logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मंगरूळपीर तहसील कार्यालयात अन्न पुरवठा विभागाची दादागिरी; नागरिक संतप्त मंगरूळपीर तहसील कार्यालयात अन्न पुरवठा विभागाची दादागिरी; नागरिक संतप्त प्रतिनिधी वाशिम – गणेश पाटील बोथे मंगरूळपीर येथील तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाचा मनमानी कारभार चांगलाच चर्चेत आला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या दादागिरीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अक्षरशः त्रास सहन करावा लागत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. शिधापत्रिका, धान्य वितरण तसेच इतर शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये कामे विनाकारण रखडवली जात असून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित अन्न पुरवठा अधिकारी हे नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी उशिरा म्हणजेच सुमारे १२ वाजता कार्यालयात येणे आणि सायंकाळी ४ वाजताच निघून जाणे, अशा कार्यपद्धतीमुळे कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांची गैरसोय वाढत आहे. गरजू लाभार्थ्यांना वेळेवर धान्य व सुविधा न मिळाल्याने त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रकरणांमध्ये अर्ज प्रलंबित ठेवून नागरिकांना जाणीवपूर्वक अडचणीत टाकले जात असल्याचेही समोर आले आहे. या संदर्भात नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

2 hrs ago
user_Ganesh Bothe
Ganesh Bothe
मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
2 hrs ago
ab7aa298-1ad9-449c-8614-0de17c069507

मंगरूळपीर तहसील कार्यालयात अन्न पुरवठा विभागाची दादागिरी; नागरिक संतप्त मंगरूळपीर तहसील कार्यालयात अन्न पुरवठा विभागाची दादागिरी; नागरिक संतप्त प्रतिनिधी वाशिम – गणेश पाटील बोथे मंगरूळपीर येथील तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाचा मनमानी कारभार चांगलाच चर्चेत आला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या दादागिरीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अक्षरशः त्रास सहन करावा लागत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. शिधापत्रिका, धान्य वितरण तसेच इतर शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये कामे

5ec730d5-0f9f-4bc3-8164-0af1c669e206

विनाकारण रखडवली जात असून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित अन्न पुरवठा अधिकारी हे नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी उशिरा म्हणजेच सुमारे १२ वाजता कार्यालयात येणे आणि सायंकाळी ४ वाजताच निघून जाणे, अशा कार्यपद्धतीमुळे कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांची गैरसोय वाढत आहे. गरजू लाभार्थ्यांना वेळेवर धान्य व सुविधा न मिळाल्याने

3bca3f99-a49b-43c0-b159-df553ddfd501

त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रकरणांमध्ये अर्ज प्रलंबित ठेवून नागरिकांना जाणीवपूर्वक अडचणीत टाकले जात असल्याचेही समोर आले आहे. या संदर्भात नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Ahem Raza
    1
    Post by Ahem Raza
    user_Ahem Raza
    Ahem Raza
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    1
    हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.”
यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • अकोला बाळापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा शेतशिवारात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊनच्या परिसरात वाढलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा मोठा हरभरा साठा साठवणूक केलेला असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. सध्या विदर्भात सूर्य कोपला असून तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उष्णता आणि वाळलेले गवत यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊनमध्ये नाफेडचा लाखो रुपयांचा हरभरा साठा असल्याने ही आग गोडाऊनपर्यंत पोहोचली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग गोडाऊनच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्याआधीच विझवली. यामुळे गोडाऊनमधील हरभरा साठा पूर्णपणे सुरक्षित राहिला असून मोठा अनर्थ टळला आहे. उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान पाहता, गोडाऊन परिसरातील कचरा व गवत वेळीच साफ करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही.
    1
    अकोला 
बाळापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा शेतशिवारात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊनच्या परिसरात वाढलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा मोठा हरभरा साठा साठवणूक केलेला असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
सध्या विदर्भात सूर्य कोपला असून तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उष्णता आणि वाळलेले गवत यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊनमध्ये नाफेडचा लाखो रुपयांचा हरभरा साठा असल्याने ही आग गोडाऊनपर्यंत पोहोचली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग गोडाऊनच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्याआधीच विझवली. यामुळे गोडाऊनमधील हरभरा साठा पूर्णपणे सुरक्षित राहिला असून मोठा अनर्थ टळला आहे.
उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान पाहता, गोडाऊन परिसरातील कचरा व गवत वेळीच साफ करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer Balapur, Akola•
    2 hrs ago
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ​खामगाव : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासकीय इमारत परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ​आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपविभागीय महसूल व तहसील कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. "आमच्या मागण्या मान्य करा", "शासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ​​कर्मचारी संपावर गेल्याने तहसील आणि एसडीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दाखले, शासकीय योजनांची कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी आलेल्या सामान्य जनतेचे यामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत.​ ​यावेळी बोलताना तहसील कर्मचारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, "गेल्या १५ महिन्यांत आम्ही ७ वेळा लक्षवेधी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाला चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे, विधानसभेच्या पटलावर ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याही अंमलात आणण्यास शासनाला विसर पडला आहे.मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याने आता बेमुदत संपाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही." ​शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समन्वय समितीने घेतला आहे.
    1
    ​खामगाव : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासकीय इमारत परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ​आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपविभागीय महसूल व तहसील कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. "आमच्या मागण्या मान्य करा", "शासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ​​कर्मचारी संपावर गेल्याने तहसील आणि एसडीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दाखले, शासकीय योजनांची कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी आलेल्या सामान्य जनतेचे यामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत.​ ​यावेळी बोलताना तहसील कर्मचारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, "गेल्या १५ महिन्यांत आम्ही ७ वेळा लक्षवेधी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाला चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे, विधानसभेच्या पटलावर ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याही अंमलात आणण्यास शासनाला विसर पडला आहे.मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याने आता बेमुदत संपाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही." ​शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समन्वय समितीने घेतला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.