logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जाफराबाद तालुक्यातील सावंगी परिसरात अज्ञात वन्य प्राण्याचा हल्ला; म्हशीच्या पिल्लाचा मृत्यू. दहा बारा दिवसापूर्वी बघण्यात आला होता बिबट्या,नागरिकांची माहिती वनविभागाकडून पंचनामा करून पाहणी... #रण_झुंजार_महाराष्ट्र न्युज नेटवर्क जाफराबाद तालुक्यातील सावंगी परिसरात अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला करून मधुकर भगवान आढावे यांच्या म्हशीच्या पिल्लाचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी परिसरातील शेतजमिनीच्या जवळ असलेल्या गोठ्यात हे म्हशीचे पिल्लू बांधलेले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात वन्य प्राण्याने त्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन मृत पिल्लाची पाहणी केली तसेच पंचनामा करण्यात आला. हा हल्ला नेमका कोणत्या वन्य प्राण्याने केला याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे. दरम्यान, याच परिसरात सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. त्यामुळे हा हल्ला बिबट्याने केला असावा अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सावंगी परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

11 hrs ago
user_विशाल पाटील वाकडे
विशाल पाटील वाकडे
Local News Reporter जाफ्राबाद, जालना, महाराष्ट्र•
11 hrs ago
6b1f83f4-5bfd-4823-bb92-7c61f771515d

जाफराबाद तालुक्यातील सावंगी परिसरात अज्ञात वन्य प्राण्याचा हल्ला; म्हशीच्या पिल्लाचा मृत्यू. दहा बारा दिवसापूर्वी बघण्यात आला होता बिबट्या,नागरिकांची माहिती वनविभागाकडून पंचनामा करून पाहणी... #रण_झुंजार_महाराष्ट्र न्युज नेटवर्क जाफराबाद तालुक्यातील सावंगी परिसरात अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला करून मधुकर भगवान आढावे यांच्या म्हशीच्या पिल्लाचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी परिसरातील शेतजमिनीच्या जवळ असलेल्या गोठ्यात हे म्हशीचे पिल्लू बांधलेले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात वन्य प्राण्याने त्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन मृत पिल्लाची पाहणी केली तसेच पंचनामा करण्यात आला. हा हल्ला नेमका कोणत्या वन्य प्राण्याने केला याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे. दरम्यान, याच परिसरात सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. त्यामुळे हा हल्ला बिबट्याने केला असावा अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सावंगी परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

More news from Jalna and nearby areas
  • #jalna#marathinews#
    1
    #jalna#marathinews#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    17 hrs ago
  • सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..
    1
    सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी  भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड...
या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली
    1
    आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • रिपोर्टर मुजीब शेख
    1
    रिपोर्टर मुजीब शेख
    user_Mujeeb Shaikh
    Mujeeb Shaikh
    Sillod, Aurangabad•
    14 hrs ago
  • कस्तुरबा गांधी मुलींच्या वस्तीग्रह जालना येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला
    1
    कस्तुरबा गांधी मुलींच्या वस्तीग्रह जालना येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    28 min ago
  • इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं
    1
    इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं
    user_Imran Siddiqui
    Imran Siddiqui
    Jalna, Maharashtra•
    3 hrs ago
  • भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.
    1
    भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.
    1
    स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.