Shuru
Apke Nagar Ki App…
Raja Hindustani ratrada
Sudhakar Solanke
Raja Hindustani ratrada
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.2
- संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण शेगाव (प्रतिनिधी): संत नगरी शेगावमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाने तब्बल ४० ते ४१ अंश सेल्सियस गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडलेले दिसत असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारच्या वेळेत सूर्याची कडक किरणे अंगावर झोंबत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. बाजार मार्केट,चौक-चौकात, तसेच शेगांव -खामगांव रोड नेहमीची वर्दळ कमी झाली असून,हॉटेल,कापडं मार्केट,चौपाटी स्टॊल,व्यावसायिक यांना उकाड्याचा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संत नगरीत उन्हाचा कहर सुरूच; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता!1
- मंगरूळपीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात झाली साजरी1
- खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध मंडळांनी सादर केलेली लेझीम पथके आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, मध्यरात्री १२ वाजेपर्यंत चाललेली ही मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली. शोभायात्रेची सुरुवात करण्यापूर्वी सर्व मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय भीम'च्या जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली. या शोभायात्रेत शहर पोलीस स्टेशन आणि शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण ८ प्रमुख मंडळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सम्राट अशोक क्रीडा मंडळ (बाळापूर फैल), मिमशक्ती क्रीडा मंडळ (बाळापूर फैल), पंचशील क्रीडा मंडळ (बकरी बाजार, बाळापूर फैल), सम्राट क्रीडा मंडळ (हरी फैल), समता क्रीडा मंडळ (शंकर नगर), तथागत बहुउद्देशीय नवयुवक मंडळ (हिरा नगर) व अशोक क्रीडा मंडळ (दालफैल), सिद्धार्थ क्रीडा मंडळ (नवा फैल) सहभागी झाले होते.मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांनी लेझीमचा चित्तथरारक खेळ सादर केला. तसेच, अनेक मंडळांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे जिवंत देखावे सादर केले होते. रस्ते भीमभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आणि सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत चाललेली ही मिरवणूक कोणत्याही गालबोटाविना शांततेत पार पडली. प्रशासनाने आणि शहरवासीयांनी या शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक केले आहे.1
- मका विक्रीसाठी आणला, पण बाजाराबाहेरच थांबला शेतकऱ्यांचा संताप उसळला1
- दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.1
- Post by Amravati News Update1
- अमानी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1