Shuru
Apke Nagar Ki App…
परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह अन्य विषय समितीच्या सभापतींची निवडणूक बिनविरोध
Mohsin ahmed khan
परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह अन्य विषय समितीच्या सभापतींची निवडणूक बिनविरोध
More news from Maharashtra and nearby areas
- मनपा वैद्यकीय व सहाय्य आरोग्य समिती सभापती पदी अबोली डॉ.अनिल कांबळे यांची निवड1
- Post by Mohsin ahmed khan1
- शेतकऱ्यांच्या घामाची लूट आता थांबली पाहिजे! मंठा तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रांमध्ये सुरू असलेला भ्रष्ट कारभार हा केवळ अन्याय नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टांचा अपमान आहे. कृषीप्रधान देश म्हणवणाऱ्या भारतात आजही शेतकरी आपल्या हक्कासाठी झगडतो आहे, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. शासनाने तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन उभारेल, याची नोंद घ्यावी. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या कष्टांवर कुनालाही संभाजी ब्रिगेड डाका घालू देणार नाही! शेतकऱ्यांची अवलाद आमची शेतकरी बापावर अन्याय होऊ देणार नाही. ✊✊ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩1
- मंठा तालुक्यातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली असून, तहसीलदार सौ. सुमन उद्धव मोरे यांच्या तात्काळ बदलीसाठी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे मागणी करण्यात आली आहे. विविध गंभीर आरोपांमुळे मंठा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. निवेदनानुसार, २०२० ते २०२२ या कालावधीत मंठा येथे कार्यरत असलेल्या मोरे यांची बदली यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच त्या पुन्हा जालना जिल्ह्यात परत येऊन मंठा तहसीलदार म्हणूनच रुजू झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर संशयाची छाया पसरली आहे. या ‘जलद पुनरागमनामागे’ नेमके कोणते सूत्र हलले, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, त्यांच्या सेवाकाळात वैजापूर, जाफ्राबाद आणि बदनापूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे तहसीलदार पदाचा वापर जनसेवेऐवजी आर्थिक फायद्यासाठी केल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. पूर्णा नदी पात्रातील वाळू घाटांबाबतही मोठे गौप्यस्फोट करण्यात आले असून, वाळू उपसा व वाहतुकीतून कोट्यवधींचे व्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या साखळीत प्रशासनातील काही घटकांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत असून, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीचे पद असताना, अशा आरोपांच्या भोवऱ्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाच्या विश्वासार्हतेला तडा देणारी असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. मुख्य मागण्या काय? तहसीलदारांची तात्काळ बदली पुन्हा त्या पदावर नियुक्ती न देणे संपूर्ण कार्यकाळाची चौकशी आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निवेदनाची अधिकृत पावती मिळाली नसली, तरी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास छत्रपती संभाजीनगर खंडपीठात न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.1
- Post by वैजनाथ पावडे1
- चार घेऊन जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट ! छत्रपती संभाजीनगरातील हरसुल-जटवडा रोडवर चारा घेऊन जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे नुकसान झाले आहे.1
- घरफोडी करणारी सराईत टोळीतील ३२ गुन्ह्यांतील कुख्यात मुख्य आरोपी जेरबंद. लाखो रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026. लातूर जिल्हा तसेच शेजारील धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोडी व चोरीच्या सलग घटना घडत होत्या. बंद घरांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी अत्यंत चलाख पद्धतीने गुन्हे करीत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, पोलीस अधीक्षक अमोल तांबे लातूर यांच्या सूचनांनुसार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या विशेष कारवाईत या गुन्हेगारी टोळीतील मुख्य व कुख्यात आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दि. २४ एप्रिल २०२६ रोजी उजनी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला. या कारवाईदरम्यान सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय २४ वर्षे, रा. सुंभा, ता. जि. धाराशिव) हा रेकॉर्डवरील व फरार आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने तत्परतेने त्यास पकडले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून – ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी व रोख रक्कम ₹५,०००/- असा एकूण ₹३५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांचा वापर करून रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. तपासाअंती आरोपीविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे 🔴 लातूर जिल्हा – २८ गुन्हे भादा, किल्लारी, कासारशिरसी, औसा, लातूर ग्रामीण व इतर पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे. 🔴 धाराशिव जिल्हा – ४ गुन्हे 🔴 सोलापूर जिल्हा – ५ गुन्हे 🔴 कर्नाटक राज्य (बिदर) – ३ गुन्हे या प्रमाणे एकूण ३२ गुन्हे दाखल असून पुढील तपासादरम्यान गुन्ह्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या इतर साथीदारासह टोळी तयार करून गुन्हे केल्याची कबुली दिली आहे असून त्याच्या टोळी मधील काही आरोपींना या अगोदरच अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस अमलदार माधव बिल्लापटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांचे पथकाने अत्यंत समन्वय व कौशल्य दाखवत ही कारवाई यशस्वी केली.2
- Post by Mohsin ahmed khan1