निराधार महिलेला स्वावलंबनासाठी डाळ गिरणीची मदत ________ पाथरी / प्रतिनिधी : पाथरी तालुक्यातील लिंबा येथील निराधार विधवा द्रौपदी अर्जुन कुकडे यांना उदरनिर्वाहासाठी डाळ व पिठाची गिरणी भेट देऊन स्वावलंबनाचा आधार देण्यात आला. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी), परभणी संस्थेच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. अक्षय तृतीया आणि महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून ही मदत देण्यात आली. या उपक्रमामुळे कुकडे यांच्या कुटुंबाला उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध झाले असून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे.द्रौपदी कुकडे या पतीच्या निधनानंतर पूर्णपणे निराधार झाल्या आहेत. कुटुंबात मुलगा आणि मुलगी असून त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. शासकीय योजना किंवा पेन्शनचा लाभ न मिळाल्याने त्या रोजंदारी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळा लिंबा येथील शिक्षक आशीष शेरे व अंगद माडे यांनी एचएआरसी संस्थेकडे माहिती दिली. त्यानंतर संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांच्यासह बाबूलाल मोडाणी, मुनजा उवाळे, सत्यनारायण चांडक, चंद्रकांत राजुरे, संतोष वडधमवार, रितेश कालानी, अंगद माडे, डॉ. आशा चांडक, बसंती चांडक, आशीष शेरे, मलिकाजुन देवरे, वैशाली देवरे आदी मान्यवरउपस्थित होते. या उपक्रमासाठी अतुल जावळे, सत्यजित हर्डे, वेद महाजन, राजेश्वर वासलवार, डॉ. दिनेश भुतडा, डॉ. अनिता नावंदर आणि मुकुंद कुलथे यांनी आर्थिक सहकार्य केले.

- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- Post by Ramesh Mulgir1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- Post by माधव गायकवाड4
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Anil Rathod1
- Post by परळी वार्ता1
- Post by Ramesh Mulgir1