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव गौरप्पा कोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून तेथील दोन वयोवृद्ध महिलांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कंदलगाव मधील विंचूर रोड लगत असलेल्या बुद्धाप्पा घोडके यांच्या वस्तीवरही चोरट्यांनी धाड टाकल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घोडके वस्ती या ठिकाणीही महिलांना मारहाण करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवण्यात आला असल्याचे घोडके कुटुंबीयांनी सांगितले . सदर घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन डी.वाय.एसपी गणेश शिंदे पाटील , पी.एस.आय अमितकुमार करपे आणि पी.एस.आय राज डांगे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पंचनामे, फिंगरप्रिंट सह श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकास पाचरण करत घटनास्थळी पाहणी करून तपास यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. दरम्यान, कंदलगाव परिसरात अलीकडील काळात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे तसेच शक्य असल्यास घर, वस्ती आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन मंद्रूप पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.
    1
    कंदलगावात घरफोडीसह जबरी चोरी; दोन ठिकाणी महिलांना मारहाण.
सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला;  
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी व जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आठ जणांच्या टोळक्याने परिसरात धुमाकूळ घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव गौरप्पा कोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून तेथील दोन वयोवृद्ध महिलांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच कंदलगाव मधील विंचूर रोड लगत असलेल्या बुद्धाप्पा घोडके यांच्या वस्तीवरही चोरट्यांनी धाड टाकल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.  घोडके वस्ती या ठिकाणीही महिलांना मारहाण करून  धारदार शस्त्रांचा धाक दाखवण्यात आला असल्याचे घोडके कुटुंबीयांनी सांगितले .
सदर घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन डी.वाय.एसपी गणेश शिंदे पाटील ,  पी.एस.आय अमितकुमार करपे आणि पी.एस.आय राज डांगे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पंचनामे, फिंगरप्रिंट सह  श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकास पाचरण करत घटनास्थळी पाहणी करून  तपास यंत्रणा गतिमान  करण्यात आली आहे.
दरम्यान, कंदलगाव परिसरात अलीकडील काळात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे तसेच शक्य असल्यास घर, वस्ती आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन मंद्रूप पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.
    1
    लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार.
लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. 
हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नियोजनबद्ध कटाचा संशय.
बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पालकमंत्री शहरात असतानाच थरार.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.