औषध व्यवसायात अधिक पारदर्शकता, कायदेशीरता आणि रुग्णहित जपण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या "सक्षम फार्मसी – सुरक्षित व्यवसाय" या राज्यस्तरीय जनजागृती अभियानाला बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील तब्बल १०५४ औषध पेढ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले असून, यात १०३ फार्मासिस्ट, केमिस्ट आणि प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीच्या भूमिकेला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हे अभियान राज्यभर सुरू केले होते. जगन्नाथ (आप्पासाहेब) शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि राज्य संघटनेचे सचिव अनिलभाऊ नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. प्रोजेक्ट लिडर गणेश बंगळे यांनी या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांनी जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवरील पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सभासद यांच्यात प्रभावी समन्वय साधत एकाच दिवशी संपूर्ण जिल्हाभर हे अभियान राबवण्याची कामगिरी केली. या अभियानादरम्यान औषध परवाने, फार्मासिस्टची उपस्थिती, Schedule H/H1 च्या नोंदी, कोल्ड चेन व्यवस्थापन, संगणकीकृत बिलिंग, मुदतवाढ झालेल्या औषधांचे व्यवस्थापन, आवश्यक रजिस्टर आणि विविध कायदेशीर बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनेक औषध पेढ्या अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ व कायद्याचे पालन करणाऱ्या आढळल्या, तर काही ठिकाणी सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. विशेषतः, बुलढाणा आणि खामगाव तालुक्यांत सर्वाधिक मार्गदर्शन भेटी झाल्या, तर नांदुरा तालुक्याने उत्कृष्ट नियोजन आणि सहकार्यामुळे विशेष कौतुक मिळवले. प्रखर उन्हाची पर्वा न करता दिवसभर जिल्हाभर फिरून सेवा देणाऱ्या सर्व तज्ज्ञ फार्मासिस्ट, प्राध्यापक आणि पथक सदस्यांच्या समर्पणामुळे हे अभियान यशस्वी ठरल्याचे गणेश बंगळे यांनी सांगितले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे बुलढाणा जिल्ह्याने राज्यात एक आदर्श निर्माण केला असून, या मॉडेलची राज्यभर दखल घेतली जात आहे. जिल्हाध्यक्ष गजानन शिंदे, जिल्हा सचिव रामचंद्र आयलानी, झोन संघटन सचिव राजेंद्र नहार, प्रेमकाका जैन, राजुभाऊ पाटील तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचेही सांगण्यात आले. "मार्गदर्शनातून अनुपालन, अनुपालनातून सुरक्षित व्यवसाय" या बोधवाक्याला साजेसा हा उपक्रम औषध व्यवसायासाठी एक नवा आदर्श ठरला असून, भविष्यातही अशाच व्यापक जनजागृती मोहिमा राबवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
औषध व्यवसायात अधिक पारदर्शकता, कायदेशीरता आणि रुग्णहित जपण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या "सक्षम फार्मसी – सुरक्षित व्यवसाय" या राज्यस्तरीय जनजागृती अभियानाला बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील तब्बल १०५४ औषध पेढ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले असून, यात १०३ फार्मासिस्ट, केमिस्ट आणि प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीच्या भूमिकेला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हे अभियान राज्यभर सुरू केले होते. जगन्नाथ (आप्पासाहेब) शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि राज्य संघटनेचे सचिव अनिलभाऊ नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. प्रोजेक्ट लिडर गणेश बंगळे यांनी या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांनी जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवरील पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सभासद यांच्यात प्रभावी समन्वय साधत एकाच दिवशी संपूर्ण जिल्हाभर हे अभियान राबवण्याची कामगिरी केली. या अभियानादरम्यान औषध परवाने, फार्मासिस्टची उपस्थिती, Schedule H/H1 च्या नोंदी, कोल्ड चेन व्यवस्थापन, संगणकीकृत बिलिंग, मुदतवाढ झालेल्या औषधांचे व्यवस्थापन, आवश्यक
रजिस्टर आणि विविध कायदेशीर बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनेक औषध पेढ्या अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ व कायद्याचे पालन करणाऱ्या आढळल्या, तर काही ठिकाणी सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. विशेषतः, बुलढाणा आणि खामगाव तालुक्यांत सर्वाधिक मार्गदर्शन भेटी झाल्या, तर नांदुरा तालुक्याने उत्कृष्ट नियोजन आणि सहकार्यामुळे विशेष कौतुक मिळवले. प्रखर उन्हाची पर्वा न करता दिवसभर जिल्हाभर फिरून सेवा देणाऱ्या सर्व तज्ज्ञ फार्मासिस्ट, प्राध्यापक आणि पथक सदस्यांच्या समर्पणामुळे हे अभियान यशस्वी ठरल्याचे गणेश बंगळे यांनी सांगितले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे बुलढाणा जिल्ह्याने राज्यात एक आदर्श निर्माण केला असून, या मॉडेलची राज्यभर दखल घेतली जात आहे. जिल्हाध्यक्ष गजानन शिंदे, जिल्हा सचिव रामचंद्र आयलानी, झोन संघटन सचिव राजेंद्र नहार, प्रेमकाका जैन, राजुभाऊ पाटील तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचेही सांगण्यात आले. "मार्गदर्शनातून अनुपालन, अनुपालनातून सुरक्षित व्यवसाय" या बोधवाक्याला साजेसा हा उपक्रम औषध व्यवसायासाठी एक नवा आदर्श ठरला असून, भविष्यातही अशाच व्यापक जनजागृती मोहिमा राबवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
- श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो भाविकांच्या जयघोषात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यात ‘सावली सेवा प्रकल्पाने’ साकारलेल्या जिवंत पालखी सोहळ्याच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालखी मार्गावर उभारण्यात आलेला हा आकर्षक आणि जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. अकोल्यातील प्रसिद्ध डेकोरेशन कलाकार जगदीश मारमपल्ली यांनी आपल्या कलाकौशल्यातून साकारलेल्या या अप्रतिम कलाकृतीने वारीचा अनुभव अक्षरशः जिवंत करून दाखवला. देखाव्याची भव्यता, बारकावे आणि वास्तवदर्शी मांडणी पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले. या अनोख्या देखाव्यासमोर हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सेल्फी, छायाचित्रे काढत वारीचा आनंद द्विगुणित केला. सोशल मीडियावरही या देखाव्याची मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्याचे कौतुक केले. यावेळी सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी श्रींच्या चरणी विशेष प्रार्थना अर्पण केली. राज्यातील शेतकरी, पशुपक्षी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, तसेच पावसाची प्रतीक्षा लवकर संपून भरपूर पाऊस व्हावा, असे साकडे त्यांनी श्री संत गजानन महाराजांना घातले. भक्ती, कला आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम घडवणारा सावली सेवा प्रकल्पाचा हा जिवंत पालखी सोहळा यंदाच्या वारीतील विशेष आकर्षण ठरला.1
