पुणे जिल्ह्यात विषारी दारूमुळे बळी गेलेल्यांची वाढती संख्या पाहता लातूर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती आणि बेकायदेशीर मद्यविक्री हद्दपार करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी जिल्ह्यात एकाच वेळी अनेक कारवाया करत अवैध दारू व्यावसायिकांविरोधात सात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, देशी दारू तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गुळमिश्रित रसायन जप्त करून पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. अनेक आरोपींना ताब्यातही घेण्यात आले आहे. गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात गजानन सदाशिव हेरकर याला ३५ लिटर हातभट्टी दारूसह, तर अलीम सत्तार शेख याला ३८ लिटर हातभट्टी दारूसह रंगेहात पकडण्यात आले. कासार सिरसी पोलीस ठाणे हद्दीतील कोराळवाडी येथे लक्ष्मण तिपन्ना उमापुरे याच्या शेतातून सुमारे ५०० लिटर क्षमतेचे गावठी हातभट्टी दारूचे रसायन जप्त करण्यात आले. चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशनगर तांडा येथे नाथू रामभाऊ राठोड याच्या ताब्यातील सुमारे ३०० लिटर रसायन आणि शिलाबाई शिवाजी जाधव हिच्या शेतातून २५० लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये साठवलेले रसायन जप्त करण्यात आले. अहमदपूर उपविभागातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत इरफान मुन्नुसाब अत्तार याच्याविरुद्ध देशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी कारवाई करून "भिंगरी संत्रा" कंपनीच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या, तसेच गंगाराम रोहिदास माने याच्याविरुद्धही कारवाई करत देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जळकोट पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर देबडवार यांच्या शेताजवळ शेख सलीम महेबुब याला देशी दारूच्या २१ बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. त्याने कोणताही वैध परवाना नसताना दारूची चोरटी विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दारूचे व रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले असून, उर्वरित अवैध साठा नष्ट करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यात विषारी दारूमुळे बळी गेलेल्यांची वाढती संख्या पाहता लातूर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती आणि बेकायदेशीर मद्यविक्री हद्दपार करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी जिल्ह्यात एकाच वेळी अनेक कारवाया करत अवैध दारू व्यावसायिकांविरोधात सात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, देशी दारू तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गुळमिश्रित रसायन जप्त करून पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. अनेक आरोपींना ताब्यातही घेण्यात आले आहे. गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात गजानन
सदाशिव हेरकर याला ३५ लिटर हातभट्टी दारूसह, तर अलीम सत्तार शेख याला ३८ लिटर हातभट्टी दारूसह रंगेहात पकडण्यात आले. कासार सिरसी पोलीस ठाणे हद्दीतील कोराळवाडी येथे लक्ष्मण तिपन्ना उमापुरे याच्या शेतातून सुमारे ५०० लिटर क्षमतेचे गावठी हातभट्टी दारूचे रसायन जप्त करण्यात आले. चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशनगर तांडा येथे नाथू रामभाऊ राठोड याच्या ताब्यातील सुमारे ३०० लिटर रसायन आणि शिलाबाई शिवाजी जाधव हिच्या शेतातून २५० लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये साठवलेले रसायन जप्त करण्यात आले. अहमदपूर उपविभागातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत इरफान मुन्नुसाब अत्तार याच्याविरुद्ध देशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी कारवाई करून "भिंगरी संत्रा" कंपनीच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या, तसेच गंगाराम रोहिदास माने याच्याविरुद्धही कारवाई करत देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात
आल्या. जळकोट पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर देबडवार यांच्या शेताजवळ शेख सलीम महेबुब याला देशी दारूच्या २१ बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. त्याने कोणताही वैध परवाना नसताना दारूची चोरटी विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दारूचे व रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले असून, उर्वरित अवैध साठा नष्ट करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- उदगीर शहरातील बौद्ध विहाराजवळ एका अनोळखी ऑटो चालकाने एका ३५ वर्षीय महिलेसमोर नग्न होऊन तिचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २ जून रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. पीडित महिला पायी आपल्या घराकडे जात असताना, एमएच २४ एटी २२३६ या क्रमांकाच्या एका अनोळखी ऑटोमधून चालकाने खाली उतरून तिच्यासमोर पूर्णपणे नग्न झाला. या कृत्यामुळे फिर्यादी महिलेला प्रचंड लज्जा वाटली. आरोपीने आपल्या शरीराचा अश्लील भाग महिलेला दाखवून, तिला गलिच्छ शिवीगाळ केली. तसेच, आरोपीने महिलेचा हात आणि साडी धरून तिचा विनयभंग केला. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात संबंधित ऑटो चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सर्फराज गोलंदाज करत आहेत.1
- लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान चाकूर तालुक्यातील वडवळ-जानवळ मार्गावर मोठी कारवाई करत ९ लाख १२ हजार ४५० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा एका कारसह जप्त केला आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २ लाख १२ हजार ४५० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरलेली ७ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इरटीगा कार (क्र. एमएच-२४ बीएक्स-१४८५) यांचा समावेश आहे. पोलिसांनी किशोर लक्ष्मण भदाडे (वय २४, रा. जानवळ, ता. चाकूर) या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान, भदाडेने हा माल वाहन मालक नरसिंग राजेंद्र करडीले (रा. जानवळ, ता. चाकूर) याचा असल्याची माहिती दिली. करडीले सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील वडवळ येथे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वडवळ ते जानवळ मार्गावरून एका पांढऱ्या इरटीगा कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक केला जात आहे. या माहितीची खातरजमा करून पथकाने वडवळ-जानवळ रस्त्यावर सापळा रचला आणि संशयित कार अडवून तपासणी केली असता, कारच्या आतील भागात आणि डिकीत पोत्यांमध्ये व बॉक्समध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोउपनि अमर केंद्रे, पोलीस अंमलदार मनोज खोसे, साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, आनंद हाल्लाळे, प्रवीण कोळसुरे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अवैध गुटखा, तंबाखू आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.2
- लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. या इंधनटंचाईमुळे तालुक्यातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.1
- देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर ग्रामपंचायतीतील कथित कोट्यवधी रुपयांच्या निधी गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे, कारण या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ग्रामस्थांनी २०१५ ते २०२६ या कालावधीत खर्च झालेल्या ४ कोटी ४७ लाख रुपयांच्या निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘जागरूक होऊ’ समूहाने पुराव्यांसह तक्रार दाखल करूनही, या प्रकरणाच्या चौकशीला जाणूनबुजून विलंब होत असल्याचा आरोप केला आहे. ग्रामपंचायतीवर १ कोटी ३७ लाख रुपयांचे लेखाआक्षेप प्रलंबित असल्याचे समोर आले आहे, तसेच ५० लाख रुपयांच्या खर्चाची आवश्यक कागदपत्रेही उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे, जुने लेखापरीक्षण अहवाल आणि इतिवृत्तही उपलब्ध नसल्याने या संपूर्ण प्रकरणातील संशय अधिक बळावला आहे. या पार्श्वभूमीवर, शहापूर ग्रामपंचायतीतील या कथित निधी गैरव्यवहार प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.1
- लातूर जिल्ह्यातील हॉटेल गंधर्वने अधिक मासानिमित्त खास 'जावई आमरस थाळी' सादर केली आहे.1
- लातूर जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या ताडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कैलास मारुती कांबळे यांनी शिक्षण क्षेत्रात तब्बल ३० वर्षांची उल्लेखनीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारली. या गौरवपूर्ण प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवलिंग पटवे साहेब उपस्थित होते, तर अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, सहसंचालक तथा विभागीय अध्यक्ष नागपूर श्री. कल्याणराव सोनवणे निवृत्त गटशिक्षणाधिकारी आणि श्री. मदने साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मनोगतातून कैलास कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख करत, त्यांना एक आदर्श शिक्षक, कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे मार्गदर्शक म्हणून गौरवले. त्यांच्या सेवाकाळात शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही विशेष चालना मिळाल्याचे वक्त्यांनी सांगितले. या सोहळ्यात सामाजिक परिवर्तन संस्था, नळदुर्गचे मारुती बनसोडे यांनी कैलास कांबळे यांच्याशी असलेल्या ४२ वर्षांच्या जिव्हाळ्याच्या मैत्रीबद्दल मनोगत व्यक्त केले. मैत्री म्हणजे केवळ ओळख नसून विश्वास, आपुलकी आणि परस्पर सहकार्याची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचे वर्गमित्र पितांबर गवळी, मारुती बनसोडे, कुमार मोरे, खंडेराव देडे, हरीलाल लोंढे तसेच सहशिक्षक राम बनसोडे यांनीही उपस्थित राहून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला, ज्यामुळे वातावरण भावनिक झाले. आपल्या सेवानिवृत्तीच्या भाषणात कैलास कांबळे यांनी सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि मित्रपरिवाराचे आभार मानले, तसेच शिक्षण आणि संस्कार देणे हीच शिक्षकांची खरी जबाबदारी असल्याचे सांगितले. आगलावे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. अखेरीस, उपस्थितांनी मुख्याध्यापक कांबळे यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.1
