logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वारकरी वैदिक हिंदू धर्म सनातन परंपरा शिबिराचे अमानी येथे आयोजन वारकरी वैदिक हिंदू धर्म सनातन परंपरा शिबिराचे अमानी येथे आयोजन. मालेगाव (तालुका प्रतिनिधी):- तालुक्यातील ब्र. विश्राम महाराज वारकरी भक्ती पंथ गुरुकुल आयोजित वारकरी शिक्षण संस्थेद्वारा अमानी ता मालेगाव जिल्हा वाशिम येथे भव्य दिव्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन ९ मे ते २१ मे च्या दरम्यान ह भ प विजय महाराज गवळी शास्त्री यांनी केलेले आहे. परिसरातील सर्व सुजाण पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरामधल्या सुसंस्कारित वातावरणात योग्य संस्कार देण्याकरता पाठवावे. शिबिरामध्ये दररोज प्राणायाम नित्याचे श्लोक गीता पाठ संस्कृत सुभाषिते मृदंग वारकरी अभंग गवळणी काकडा ध्यानधारणा नीतिमूल्य आणि संस्कार आदी विषयांबद्दल थोरांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. शिबिरात महाराष्ट्रातील नामांकित वक्ते आणि गुणीजनांची उपस्थिती लाभणार आहे. वर्तमान काळात आपला मुलगा कमी वयात व्यसनाधीन होत आहे तरुण पिढी बिघडत चालली आहे त्यांना योग्य वयात संस्कार देणे ही काळाची गरज आहे. लहानपणी दिलेले संस्कार आयुष्यभर शिदोरी म्हणून तो जतन करून ठेवत असतो. अन्यथा या भयान युगामध्ये आपण रोज नव्याने बाल गुन्हेगारी कडे प्रवृत्त असलेल्या मुलांना जवळून बघतो. लालयेत् पंच वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् | प्राप्ते तु शोडषे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत् || सद्याच्या युगामध्ये मुलाच्या कोमल बुद्धीवर असलेला ताण त्याच्या कॉन्व्हेंट आणि शाळेतील पुस्तकांच्या भारामुळे त्रस्त झालेले त्याचे बालपण पालकांनी हिरावून घेतलेले बघायला आपल्याला मिळते. परंतु त्याला योग्य शिक्षण आपल्या मातीत राहून , आपल्या जमिनीशी निगडित धर्म संस्कार परंपरा सण उत्सव महामानव योद्धे यांच्या विषयी अनास्था वाढत चालली आहे. तो आपल्या परिवाराशी देशाशी धर्माशी प्रामाणिक राहावा यासाठी त्याला योग्य वयात या सर्वांची यथार्थ माहिती असने अत्यंत गरजेचे आहे. तोच प्रयत्न विश्राम महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शिबिरानंतर जून महिन्यामध्ये हेच शिक्षण व्यापक स्वरूपामध्ये मुलांना मिळत असते. यासाठी शालेय शिक्षणासह निवासी पद्धतीने मुलांची राहण्याची जेवणाची प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. तरी आपण आपल्या पाल्यांना या संस्थेमध्ये सुद्धा ठेवा जेणेकरून त्याला लहानपणीच आपल्या धर्माचे देशाचे संतांचे आई-वडिलांचे परिवाराचे महत्त्व कळेल. वारकरी संप्रदाय म्हणजे मुलांचे उज्वल भविष्य. या संस्थेतून अनेक मृदंग वादक कीर्तनकार गायक निर्माण झालेत जे आज स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या परिवाराला चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत आणि जनमानसात नावलौकिकही प्राप्त करून ते सुखी जीवन जगत आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर इथे शिक्षण घेऊन स्वतःचे गुरुकुल सुद्धा बांधले आहेत. तरी आपल्या पाल्याला जीवनाची योग्य दिशा मिळावी याकरता त्याचा प्रवेश आजच निश्चित करा. शिबीराचा समारोप २१मे ला होणार आहे. त्यानिमित्ताने भव्य कीर्तनाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. तरी भाविकांनी या कीर्तनाचा सुद्धा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन विजय महाराज गवळी शास्त्री यांनी केले आहे.

2 hrs ago
user_Nagesh Awachar
Nagesh Awachar
Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
2 hrs ago
7d58aadb-5c7a-4ce0-8bcc-8f2f9862e311

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Ahem Raza
    1
    Post by Ahem Raza
    user_Ahem Raza
    Ahem Raza
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • अकोला बाळापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा शेतशिवारात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊनच्या परिसरात वाढलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा मोठा हरभरा साठा साठवणूक केलेला असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. सध्या विदर्भात सूर्य कोपला असून तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उष्णता आणि वाळलेले गवत यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊनमध्ये नाफेडचा लाखो रुपयांचा हरभरा साठा असल्याने ही आग गोडाऊनपर्यंत पोहोचली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग गोडाऊनच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्याआधीच विझवली. यामुळे गोडाऊनमधील हरभरा साठा पूर्णपणे सुरक्षित राहिला असून मोठा अनर्थ टळला आहे. उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान पाहता, गोडाऊन परिसरातील कचरा व गवत वेळीच साफ करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही.
    1
    अकोला 
बाळापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा शेतशिवारात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊनच्या परिसरात वाढलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा मोठा हरभरा साठा साठवणूक केलेला असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
सध्या विदर्भात सूर्य कोपला असून तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उष्णता आणि वाळलेले गवत यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊनमध्ये नाफेडचा लाखो रुपयांचा हरभरा साठा असल्याने ही आग गोडाऊनपर्यंत पोहोचली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग गोडाऊनच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्याआधीच विझवली. यामुळे गोडाऊनमधील हरभरा साठा पूर्णपणे सुरक्षित राहिला असून मोठा अनर्थ टळला आहे.
उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान पाहता, गोडाऊन परिसरातील कचरा व गवत वेळीच साफ करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer Balapur, Akola•
    3 hrs ago
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    1
    हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.”
यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ​खामगाव : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासकीय इमारत परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ​आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपविभागीय महसूल व तहसील कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. "आमच्या मागण्या मान्य करा", "शासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ​​कर्मचारी संपावर गेल्याने तहसील आणि एसडीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दाखले, शासकीय योजनांची कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी आलेल्या सामान्य जनतेचे यामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत.​ ​यावेळी बोलताना तहसील कर्मचारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, "गेल्या १५ महिन्यांत आम्ही ७ वेळा लक्षवेधी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाला चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे, विधानसभेच्या पटलावर ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याही अंमलात आणण्यास शासनाला विसर पडला आहे.मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याने आता बेमुदत संपाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही." ​शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समन्वय समितीने घेतला आहे.
    1
    ​खामगाव : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासकीय इमारत परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ​आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपविभागीय महसूल व तहसील कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. "आमच्या मागण्या मान्य करा", "शासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ​​कर्मचारी संपावर गेल्याने तहसील आणि एसडीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दाखले, शासकीय योजनांची कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी आलेल्या सामान्य जनतेचे यामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत.​ ​यावेळी बोलताना तहसील कर्मचारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, "गेल्या १५ महिन्यांत आम्ही ७ वेळा लक्षवेधी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाला चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे, विधानसभेच्या पटलावर ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याही अंमलात आणण्यास शासनाला विसर पडला आहे.मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याने आता बेमुदत संपाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही." ​शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समन्वय समितीने घेतला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.