Shuru
Apke Nagar Ki App…
पोलिसांनी अभिजीत दिपके यांचा माईक खेचल्याची घटना घडली आहे. या प्रकरणादरम्यान तिथे नेमकं काय घडलं, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
पोलिसांनी अभिजीत दिपके यांचा माईक खेचल्याची घटना घडली आहे. या प्रकरणादरम्यान तिथे नेमकं काय घडलं, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भावली धरण पूर्ण क्षमतेने भरून आता ओव्हरफ्लो झाले आहे. धरणात पाण्याचा साठा वाढल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित विसर्ग थेट नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. या पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचे पाहून प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मराठवाड्यात 'देवेंद्र जन्मोत्सव हरित महोत्सव' अंतर्गत हरित सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा अधिकृत शुभारंभ छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण मराठवाड्यात तब्बल ५ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे यातील १ लाख वृक्षांची लागवड ही एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. हा हरित सप्ताह संजय केणेकर यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत चालणारा हा उपक्रम म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची हरित भेट असेल, अशी माहिती संजय केणेकर यांनी दिली आहे.2
- मनोज जरांगे पाटील यांनी 'ज्यांनी निवडून दिले त्यांच्या पोरांना मारताय' असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.1
- नाशिक जिल्ह्यातील येवला येथील श्रीराम अंजनी स्वामी मंदिर परिसरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, नाशिक (ग्रामीण, उ.) तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी श्रमदान आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करत पर्यावरण संवर्धन व समाजसेवेचा संदेश दिला. या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांप्रती निष्ठा व आदर व्यक्त करण्यासाठी हातावर मुख्यमंत्र्यांचा टॅटू काढला. कार्यकर्त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब गाडेकर, जिल्हा चिटणीस नानासाहेब, माजी तालुकाध्यक्ष राजू परदेशी, भाजप व्यापारी महासंघाचे गणेश दोडे, युवा नेते दिनेश परदेशी, युवराज पाटोळे, मिलन पाटील, अरुण आव्हाड, विक्रम बोराडे, संतोष नागपुरे, दीपक टकले, बाळासाहेब सातारकर, प्रथमेश गाडेकर, दत्ता सानप, गणेश गायकवाड, सुभाष वाघ, अरुण आहेर, संजय कुक्कर, बंडू क्षिरसागर आणि सचिन साबळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील डोंगर गाव शिव येथील महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते.1
- दिल्लीतील आंदोलनादरम्यान अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आणि सर्वात भक्कम आधार देणाऱ्या श्री गुरुद्वारा बंगला साहिब आणि त्यांच्या प्रबंधक समितीची आज प्रत्यक्ष भेट घेऊन मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. संकटाच्या काळात जात, धर्म किंवा पंथ नव्हे, तर माणुसकीच सर्वात मोठी ठरते, ही भावना व्यक्त करत गुरुद्वाराने दाखवलेला आधार, सेवा आणि संवेदनशीलता हा मानवतेचा सर्वोच्च आदर्श असल्याचे नमूद करण्यात आले आहे. श्री गुरुद्वारा बंगला साहिब यांच्या या निस्वार्थ सेवेच्या परंपरेला मनःपूर्वक सलाम करत मानवतेसमोर नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.1
- खुलताबाद येथील जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे लेणी क्रमांक २९ मधील प्रसिद्ध 'सीता न्हाणी' धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. धबधब्याच्या प्रवाही जलधारेमुळे संपूर्ण परिसर अत्यंत नयनरम्य बनला असून येथे पर्यटकांना मनमोहक दृश्य अनुभवायला मिळत आहे. हिरवागार निसर्ग, दगडी लेणी आणि कोसळणारा धबधबा यामुळे वेरूळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. पावसाळ्यातील हे रमणीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- 'सेवा सप्ताह' निमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल येवला प्रखंड यांच्या वतीने अंगणगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरवासीयांना पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) गणेशमूर्ती स्थापन करण्याचे आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आग्रही आवाहन या प्रसंगी करण्यात आले. या उपक्रमाला येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मांडलिक, माजी नगरसेवक महेश काबरा, तसेच विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत विधी आयाम कृषी प्रमुख ॲड. शैलेश भावसार यांची प्रमुख उपस्थिती व सहकार्य लाभले. यावेळी प्रखंड सेवा विभाग प्रमुख साहिल बाबर, प्रखंड संयोजक गणेश काबरा यांच्यासह विहिंप व बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा, असा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला.1
- आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मारहाण झाल्यास किंवा त्यांना मारल्यास महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) एकाही नेत्याला फिरू दिले जाणार नाही, असा कडक आणि थेट इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात कोणतीही कारवाई खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट करत जरांगे यांनी भाजप नेत्यांना संपूर्ण राज्यात फिरण्यापासून रोखण्याचा इशारा दिला आहे.1