- पुणे जिल्ह्यात विषारी दारूमुळे बळी गेलेल्यांची वाढती संख्या पाहता लातूर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती आणि बेकायदेशीर मद्यविक्री हद्दपार करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी जिल्ह्यात एकाच वेळी अनेक कारवाया करत अवैध दारू व्यावसायिकांविरोधात सात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, देशी दारू तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गुळमिश्रित रसायन जप्त करून पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. अनेक आरोपींना ताब्यातही घेण्यात आले आहे. गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात गजानन सदाशिव हेरकर याला ३५ लिटर हातभट्टी दारूसह, तर अलीम सत्तार शेख याला ३८ लिटर हातभट्टी दारूसह रंगेहात पकडण्यात आले. कासार सिरसी पोलीस ठाणे हद्दीतील कोराळवाडी येथे लक्ष्मण तिपन्ना उमापुरे याच्या शेतातून सुमारे ५०० लिटर क्षमतेचे गावठी हातभट्टी दारूचे रसायन जप्त करण्यात आले. चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशनगर तांडा येथे नाथू रामभाऊ राठोड याच्या ताब्यातील सुमारे ३०० लिटर रसायन आणि शिलाबाई शिवाजी जाधव हिच्या शेतातून २५० लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये साठवलेले रसायन जप्त करण्यात आले. अहमदपूर उपविभागातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत इरफान मुन्नुसाब अत्तार याच्याविरुद्ध देशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी कारवाई करून "भिंगरी संत्रा" कंपनीच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या, तसेच गंगाराम रोहिदास माने याच्याविरुद्धही कारवाई करत देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जळकोट पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर देबडवार यांच्या शेताजवळ शेख सलीम महेबुब याला देशी दारूच्या २१ बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. त्याने कोणताही वैध परवाना नसताना दारूची चोरटी विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दारूचे व रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले असून, उर्वरित अवैध साठा नष्ट करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.3
- लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती आणि बेकायदेशीर मद्यविक्री पूर्णपणे थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी दोन दिवसांत जिल्ह्यात एकाच वेळी कारवाया करत अवैध दारू व्यावसायिकांविरोधात सात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत हातभट्टी दारू, देशी दारू आणि हजारो लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट करण्यात आले असून, अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान, लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात गजानन सदाशिव हेरकर (रा. नळेगाव, ता. चाकूर) याला ३५ लिटर हातभट्टी दारूसह, तर अलीम सत्तार शेख (रा. झिन्नत सोसायटी, नांदेड रोड, लातूर) याला ३८ लिटर हातभट्टी दारूसह रंगेहात पकडण्यात आले. कासार सिरसी पोलीस ठाणे हद्दीतील कोराळवाडी येथे लक्ष्मण तिपन्ना उमापुरे याच्या शेतातून सुमारे ५०० लिटर क्षमतेचे गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे गुळमिश्रित रसायन जप्त करण्यात आले. चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशनगर तांडा येथे नाथू रामभाऊ राठोड याच्या ताब्यातील सुमारे ३०० लिटर रसायन आणि शिलाबाई शिवाजी जाधव हिच्या शेतातून २५० लिटर क्षमतेच्या बॅरलमधील रसायन जप्त करण्यात आले. याव्यतिरिक्त, अहमदपूर उपविभागातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत इरफान मुन्नुसाब अत्तार (रा. शेळगाव, ता. चाकूर) आणि गंगाराम रोहिदास माने (रा. वडगाव एक्की, ता. चाकूर) यांच्याविरुद्ध देशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी प्रत्येकी ४८ बाटल्या 'भिंगरी संत्रा' देशी दारूसह कारवाई करण्यात आली. जळकोट पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर देबडवार यांच्या शेताजवळ शेख सलीम महेबुब (रा. नवी आबादी, जळकोट) याला २१ बाटल्या देशी दारूसह ताब्यात घेण्यात आले; तपासात तो कोणताही वैध परवाना नसताना चोरटी विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या दारूचे व रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले असून, उर्वरित अवैध साठा नष्ट करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले की, लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.2