logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक शहर सायबर पोलिसांनी आंतरराज्यीय ऑनलाइन बेटिंग (सट्टा) आणि जुगाराचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली असून, यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार फेक कॉल सेंटर, ऑनलाइन बेटिंग आणि इतर सायबर गुन्ह्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान पोलिसांना देवळाली परिसरात ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गंगा निवास, कळवण रोड परिसरातील एका ठिकाणावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी चार लॅपटॉप, १८ मोबाईल, तीन राऊटर, ५४ बँक पासबुक, चार चेकबुक, २५ एटीएम कार्ड, २६ सिमकार्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदी असलेले साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला. छाप्यात अरबाज शब्बीर शेख, आसीफ जाफर हुसेन, अरबाज खान फरीद खान पठाण, पंकज नामदेव आहेर आणि सागर कांबळे हे आरोपी विविध वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे जमा करून सट्ट्याचे व्यवहार करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या पाचही संशयितांची चौकशी सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या बँकिंग आणि डिजिटल उपकरणांच्या आधारे आर्थिक व्यवहारांचा आणि रॅकेटच्या इतर दुव्यांचा तपास केला जात आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

14 hrs ago
user_Anil GUNJAL
Anil GUNJAL
नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
14 hrs ago

नाशिक शहर सायबर पोलिसांनी आंतरराज्यीय ऑनलाइन बेटिंग (सट्टा) आणि जुगाराचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली असून, यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार फेक कॉल सेंटर, ऑनलाइन बेटिंग आणि इतर सायबर गुन्ह्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान पोलिसांना देवळाली परिसरात ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गंगा निवास, कळवण रोड परिसरातील

एका ठिकाणावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी चार लॅपटॉप, १८ मोबाईल, तीन राऊटर, ५४ बँक पासबुक, चार चेकबुक, २५ एटीएम कार्ड, २६ सिमकार्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदी असलेले साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला. छाप्यात अरबाज शब्बीर शेख, आसीफ जाफर हुसेन, अरबाज खान फरीद खान पठाण, पंकज नामदेव आहेर आणि सागर कांबळे हे आरोपी विविध वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे

