साहित्याचा डंका! मायणीचे सुपुत्र बाळासाहेब कांबळे यांच्या 'भिनवाडा' कादंबरीचा शिवाजी कॉलेजच्या अभ्यासक्रमात समावेश साहित्याचा डंका! मायणीचे सुपुत्र बाळासाहेब कांबळे यांच्या 'भिनवाडा' कादंबरीचा शिवाजी कॉलेजच्या अभ्यासक्रमात समावेश मायणी - प्रतिनिधी सातारा जिल्ह्याच्या साहित्यिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मायणी येथील प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब कांबळे यांच्या ‘भिनवाडा’ या कादंबरीची निवड सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाशी संलग्न असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बी. ए. भाग ३ (मायनर मराठी) अभ्यासक्रमासाठी करण्यात आली आहे. एका ग्रामीण लेखकाच्या साहित्याला विद्यापीठीय स्तरावर स्थान मिळाल्याने संपूर्ण खटाव तालुक्याच्या साहित्य क्षेत्रात आनंदी वातावरण पसरले आहे. 'भिनवाडा' ही कादंबरी सातारा जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगरी भागातील जनजीवनाचे जिवंत चित्रण करते. तिथल्या मातीतील प्रश्न, संघर्ष आणि संस्कृतीचा वास्तववादी आरसा या कादंबरीत मांडण्यात आला आहे. याच वैशिष्ट्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात या कलाकृतीची दखल घेण्यात आली असून, आता पदवी स्तरावरील विद्यार्थी या कादंबरीचा सखोल अभ्यास करणार आहेत. या ऐतिहासिक यशाबद्दल खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्या हस्ते बाळासाहेब कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अँड.सुरज पाटील मायणी जिल्हा परिषद सदस्य, डॉ. विकास देशमुख,राजाराम कचरे,अमोल भिसे यांच्यासह अनेक स्थानिक प्रतिष्ठित नागरिक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. एका स्थानिक लेखकाची कृती अभ्यासक्रमाचा भाग होणे ही मायणी गावासह संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील साहित्याला मिळालेल्या या संधीमुळे नवोदित लेखकांनाही प्रोत्साहन मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले आहे. फोटो ओळी - भिनवाडाकार बाळासाहेब कांबळे यांचा सन्मान करताना डॉ.दिलीपराव येळगावकर,डॉ.विकास देशमुख व अन्य मान्यवर..(छाया - दत्ता कोळी)

- पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड झाली आहे. पणदरे गटातून निवडून आलेल्या किरण तावरे यांच्यावर संघटन कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या जोरावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार झाल्याची माहिती समोर येत आहे. निवडीनंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण विकास, शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या योजनांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.1
- विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील नाझरे गावात शेकडो वर्षांपासून सोंगांच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची सेवा करण्याची अनोखी परंपरा आजही जपली जात आहे. पूर्वजांच्या श्रद्धेतून सुरू झालेली ही परंपरा पिढ्यान् पिढ्या ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे. होळी नंतर सलग सात दिवस यात्रेपर्यंत गावात विविध सोंगं घेऊन उत्सव साजरा केला जातो. गावातील खेळगडी वेगवेगळी वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या तालावर गावभर फिरतात. त्यानंतर चौकाचौकात ढोल-ताशांच्या गजरात सोंगांचे सादरीकरण करत ग्रामस्थांचे मनोरंजन केले जाते. या परंपरेमागे एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी खेळगड्यांचा वंश वाढत नसल्याने गावच्या पूर्वजांनी ग्रामदैवत भैरवनाथाला नवस केला होता. त्यानुसार धुलवडीच्या दिवशी होळीची शिळी पोळी घरोघरी मागून ती ओढ्याजवळ जाऊन खाणे तसेच गावातून वेगवेगळ्या सोंगांचे सादरीकरण करत छबिना काढण्याची प्रथा सुरू झाली. हा नवस फेडत आजही ग्रामस्थ सोंगांच्या माध्यमातून भैरवनाथ देवाची सेवा करत ही शेकडो वर्षांची परंपरा जिवंत ठेवत आहेत.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रफुल्लित केंद्रामार्फत कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे प्रेरणादायी उपक्रम पार पडला. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. तसेच प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांचा ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.2
- सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.1
- कोल्हापूर : रविराज कांबळे अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता कोल्हापुरातही उमटताना दिसत आहेत. शहरातील विविध गॅस एजन्सींच्या बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.संभाव्य गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी एजन्सींकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा जाणवणार नसून पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.1
- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.1