logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उमरी तालुक्यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

4 hrs ago
user_माधव गायकवाड
माधव गायकवाड
माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
4 hrs ago

उमरी तालुक्यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

More news from Maharashtra and nearby areas
  • एका नराधमाने आपल्या भाभीवर लग्नासाठी सातत्याने दबाव आणला. भाभीने त्याच्या मागणीला ठामपणे नकार दिल्यानंतर, त्या क्रूर व्यक्तीने सूड घेण्यासाठी तिच्या निष्पाप चिमुकल्या बाळाला जमिनीवर आपटून निर्घृणपणे ठार केले.
    1
    एका नराधमाने आपल्या भाभीवर लग्नासाठी सातत्याने दबाव आणला. भाभीने त्याच्या मागणीला ठामपणे नकार दिल्यानंतर, त्या क्रूर व्यक्तीने सूड घेण्यासाठी तिच्या निष्पाप चिमुकल्या बाळाला जमिनीवर आपटून निर्घृणपणे ठार केले.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    22 hrs ago
  • खासदार संजय जाधव यांनी ठामपणे सांगितले आहे की विरोधकांचा पराभव अटळ आहे. त्यांच्या खात्रीनुसार, डॉ. विवेक नावंदर हे निश्चितपणे विजयी होतील.
    1
    खासदार संजय जाधव यांनी ठामपणे सांगितले आहे की विरोधकांचा पराभव अटळ आहे. त्यांच्या खात्रीनुसार, डॉ. विवेक नावंदर हे निश्चितपणे विजयी होतील.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    7 hrs ago
  • परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी संजय जाधव, डॉ. राहुल पाटील, मेघना सकोर बोरडीकर, सईद खान, देवेंद्र फडणवीस आणि मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.
    1
    परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी संजय जाधव, डॉ. राहुल पाटील, मेघना सकोर बोरडीकर, सईद खान, देवेंद्र फडणवीस आणि मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.
    user_Abn news
    Abn news
    Media company Parbhani, Maharashtra•
    20 hrs ago
  • औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मेंढपाळ बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १ जून रोजी आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्य द्वारासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक करत अभिवादन करण्यात आले. धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ आणि मराठवाड्यातील मेंढपाळ समाज बांधवांनी फेटे बांधून आणि घोंगडी काठी घेऊन या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी सर्व मेंढपाळ बांधवांनी पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक केल्यानंतर गुलाब पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले. या कार्यक्रमाला धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदूभाऊ रवंदळे, भानुदास कुरवाडे, बाळू पिसाळ, किसन टेळे, समाधान शिंदे, नवनाथ हाडगे, समाधान करणे, रोहिदास कुराडे, लहानु शिंदे, अनिल येळे, लहू बूचकुले, विलास येळे, रामा येळे, सुधाकर सातपुते, गजानन करनर, गुलाबी येळे, पिंटू येळे, रामा पिसाळ यांच्यासह विदर्भ-मराठवाड्यातील मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव उपस्थित होते.
    1
    औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मेंढपाळ बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १ जून रोजी आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्य द्वारासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक करत अभिवादन करण्यात आले.

धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ आणि मराठवाड्यातील मेंढपाळ समाज बांधवांनी फेटे बांधून आणि घोंगडी काठी घेऊन या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी सर्व मेंढपाळ बांधवांनी पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक केल्यानंतर गुलाब पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले.

