राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ नाशिक,महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या "राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना" अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत १५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय क्र. वकृमा-४३२१/(१५)/प्र.क्र.१४५/सां.का.४, दिनांक १६ मार्च, २०२४ नुसार कला व साहित्य क्षेत्राशी संपूर्णपणे निगडित असून त्यावरच उपजीविका अवलंबून असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा रुपये ५ हजार मानधन देण्यात येते. योजनेसाठी पात्रता अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असावे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता असून त्यांच्यासाठी किमान वय ४० वर्षे आहे. कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे योगदान असावे. साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातलेली असावी. वयोवृद्ध विधवा, परित्यक्ता व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाईल. कलाकाराच्या कुटुंबाचे सर्व मार्गांद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न रु. ६० हजार पेक्षा जास्त नसावे. उपजीविका केवळ कलेवर अवलंबून असलेले किंवा पूर्वी कलेवर अवलंबून होते, मात्र सध्या इतर कोणतेही उत्पन्न नसलेले कलाकार पात्र राहतील. केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेत नसलेले कलाकार पात्र असतील. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. यापूर्वी या योजनेसाठी १ जुलै ते ३१ जुलै, २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता १५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी प्रशांत पवार यांनी केले आहे.

- येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.1
- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी राहुरी फॅक्टरी, प्रतिनिधी : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देवळाली प्रवरा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पेन देण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे, शहराध्यक्ष शरदभाऊ लोखंडे, उपशहराध्यक्ष सुनीलभाऊ रोकडे, सेक्रेटरी सागरभाऊ उल्हारे तसेच सदस्य करण लोंढे, संदीप तोडमल, प्रफुल शिंदे उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब लोखंडे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे यांच्या वतीने गरजू दोन विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश भेट देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, सामाजिक समता आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.1
- मोकाट जनावरांनी ग्रामीण भागांसह शहरातही मांडलाय उच्छाद. मुरबाड तालुक्यात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ग्रामीण भागात शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान करीत आहेत या वर्षी अतिवृष्टीमुळे भाता पिकांची रोपे पाण्यात बुडाल्याने महागडे बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करणे भाग पडले, सध्या पावसाने साथ दिल्याने भात लावणीच्या कामाला वेग आला आहे, मात्र रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे लावणी केलेल्या भाताचा फडशा पाडीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक नुकसानीला सामोरं जावे लागत असतानाच कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मोकाट जनावरे थव्याने ऊभी रहात असल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागा बरोबर मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खालील भागात मोकाट जनावरांनी कब्जा केला असुन महसूल कार्यालयात कामा निमित्त येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा ताप सहन करावा लागत आहे, संबंधित भटक्या व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी शेतकरी करीत असुन मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खाली ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची ही मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे .1
- प्रीति और जैस्मिन बॉक्सिंग चैंपियन, सोमन ने पैरा शॉटपुट जीता; अब तक 30 मेडल प्रीति पवार (बॉक्सिंग): महिलाओं के 54 किग्रा भारवर्ग के फाइनल मुकाबले में कनाडा की स्कारलेट सवाना डेलगाडो को एकतरफा 5-0 से हराकर स्वर्ण पदक अपने नाम किया।जैस्मिन लंबोरिया (बॉक्सिंग): महिलाओं के 57 किग्रा वर्ग के बेहद कड़े फाइनल में उत्तरी आयरलैंड की मौजूदा चैंपियन माइकेला वॉल्श को 5-0 से मात देकर भारत की झोली में दूसरा बॉक्सिंग गोल्ड डाला।सोमन राणा (पैरा शॉटपुट): पुरुषों की F57 गोला फेंक (Shot Put) स्पर्धा में 13.40 मीटर के बेहतरीन थ्रो के साथ स्वर्ण पदक जीता। इसी स्पर्धा में भारत के शुभम जुयाल ने 13.28 मीटर थ्रो कर रजत (Silver) पदक हासिल किया ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा1
- माळशेज घाटातील रस्ता पावसामुळे खचल्याने माळशेज घाट बंद असल्याने स्थानिक व्यवसायावर मोठा परिणाम! घाट कधी सुरू होणार? मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध माळशेज घाट परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ता खचला गेल्याने मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ थांबली असून, पावसाळ्यात पर्यटकांनी गजबजणाऱ्या पर्यटनस्थळांवर सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार वर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच घाट कधी सुरू होणार याकडे स्थानिक रोजगारांचे लक्ष लागले आहे. पावसाळा सुरू होताच माळशेज घाट, नाणेघाट, कासाराचा नाळा, दुर्गांचा नाळा, थितबी, काळू वॉटरफॉल तसेच परिसरातील विविध धबधबे आणि नैसर्गिक झरे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, माळशेज घाटातील रस्ता पावसामुळे वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना या भागात जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. रस्ता बंद असल्याने पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी पर्यटनावर अवलंबून असलेल्या चहा स्टॉल, वडापाव दुकाने, भजी-पक्वान्नांचे स्टॉल, नाश्त्याच्या टपऱ्या आणि इतर छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीतून या छोट्या व्यावसायिकांना वर्षभराच्या उत्पन्नातील महत्त्वाचा हिस्सा मिळतो. मात्र, सध्या रस्ता बंद असल्याने पर्यटकच नसल्यामुळे अनेक दुकाने व टपऱ्या बंद अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नथू पारधी यांनी दिली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता बंद ठेवण्याच्या निर्णयाचे स्थानिकांकडून समर्थन केले जात असले, तरी रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी आणि वाहतूक सुरक्षितपणे पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे. माळशेज घाटातील रस्ता वाहून गेल्याने पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पर्यटनस्थळांवर शांतता पसरली असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक पर्यटन व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे.1