मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक आणि ग्रामपंचायतच्या कर्तबगार अधिकाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शिक्षक, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा १७ सप्टेंबरला पुरस्काराने सन्मान लातूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद, लातूरच्या वतीने जिल्हा शिक्षक व ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण समारंभ सन २०२६ आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डि. मार्ट रिंग रोड येथील विश्व पॅलेस मंगल कार्यालयात हा पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील प्रमुख उपस्थित म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई संभाजी पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद (मंत्री दर्जा) व शिक्षक आमदार विक्रम काळे, धाराशिव लोकसभा सदस्य ओमप्रकाश राजेनिंबाळकर, लातूर लोकसभा सदस्य डॉ. शिवाजी काळगे, विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण, विधानपरिषद सदस्य बसवराज पाटील मुरुमकर, लातूर शहर विधानसभा सदस्य अमित विलासराव देशमुख, निलंगा विधानसभा सदस्य संभाजीराव पाटील निलंगेकर, उदगीर विधानसभा सदस्य संजय बनसोडे, औसा विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार आणि लातूर ग्रामीण विधानसभा सदस्य रमेशअप्पा कराड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती दयानंद केवळ दामोदर सुरवसे जबाबदारी पार पाडणार आहेत. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती ज्ञानेश्वर हरिभाऊ बिराजदार, समाजकल्याण समितीचे सभापती उत्तम संभाजी माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, विभागीय शिक्षण उपसंचालक दिपक चवणे, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती कविता किशन गोरे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती शिवकन्या महेंद्र गोडभरले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मारूती सलगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्वागत समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य पुनम संतोष मुक्ता, रामलिंग शेषेराव शेरे, रुपाली प्रशांत गायकवाड, सईताई पृथ्वीराज गोरे, शितल रविकुमार चिलमे, रंजना भालचंद्र चाटे, मनिषा गंगासिह कदम आणि मुकेश भिवाजी भालेराव यांचा समावेश आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास कुकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शिक्षक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिकांनी, शिक्षकांनी, ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आणि संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला.3
- दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला?? निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!! तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!! महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?1
- नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.4
- रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी1
- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न1
- ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला1
- कंदलगावात घरफोडीसह जबरी चोरी; दोन ठिकाणी महिलांना मारहाण. सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला; दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी व जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आठ जणांच्या टोळक्याने परिसरात धुमाकूळ घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव गौरप्पा कोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून तेथील दोन वयोवृद्ध महिलांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कंदलगाव मधील विंचूर रोड लगत असलेल्या बुद्धाप्पा घोडके यांच्या वस्तीवरही चोरट्यांनी धाड टाकल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घोडके वस्ती या ठिकाणीही महिलांना मारहाण करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवण्यात आला असल्याचे घोडके कुटुंबीयांनी सांगितले . सदर घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन डी.वाय.एसपी गणेश शिंदे पाटील , पी.एस.आय अमितकुमार करपे आणि पी.एस.आय राज डांगे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पंचनामे, फिंगरप्रिंट सह श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकास पाचरण करत घटनास्थळी पाहणी करून तपास यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. दरम्यान, कंदलगाव परिसरात अलीकडील काळात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे तसेच शक्य असल्यास घर, वस्ती आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन मंद्रूप पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.1
- लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.1