या कार्यक्रमाला धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदूभाऊ रवंदळे, भानुदास कुरवाडे, बाळू पिसाळ, किसन टेळे, समाधान शिंदे, नवनाथ हाडगे, समाधान करणे, रोहिदास कुराडे, लहानु शिंदे, अनिल येळे, लहू बूचकुले, विलास येळे, रामा येळे, सुधाकर सातपुते, गजानन करनर, गुलाबी येळे, पिंटू येळे, रामा पिसाळ यांच्यासह विदर्भ-मराठवाड्यातील मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव उपस्थित होते.
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • उदगीर शहरातील बौद्ध विहाराजवळ एका अनोळखी ऑटो चालकाने एका ३५ वर्षीय महिलेसमोर नग्न होऊन तिचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २ जून रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. पीडित महिला पायी आपल्या घराकडे जात असताना, एमएच २४ एटी २२३६ या क्रमांकाच्या एका अनोळखी ऑटोमधून चालकाने खाली उतरून तिच्यासमोर पूर्णपणे नग्न झाला. या कृत्यामुळे फिर्यादी महिलेला प्रचंड लज्जा वाटली. आरोपीने आपल्या शरीराचा अश्लील भाग महिलेला दाखवून, तिला गलिच्छ शिवीगाळ केली. तसेच, आरोपीने महिलेचा हात आणि साडी धरून तिचा विनयभंग केला. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात संबंधित ऑटो चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सर्फराज गोलंदाज करत आहेत.
    1
    उदगीर शहरातील बौद्ध विहाराजवळ एका अनोळखी ऑटो चालकाने एका ३५ वर्षीय महिलेसमोर नग्न होऊन तिचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २ जून रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. पीडित महिला पायी आपल्या घराकडे जात असताना, एमएच २४ एटी २२३६ या क्रमांकाच्या एका अनोळखी ऑटोमधून चालकाने खाली उतरून तिच्यासमोर पूर्णपणे नग्न झाला. या कृत्यामुळे फिर्यादी महिलेला प्रचंड लज्जा वाटली. आरोपीने आपल्या शरीराचा अश्लील भाग महिलेला दाखवून, तिला गलिच्छ शिवीगाळ केली. तसेच, आरोपीने महिलेचा हात आणि साडी धरून तिचा विनयभंग केला.

फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात संबंधित ऑटो चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सर्फराज गोलंदाज करत आहेत.
    user_संग्राम पवार विक्रांत न्युज
    संग्राम पवार विक्रांत न्युज
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान चाकूर तालुक्यातील वडवळ-जानवळ मार्गावर मोठी कारवाई करत ९ लाख १२ हजार ४५० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा एका कारसह जप्त केला आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २ लाख १२ हजार ४५० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरलेली ७ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इरटीगा कार (क्र. एमएच-२४ बीएक्स-१४८५) यांचा समावेश आहे. पोलिसांनी किशोर लक्ष्मण भदाडे (वय २४, रा. जानवळ, ता. चाकूर) या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान, भदाडेने हा माल वाहन मालक नरसिंग राजेंद्र करडीले (रा. जानवळ, ता. चाकूर) याचा असल्याची माहिती दिली. करडीले सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील वडवळ येथे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वडवळ ते जानवळ मार्गावरून एका पांढऱ्या इरटीगा कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक केला जात आहे. या माहितीची खातरजमा करून पथकाने वडवळ-जानवळ रस्त्यावर सापळा रचला आणि संशयित कार अडवून तपासणी केली असता, कारच्या आतील भागात आणि डिकीत पोत्यांमध्ये व बॉक्समध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोउपनि अमर केंद्रे, पोलीस अंमलदार मनोज खोसे, साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, आनंद हाल्लाळे, प्रवीण कोळसुरे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अवैध गुटखा, तंबाखू आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.
    2
    लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान चाकूर तालुक्यातील वडवळ-जानवळ मार्गावर मोठी कारवाई करत ९ लाख १२ हजार ४५० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा एका कारसह जप्त केला आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २ लाख १२ हजार ४५० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरलेली ७ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इरटीगा कार (क्र. एमएच-२४ बीएक्स-१४८५) यांचा समावेश आहे. पोलिसांनी किशोर लक्ष्मण भदाडे (वय २४, रा. जानवळ, ता. चाकूर) या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान, भदाडेने हा माल वाहन मालक नरसिंग राजेंद्र करडीले (रा. जानवळ, ता. चाकूर) याचा असल्याची माहिती दिली. करडीले सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील वडवळ येथे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वडवळ ते जानवळ मार्गावरून एका पांढऱ्या इरटीगा कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक केला जात आहे. या माहितीची खातरजमा करून पथकाने वडवळ-जानवळ रस्त्यावर सापळा रचला आणि संशयित कार अडवून तपासणी केली असता, कारच्या आतील भागात आणि डिकीत पोत्यांमध्ये व बॉक्समध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोउपनि अमर केंद्रे, पोलीस अंमलदार मनोज खोसे, साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, आनंद हाल्लाळे, प्रवीण कोळसुरे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अवैध गुटखा, तंबाखू आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
    1
    परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    20 hrs ago
  • पुणे जिल्ह्यात विषारी दारूमुळे बळी गेलेल्यांची वाढती संख्या पाहता लातूर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती आणि बेकायदेशीर मद्यविक्री हद्दपार करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी जिल्ह्यात एकाच वेळी अनेक कारवाया करत अवैध दारू व्यावसायिकांविरोधात सात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, देशी दारू तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गुळमिश्रित रसायन जप्त करून पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. अनेक आरोपींना ताब्यातही घेण्यात आले आहे. गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात गजानन सदाशिव हेरकर याला ३५ लिटर हातभट्टी दारूसह, तर अलीम सत्तार शेख याला ३८ लिटर हातभट्टी दारूसह रंगेहात पकडण्यात आले. कासार सिरसी पोलीस ठाणे हद्दीतील कोराळवाडी येथे लक्ष्मण तिपन्ना उमापुरे याच्या शेतातून सुमारे ५०० लिटर क्षमतेचे गावठी हातभट्टी दारूचे रसायन जप्त करण्यात आले. चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशनगर तांडा येथे नाथू रामभाऊ राठोड याच्या ताब्यातील सुमारे ३०० लिटर रसायन आणि शिलाबाई शिवाजी जाधव हिच्या शेतातून २५० लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये साठवलेले रसायन जप्त करण्यात आले. अहमदपूर उपविभागातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत इरफान मुन्नुसाब अत्तार याच्याविरुद्ध देशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी कारवाई करून "भिंगरी संत्रा" कंपनीच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या, तसेच गंगाराम रोहिदास माने याच्याविरुद्धही कारवाई करत देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जळकोट पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर देबडवार यांच्या शेताजवळ शेख सलीम महेबुब याला देशी दारूच्या २१ बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. त्याने कोणताही वैध परवाना नसताना दारूची चोरटी विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दारूचे व रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले असून, उर्वरित अवैध साठा नष्ट करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    3
    पुणे जिल्ह्यात विषारी दारूमुळे बळी गेलेल्यांची वाढती संख्या पाहता लातूर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती आणि बेकायदेशीर मद्यविक्री हद्दपार करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी जिल्ह्यात एकाच वेळी अनेक कारवाया करत अवैध दारू व्यावसायिकांविरोधात सात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, देशी दारू तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गुळमिश्रित रसायन जप्त करून पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. अनेक आरोपींना ताब्यातही घेण्यात आले आहे.

गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात गजानन सदाशिव हेरकर याला ३५ लिटर हातभट्टी दारूसह, तर अलीम सत्तार शेख याला ३८ लिटर हातभट्टी दारूसह रंगेहात पकडण्यात आले. कासार सिरसी पोलीस ठाणे हद्दीतील कोराळवाडी येथे लक्ष्मण तिपन्ना उमापुरे याच्या शेतातून सुमारे ५०० लिटर क्षमतेचे गावठी हातभट्टी दारूचे रसायन जप्त करण्यात आले. चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशनगर तांडा येथे नाथू रामभाऊ राठोड याच्या ताब्यातील सुमारे ३०० लिटर रसायन आणि शिलाबाई शिवाजी जाधव हिच्या शेतातून २५० लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये साठवलेले रसायन जप्त करण्यात आले.

अहमदपूर उपविभागातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत इरफान मुन्नुसाब अत्तार याच्याविरुद्ध देशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी कारवाई करून "भिंगरी संत्रा" कंपनीच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या, तसेच गंगाराम रोहिदास माने याच्याविरुद्धही कारवाई करत देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जळकोट पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर देबडवार यांच्या शेताजवळ शेख सलीम महेबुब याला देशी दारूच्या २१ बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. त्याने कोणताही वैध परवाना नसताना दारूची चोरटी विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दारूचे व रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले असून, उर्वरित अवैध साठा नष्ट करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Gajanan babusing ade
    1
    Post by Gajanan babusing ade
    user_Gajanan babusing ade
    Gajanan babusing ade
    पुसद, यवतमाळ, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.