जमा करून सट्ट्याचे व्यवहार करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या पाचही संशयितांची चौकशी सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या बँकिंग आणि डिजिटल उपकरणांच्या आधारे आर्थिक व्यवहारांचा आणि रॅकेटच्या इतर दुव्यांचा तपास केला जात आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक शहर सायबर पोलिसांनी आंतरराज्यीय ऑनलाइन बेटिंग (सट्टा) आणि जुगाराचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली असून, यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार फेक कॉल सेंटर, ऑनलाइन बेटिंग आणि इतर सायबर गुन्ह्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान पोलिसांना देवळाली परिसरात ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गंगा निवास, कळवण रोड परिसरातील एका ठिकाणावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी चार लॅपटॉप, १८ मोबाईल, तीन राऊटर, ५४ बँक पासबुक, चार चेकबुक, २५ एटीएम कार्ड, २६ सिमकार्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदी असलेले साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला. छाप्यात अरबाज शब्बीर शेख, आसीफ जाफर हुसेन, अरबाज खान फरीद खान पठाण, पंकज नामदेव आहेर आणि सागर कांबळे हे आरोपी विविध वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे जमा करून सट्ट्याचे व्यवहार करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या पाचही संशयितांची चौकशी सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या बँकिंग आणि डिजिटल उपकरणांच्या आधारे आर्थिक व्यवहारांचा आणि रॅकेटच्या इतर दुव्यांचा तपास केला जात आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
    3
    नाशिक शहर सायबर पोलिसांनी आंतरराज्यीय ऑनलाइन बेटिंग (सट्टा) आणि जुगाराचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली असून, यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार फेक कॉल सेंटर, ऑनलाइन बेटिंग आणि इतर सायबर गुन्ह्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान पोलिसांना देवळाली परिसरात ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे गंगा निवास, कळवण रोड परिसरातील एका ठिकाणावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी चार लॅपटॉप, १८ मोबाईल, तीन राऊटर, ५४ बँक पासबुक, चार चेकबुक, २५ एटीएम कार्ड, २६ सिमकार्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदी असलेले साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला. छाप्यात अरबाज शब्बीर शेख, आसीफ जाफर हुसेन, अरबाज खान फरीद खान पठाण, पंकज नामदेव आहेर आणि सागर कांबळे हे आरोपी विविध वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे जमा करून सट्ट्याचे व्यवहार करत असल्याचे उघड झाले.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या पाचही संशयितांची चौकशी सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या बँकिंग आणि डिजिटल उपकरणांच्या आधारे आर्थिक व्यवहारांचा आणि रॅकेटच्या इतर दुव्यांचा तपास केला जात आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • महाराष्ट्रात वाढणाऱ्या डेटा सेंटर प्रकल्पांमुळे जलटंचाई, विजेची वाढती मागणी, हवामान बदल आणि ई-कचऱ्याचे संकट निर्माण होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण मुद्दा आमदार पंकज भुजबळ यांनी पावसाळी अधिवेशनात मांडला. त्यांनी सांगितले की, राज्यात सध्या २० डेटा सेंटर कार्यरत आहेत, तर आणखी ४४ डेटा सेंटर उभारले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे भविष्यात पाणी आणि वीज यांवरून संघर्ष होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या संभाव्य संकटावर तोडगा काढण्यासाठी आमदार भुजबळ यांनी शासनाकडे ‘ग्रीन डेटा सेंटर’ धोरण तातडीने लागू करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित कंपन्यांसाठी आवश्यक अटी व नियम बंधनकारक करून, ग्रीन डेटा सेंटर धोरण तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
    1
    महाराष्ट्रात वाढणाऱ्या डेटा सेंटर प्रकल्पांमुळे जलटंचाई, विजेची वाढती मागणी, हवामान बदल आणि ई-कचऱ्याचे संकट निर्माण होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण मुद्दा आमदार पंकज भुजबळ यांनी पावसाळी अधिवेशनात मांडला. त्यांनी सांगितले की, राज्यात सध्या २० डेटा सेंटर कार्यरत आहेत, तर आणखी ४४ डेटा सेंटर उभारले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे भविष्यात पाणी आणि वीज यांवरून संघर्ष होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

या संभाव्य संकटावर तोडगा काढण्यासाठी आमदार भुजबळ यांनी शासनाकडे ‘ग्रीन डेटा सेंटर’ धोरण तातडीने लागू करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित कंपन्यांसाठी आवश्यक अटी व नियम बंधनकारक करून, ग्रीन डेटा सेंटर धोरण तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नाशिक महापालिकेतर्फे मान्सून टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली आहे. या टास्क फोर्समध्ये लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते पंधरा लोकांची एक टीम काम करणार आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने मान्सून संबंधित कामे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी हा टास्क फोर्स महत्त्वाचा ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
    1
    नाशिक महापालिकेतर्फे मान्सून टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली आहे. या टास्क फोर्समध्ये लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते पंधरा लोकांची एक टीम काम करणार आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने मान्सून संबंधित कामे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी हा टास्क फोर्स महत्त्वाचा ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
    user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
    PRASIDDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Vishwas Diva
    1
    Post by Vishwas Diva
    user_Vishwas Diva
    Vishwas Diva
    वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • येवला तालुक्यातील पारेगाव येथील 'झाशीची राणी' महिला बचत गटाने शेती व्यवसायात एक नवा आदर्श घालून दिला आहे. गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या या गटाने यावर्षी 'शेतकरी उत्पादक गट' सुरू करून, सर्व महिलांनी एकत्रितपणे बियाणे आणि खते खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत अधिकृत अजित कृषी भांडार बी-बियाणे विक्रेते नितीन काबरा यांनी माहिती दिली की, त्यांनी या महिला बचत गटाला भाजीपाला आणि इतर बियाणे थेट होलसेल दरात उपलब्ध करून दिले. काबरा यांच्या मते, अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केल्यामुळे महिलांची फसवणूक टळली असून, त्यांना दर्जेदार व सक्षम बियाणे मिळाले आहे. या एकत्रित खरेदीमुळे गटाची मोठी आर्थिक बचत झाली आहे. तसेच, गटाच्या अध्यक्षांनी विश्वास व्यक्त केला की, एकत्रित खरेदी व सामूहिक शेतीमुळे त्यांचा मजुरीचा खर्चही वाचणार आहे. पारेगावच्या या महिलांच्या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे. दरम्यान, नितीन काबरा यांनी तालुक्यातील इतर गावांमध्येही महिलांनी असे बचत गट स्थापन करून एकत्रित खरेदीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे.
    3
    येवला तालुक्यातील पारेगाव येथील 'झाशीची राणी' महिला बचत गटाने शेती व्यवसायात एक नवा आदर्श घालून दिला आहे. गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या या गटाने यावर्षी 'शेतकरी उत्पादक गट' सुरू करून, सर्व महिलांनी एकत्रितपणे बियाणे आणि खते खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

