अविरत समन्वय व विचारविनिमय यातून अखेर जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दि.७ एप्रिल रोजी "अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे -अन्यथा होणारी नौकर भरती प्रक्रिया स्थगित करावी," या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय. नांदेड:_ नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजातील सामाजिक चळवळीतील नेते, विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या दि.१६/०३/२०२६,२९/०३ /२०२६ व शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे दि.३१/०३/२०२६ रोजी समाजाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार अविनाश जी घाटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन/विचारविनिमय बैठका घेऊन, अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा अधिक तीव्र व व्यापक होणे साठी त्यांची सुरूवात सामाजिक चळवळीचं केंद्र असलेल्या नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज व विविध सामाजिक संघटनांच्या वरील तारखेला झालेल्या चर्चेतून निर्धार करण्यात आला. याचाच भाग म्हणून सामाजिक न्यायासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेण्यात यावा,या मागणीसाठी दि.७ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या प्रचंड धरणे आंदोलनात नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
अविरत समन्वय व विचारविनिमय यातून अखेर जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दि.७ एप्रिल रोजी "अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे -अन्यथा होणारी नौकर भरती प्रक्रिया स्थगित करावी," या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय. नांदेड:_ नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजातील सामाजिक चळवळीतील नेते, विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या दि.१६/०३/२०२६,२९/०३ /२०२६ व शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे दि.३१/०३/२०२६ रोजी समाजाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार अविनाश जी घाटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन/विचारविनिमय बैठका घेऊन, अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा अधिक तीव्र व व्यापक होणे साठी त्यांची सुरूवात सामाजिक चळवळीचं केंद्र असलेल्या नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज व विविध सामाजिक संघटनांच्या वरील तारखेला झालेल्या चर्चेतून निर्धार करण्यात आला. याचाच भाग म्हणून सामाजिक न्यायासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेण्यात यावा,या मागणीसाठी दि.७ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या प्रचंड धरणे आंदोलनात नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या एक वर्षात जवळपास ११० मोबाईल हे लंपास झालेले आहे. लंपास झालेल्या ११० मोबाईलपैकी ६२ मोबाईल हस्तगत करण्यात घाटंजी पोलीसांना यश आले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल मुळ मालकांना परत करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे.1
- Post by Dhanjay surve Surve1
- भाजपा स्थापना दिवस व SIR मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक भाजप संघटनमंत्री संजय कौडगे यांचे मार्गदर्शन1
- रिसोड शहरामध्ये पावसांना दमदार हजेरी विजांच्या कडकडाट शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान! रिसोड शहर प्रतिनिधी रिसोड:-रिसोड शहरामध्ये विजांच्या कडकडात व संध्याकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गार पीट व काही ठिकाणी पाण्याने गदारोळ घातले व या पावसामुळे शेतकऱ्यांचे आठवनाथ नुकसान काही ठिकाणी झालेले आहे थोडा वारा सुद्धा त्यामध्ये होता त्यामुळे कांद्याचे ही नुकसान झालेले आहेत तरी शेतकऱ्यांना आर्थिक शासनाने मदत देऊन त्यांची हळदीचे ही सुद्धा फार प्रमाणात नुकसान झालेले काही शेतकऱ्यांच्या हार्दिक काढणे सुद्धा चालू आहे व काहींच्या काढलेल्या भिजल्या व काहींना वाळवण्यासाठी सुद्धा टाकलेले आहेत त्यामुळे त्यांना पाणीसुद्धा लागू शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले व यामध्ये शेतकरी हवालदिन झाला या अगोदर सोयाबीनच्या टायमात सुद्धा शेतकऱ्यांना एक मोठं संकट यावर्षी पाऊस जास्ती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हळदीचे तर नुकसान झाले परंतु सोयाबीन तूर हरभरा कांदा लसन असे शेतकऱ्याचे बरेचसे पीक उध्वस्त झाले आणि त्यामध्ये शेतकरी हा अडचणीत सापडला त्यामुळे आज शेतकऱ्यांना व यामध्ये बाजारपेठ मध्ये सुद्धा ग्राहक राहिलेले नाही कारण शेतकरी जर अडचणीत असला तर पूर्ण बाजारपेठ सुद्धा अडचणीत सापडते कारण लग्नसरायच्या टायमामध्ये सुद्धा ग्राहक राहिलेले नाही कारण शेतकरी अडचणीत असल्यामुळे यावर्षी 25 ते 26 साल शेतकऱ्यांना खूप अडचणीचे गेले आणि पुढचे सध्या चालू असलेल्या विजेचा कडकडाट व सुगारपिटीच्या भीतीने शेतकऱ्यांना ताडपत्री सुद्धा खरेदी करण्यासाठी त्यांची ऐपत राहिलेली नाही त्यामुळे या सारख्या परिस्थितीमध्ये झालेले नुकसान शेतकऱ्यांना कसे भरून निघेल यासाठी आर्थिक मदत देऊन त्यांना आपले नुकसान झालेले हे सुद्धा यामध्ये भारतीय होईल व त्यांना दिलासा मिळेल अशी शासनाने मदत करावी संध्याकाळच्या टायमाला एवढी काही गारपीट व विजाता कडकडात रिसोड तालुक्यात सर्वात मोठा विजेचा कडकडाट झालेला आहे व शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत मिळेल ती शासनाने द्यावी1
- मंठा शहरातील श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती नगर येथील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ नाना बोराडे यांनी महापूजा व महाआरती केली.1
- घन चित्रपटाची शूटिंग चालू आहे पिक्चर चालणारा आहे चांगला शुद्ध गाव गाव गावातली पिक्चर आहे3
- हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी तिसऱ्यांदा आंदोलन! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तर्फे पुन्हा उपोषण सुरुवात झाले असून, बुधवारी दुसरा दिवस उजाडला आहे. 📅 31 मार्चपासून बेमुदत आमरण उपोषण 👉 जीव गेला तरी बेहतर मात्र राजेंच्या पुतळ्यासाठी “जागा मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही” – माधव शिंदे नगरपंचायतीच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांचे लक्ष या आंदोलनाकडे #ShivajiMaharaj #Himayatnagar #Protest #ShivSmarak #Maharashtra BreakingNews PublicDemand MarathaPride1
- मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.1
- धामणगाव रेल्वे येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी धामणगांव रेल्वे : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त धामणगांव रेल्वे शहरात महावीर जयंती उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच जैन मंदिर परिसरात पूजा-अर्चा, अभिषेक, धार्मिक विधी तसेच प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर यांच्या प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती तसेच बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणाबाजी, भजन, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात येत महावीर भवनपर्यंत पोहोचली. भगवान महावीर यांनी दिलेल्या अहिंसा, सत्य, करुणा व मानवतेच्या संदेशाचे आचरण जीवनात करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वितरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण धामणगांव रेल्वे शहरात आनंद, उत्साह आणि धार्मिक एकतेचे वातावरण पाहायला मिळाले. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1