- शेतकरी विकास मंचाने अकोला येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.1
- जळगाव (जामोद) तालुक्यात विविध घरकुल योजनांमधील हजारो लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते अद्यापही वितरित न झाल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या गंभीर प्रश्नावर शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. निवेदनाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्ता वसाहत योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांचे पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. पंचायत समिती जळगाव जामोद येथे नव्याने नियुक्त गटविकास अधिकाऱ्यांचे DSC अद्याप सक्रिय नसल्याने घरकुल निधी वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. प्रकाश भिसे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, गरिबांच्या हक्काचे घरकुल रोखले जात असेल, तर लाभार्थी शांत बसणार नाहीत. त्यांनी तात्काळ हप्ते वितरित करण्याची मागणी केली, अन्यथा लाभार्थ्यांसह तीव्र जनआक्रोश आंदोलन उभारले जाईल. निवेदन देतेवेळी अशपाक भाई देशमुख, राजेंद्रभाऊ परिहार, कार्तिक भाऊ राऊत, विलासभाऊ दातीर, भगवान भाऊ बघे आदी नागरिक उपस्थित होते. शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी “घरकुलाचा हक्क द्या… अन्यथा रस्त्यावर उतरू!” असा निर्धार व्यक्त केला.1
- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'योगातून आरोग्य आणि निरोगी जीवन' हा संदेश देत, आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), सुनगांव यांच्या वतीने स्थानिक सराई महादेव मंदिर परिसरात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात योगासनांनी झाली, जिथे योगा प्रशिक्षक सुरेश काळपांडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध योगासने आणि प्राणायामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. काळपांडे यांनी योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढण्यासोबतच मानसिक शांतता कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निमकर्डे यांनी 'योगा व आरोग्य' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे केवळ शारीरिक व्याधीच दूर होत नाहीत, तर मनावर नियंत्रण मिळवून तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. आरोग्य विभागाच्या पथकानेही ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शारदा पंडित, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, आरोग्य सेवक संदीप पोले, प्रतीक पाटील, आरोग्य सेविका सारिका इंगळे, आरती इंगळे आणि आशा सेविकांची विशेष उपस्थिती होती. सुनगांव गावातील मोठ्या संख्येने नागरिक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते, ज्यांनी सर्वांनी मिळून योगासने करत निरोगी राहण्याचा संकल्प केला.1
- पातुर येथे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे हिद्दू पैलवान यांनी बहुमताने विजय मिळवला आहे. त्यांनी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली.1
- सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी सध्या अनेक समस्यांनी त्रस्त असून त्यांच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी आज सिंदखेडराजा येथील तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. शेतकऱ्यांची विनाअट कर्जमुक्ती करावी आणि गेल्या हंगामातील अतिवृष्टीचे थकीत पॅकेज तात्काळ जाहीर करावे, या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मुद्द्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या निवेदनात मागणी करण्यात आली की, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे आर्थिक पॅकेज शेतकऱ्यांना त्वरित सुपूर्द केले जावे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली प्रचंड महागाई कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची थकीत रक्कम आणि प्रलंबित पीक विम्याची रक्कम थेट त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी. शेतीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या रासायनिक खते आणि बि-बियाणांचे वाढलेले भाव तातडीने कमी करावेत. 'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पेरणी लांबल्याने, शासनाने कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या वाणांची (बियाण्यांची) उपलब्धता करून द्यावी आणि गावनिहाय कृषी विभागामार्फत याची जनजागृती करावी. नवीन रेशनकार्ड आणि विभक्त रेशनकार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तात्काळ धान्य वाटप सुरू करण्यात यावे. तसेच, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे पेट्रोल, डिझेल व इतर आवश्यक इंधनाचे दर कमी करावेत. यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे/युवासेना) पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह संपर्क प्रमुख छगनदादा मेहेत्रे, उपजिल्हा प्रमुख बद्रीभाऊ बोडखे, तालुका प्रमुख आत्माराम शेळके, युवासेना तालुका प्रमुख सिद्धेश्वर आंधळे, शहर प्रमुख उल्हास भुसारे, तालुका संघटक म्हसाजी वाघ, युवासेना उपतालुका प्रमुख अविनाश मोगल, उपतालुका प्रमुख रंजित मरमट, शहर प्रमुख शिवाजीराव देशमुख आणि विभाग प्रमुख भागवत मुरकुट यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी बांधव निवेदन सादर करताना उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.1
- शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी मविआने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. हे आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या प्रमुख मागणीसाठी करण्यात आले.1
- अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरात अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, हॉटेलच्या स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, असून घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे.1