याबाबत अधिकृत अजित कृषी भांडार बी-बियाणे विक्रेते नितीन काबरा यांनी माहिती दिली की, त्यांनी या महिला बचत गटाला भाजीपाला आणि इतर बियाणे थेट होलसेल दरात उपलब्ध करून दिले. काबरा यांच्या मते, अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केल्यामुळे महिलांची फसवणूक टळली असून, त्यांना दर्जेदार व सक्षम बियाणे मिळाले आहे. या एकत्रित खरेदीमुळे गटाची मोठी आर्थिक बचत झाली आहे. तसेच, गटाच्या अध्यक्षांनी विश्वास व्यक्त केला की, एकत्रित खरेदी व सामूहिक शेतीमुळे त्यांचा मजुरीचा खर्चही वाचणार आहे. पारेगावच्या या महिलांच्या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे.

दरम्यान, नितीन काबरा यांनी तालुक्यातील इतर गावांमध्येही महिलांनी असे बचत गट स्थापन करून एकत्रित खरेदीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • ठाकरे गटातून नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी एका पत्रकारास मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्याने संतप्त झालेल्या पाटलांनी ही धमकी दिली होती, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. या घटनेमुळे महाराष्ट्रातील पत्रकारांसह अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता संजय दिना पाटील यांना आपल्या कृतीची उपरती झाली असून त्यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागितली आहे. त्यांची माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये खासदार संजय दिना पाटील यांनी मराठी पत्रकारांची माफी मागितल्याचे स्पष्ट दिसत आहे.
    1
    ठाकरे गटातून नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी एका पत्रकारास मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्याने संतप्त झालेल्या पाटलांनी ही धमकी दिली होती, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. या घटनेमुळे महाराष्ट्रातील पत्रकारांसह अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

आता संजय दिना पाटील यांना आपल्या कृतीची उपरती झाली असून त्यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागितली आहे. त्यांची माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये खासदार संजय दिना पाटील यांनी मराठी पत्रकारांची माफी मागितल्याचे स्पष्ट दिसत आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रभावी उपाययोजना राबवत असून, भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कडक इशारा देण्यात आला आहे. अन्न नमुन्यांच्या चाचणी अहवालासाठी लागणारा कालावधी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यासाठी २२ खासगी प्रयोगशाळांशी करार करण्यात आला आहे. यामुळे चाचणी अहवाल मिळण्याचा कालावधी ३० ते ३५ दिवसांवर आणता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, अन्न सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक, नागपूर आणि रायगड येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच नवीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची भरती आणि रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.
    1
    महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रभावी उपाययोजना राबवत असून, भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कडक इशारा देण्यात आला आहे.

अन्न नमुन्यांच्या चाचणी अहवालासाठी लागणारा कालावधी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यासाठी २२ खासगी प्रयोगशाळांशी करार करण्यात आला आहे. यामुळे चाचणी अहवाल मिळण्याचा कालावधी ३० ते ३५ दिवसांवर आणता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, अन्न सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक, नागपूर आणि रायगड येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच नवीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची भरती आणि रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.